दिसामाजी काहीतरी ते :
आठवणी
दोन दिवस मामाच्या गावाला जाऊन आल्यावर आज जरा बर वाटलं.आजचा मेनु ठरवत असतानाच काही आठवणी जागृत झाल्या आणि म्हटलं त्या विसरायच्या आत क्लिक कराव्यात.म्हणजे आपल्या "दिसामाजी" मध्ये खंड पडायला नको.
MAEKETING
(1) काही वर्षापूर्वी -म्हणजे बहुधा १९८३/८४ साली-त्यावेळी मी बँकेच्या नोकरीत कोल्हापूरला होतो.बँकेने तेंव्हा एक अभिनव उपक्रम सुरु केला होता.बँकेच्या सर्व से...वा-सुविधांची,योजनांची,निरनिराळ ्या बचत ठेवी,कर्जे इ.इ.ची माहिती त्याचा प्रसार आणि प्रचार कथाकीर्तनाच्या माध्यमातून करायचा.सर्व ग्राहक वर्गात आणि जनतेमध्ये जन जागृती करणे हाच उद्देश होता असे वाटते.ह्या' मंगल 'कार्यासाठी एका सुप्रसिद्ध कीर्तनकारांची नेमणूक बँकेने केली होती.कीर्तनाच्या ठरलेल्या दिवशी रात्री मी महालक्ष्मीच्या देवळात मुद्दाम गेलो होतो.बुवांनी अनेक गमतीजमती सांगून बँकेच्या सेवासुविधा कथा/गप्पा/किस्से मार्गांनी जनतेला सांगून सर्वांची चांगलीच करमणूक केली.
पण मला सदैव आठवणारा किस्सा म्हणजे बुवांनी" हे जग केवळ चार वाक्यावर चालले आहे बर का मंडळी" असे सांगितले.फक्त चार वाक्यावर जग चालते म्हणजे काय? हजर असलेल्या सर्वांना ही वाक्ये ऐकण्याची तीव्र इच्छा होती आणि बुवानीही ती पूर्ण केली.तेंव्हा सर्वांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या.ही वाक्ये प्रत्येकाच्या घरी अधून मधून स्वयंपाक घरातून ऐकू येत असावीत. ती अशी :
1) आमच्या ह्यांना का sssss ही कळत नाही.
२).......... तरी मी ह्यांना सांगत होते |
३)मी आहे म्हणून घर चालले आहे बर का |
४)....... नाहीतर "दुसरी" करून बघा|
(काही वर्षापूर्वी ह्या बुवांचे निधन झाल्याचे कळले.)
@@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@ #@#@#@#@#
(2) सत्य नारायण पूजा /पोथी /प्रसाद
अत्रे उवाच :-
बहुतेक १९६७/६८ साली पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये सवाई गंधर्व ह्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन/किवा पुतळ्याचे महापालिकेला हस्तांतरण सोहोळा असा कार्यक्रम होता.मी ह्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी मुद्दाम सातारहून आलो होतो कारण साहित्य संगीताची मेजवानीच रसिक श्रोत्यांना मिळणार होती.प्रमुख पाहुणे होते आचार्य अत्रे आणि मुख्य वक्ते होते पु.ल.देशपांडे.उद्घाटन सोहोळ्यानंतर सवाई गंधर्व ह्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि पंडित फिरोज दस्तूर ह्यांचे गायन होते.
कार्यक्रमाला असंख्य रसिकांची खच्चून गर्दी होती.अत्रे आणि पु.ल.ह्यांची भाषणे हशा आणि टाळ्यांनी गाजली.काही प्रसंग ह्या निमित्ताने आठवले .
आपल्या भाषणात भाई म्हणाले "लोक हो ही कलावंत मंडळी कोणत्याही पक्षाची नव्हती.पक्ष वगैरे भानगड तेंव्हा नव्हतीच.तसा पक्ष असायचा पण तो वर्षातून एकदाच".शेवटी आचार्य अत्रे बोलायला उठले.श्रोते गायनासाठी आतुर झाल्याचे अत्रेंना जाणवले असावे.आपल्या खास शैलीत अत्रे म्हणाले "मी आज फार काही बोलणार नाही.कारण माझ्या भाषणानंतर लगेच पंडित भीमसेन जोशीचे गायन होणार आहे.ते ऐकण्यास तुम्ही सर्वजण उत्सुक आहात.असेच असते नेहमी सत्यनारायणाच्या पोथीपेक्षा त्याच्या प्रसादाकडेच लोकांचे नेहमी लक्ष असते." हे ऐकल्यावर चांगलीच खसखस पिकली.
शुभप्रभात
आठवणी
दोन दिवस मामाच्या गावाला जाऊन आल्यावर आज जरा बर वाटलं.आजचा मेनु ठरवत असतानाच काही आठवणी जागृत झाल्या आणि म्हटलं त्या विसरायच्या आत क्लिक कराव्यात.म्हणजे आपल्या "दिसामाजी" मध्ये खंड पडायला नको.
MAEKETING
(1) काही वर्षापूर्वी -म्हणजे बहुधा १९८३/८४ साली-त्यावेळी मी बँकेच्या नोकरीत कोल्हापूरला होतो.बँकेने तेंव्हा एक अभिनव उपक्रम सुरु केला होता.बँकेच्या सर्व से...वा-सुविधांची,योजनांची,निरनिराळ
पण मला सदैव आठवणारा किस्सा म्हणजे बुवांनी" हे जग केवळ चार वाक्यावर चालले आहे बर का मंडळी" असे सांगितले.फक्त चार वाक्यावर जग चालते म्हणजे काय? हजर असलेल्या सर्वांना ही वाक्ये ऐकण्याची तीव्र इच्छा होती आणि बुवानीही ती पूर्ण केली.तेंव्हा सर्वांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या.ही वाक्ये प्रत्येकाच्या घरी अधून मधून स्वयंपाक घरातून ऐकू येत असावीत. ती अशी :
1) आमच्या ह्यांना का sssss ही कळत नाही.
२).......... तरी मी ह्यांना सांगत होते |
३)मी आहे म्हणून घर चालले आहे बर का |
४)....... नाहीतर "दुसरी" करून बघा|
(काही वर्षापूर्वी ह्या बुवांचे निधन झाल्याचे कळले.)
@@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@
(2) सत्य नारायण पूजा /पोथी /प्रसाद
अत्रे उवाच :-
बहुतेक १९६७/६८ साली पुण्याच्या संभाजी पार्कमध्ये सवाई गंधर्व ह्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन/किवा पुतळ्याचे महापालिकेला हस्तांतरण सोहोळा असा कार्यक्रम होता.मी ह्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी मुद्दाम सातारहून आलो होतो कारण साहित्य संगीताची मेजवानीच रसिक श्रोत्यांना मिळणार होती.प्रमुख पाहुणे होते आचार्य अत्रे आणि मुख्य वक्ते होते पु.ल.देशपांडे.उद्घाटन सोहोळ्यानंतर सवाई गंधर्व ह्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि पंडित फिरोज दस्तूर ह्यांचे गायन होते.
कार्यक्रमाला असंख्य रसिकांची खच्चून गर्दी होती.अत्रे आणि पु.ल.ह्यांची भाषणे हशा आणि टाळ्यांनी गाजली.काही प्रसंग ह्या निमित्ताने आठवले .
आपल्या भाषणात भाई म्हणाले "लोक हो ही कलावंत मंडळी कोणत्याही पक्षाची नव्हती.पक्ष वगैरे भानगड तेंव्हा नव्हतीच.तसा पक्ष असायचा पण तो वर्षातून एकदाच".शेवटी आचार्य अत्रे बोलायला उठले.श्रोते गायनासाठी आतुर झाल्याचे अत्रेंना जाणवले असावे.आपल्या खास शैलीत अत्रे म्हणाले "मी आज फार काही बोलणार नाही.कारण माझ्या भाषणानंतर लगेच पंडित भीमसेन जोशीचे गायन होणार आहे.ते ऐकण्यास तुम्ही सर्वजण उत्सुक आहात.असेच असते नेहमी सत्यनारायणाच्या पोथीपेक्षा त्याच्या प्रसादाकडेच लोकांचे नेहमी लक्ष असते." हे ऐकल्यावर चांगलीच खसखस पिकली.
शुभप्रभात
" सत्यनारायणाच्या पोथीपेक्षा त्याच्या प्रसादाकडेच लोकांचे नेहमी लक्ष असते...."
ReplyDeleteमस्त आहे- दिसामाजी काहीतरी ते... आवडले लिखाण . लिखते रहो !