Thursday, February 27, 2014

सहजच सुचलं: बोकील (कोरेगाव .जिल्हा सातारा )

मी कालच म्हटल्याप्रमाणे काहीतरी ते ....हेच आहे.आम्ही बोकील कोरेगावचे रहिवासी.तशी कोरेगाव बरीच आहेत.पण आमचे हे कोरेगाव सातारपासून ११ मैलावर पंढरपूर मार्गावर असून तालुक्याचे ठिकाण ,व्यापार केंद्र,रेल्वे व बस वाहतुकीची सोय सुविधा असलेले एक टुमदार गाव आहे.अनेक शैक्षणिक संस्थाही कार्यरत आहेत.भैरोबा हे ग्रामदैवत असून गावात सर्व जातीधर्माची प्...रार्थनास्थळे आहेत.

३०० वर्षापूर्वीचा बोकीलवाडाही वयोमानानुसार हळूहळू अस्थिपंजर होत आहे.ह्याच वाड्यात आमच्या बोकील घराण्याची कुलस्वामिनी श्री तुर्जाभवानीचे मोठे देवघर असून दरवर्षी नवरात्रात गावोगाव विखुरलेली बोकील मंडळी येत असतात.कोणाच्याही घरी स्वतंत्र नवरात्र होत नाही.ह्या देवीला अनेक गावे इनाम म्हणून पुरातन काळी मिळालेली असल्याने आम्हाला "इनामदार बोकील "म्हणूनही गावात ओळखतात.दुसरे कुलकर्णी बोकील म्हणून ओळखतात.आतामात्र इनामे गेली आणि नुसती दारे राहिली आहेत,तीही खिळखिळी होताहेत.काळाचा महिमा दुसरे काय? शुभप्रभात

No comments:

Post a Comment