इचलकरंजी -माझी कर्मभूमी
गेल्या एकदोन दिवसात मला चांगल्या post आल्या.त्यातील एकाचा मराठी अर्थ असा "भूतकाळाचे कैदी बनू नका तर भविष्यकाळाचे वास्तुविशारद बना" तर दुसरी post माझे फेसबुक मित्र लोकप्रिय कवी श्री विजयकुमार देशपांडे ह्यांची "मनाच्या गावात"ही सुंदर कविता.कोणत्याही संवेदनशील माणसाला आपल्या मनातल्या गावाबद्दल,तेथील रस्ते ,जुनेपडके वाडे,आणि तेथील माणसांबद्दल मनात एक ...प्रकारचे प्रेम,ओढ असते.सुख् दुखा:च्या आठवणी असतात.भूतकाळात फार रमून त्याचे कैदी म्हणजे त्यात गुरफटून बसले नाही तरी अधूनमधून ह्या काळात मला डोकवायला नक्कीच आवडते.असेच एक मनातले गाव म्हणजे महाराष्ट्राचे Manchester म्हणून प्रसिद्ध असलेले इचलकरंजी हे गाव.ही माझी कर्मभूमी.भारतीय स्टेट बँकेच्या माझ्या प्रदीर्घ नोकरीची सुरवात/ श्रीगणेशा ह्याच गावातील आमच्या बँकेच्या शाखेत १६ जुलै १९६४ म्हणजे 50 वर्षापूर्वी झाला.भूतकाळाकडे मागे वळून पाहिले की अनेक आठवणी उफाळून येतात.वर्तमानकाळाशी तुलना होते आणि मन बेचैन होते.
इचलकरंजी शाखेला केवळ दोन महिन्यासाठी मी हजर झालो.त्यावेळी नोकरी मिळणे आणि ती सुद्धा स्टेट बँकेची ही फार दुर्मिळ बाब होती.म्हणून दोन महिने तर दोन महिने हा विचार करून मी सातारा आणि आईवडिलांना सोडून ह्या गावी आलो.सातारला टांग्यातून एस.टी.stand कडे येताना वडील उपदेशामृत पाजत होते.मी डोळे पुसत पुसत सर्व ऐकत होतो.पण ही सुवर्णसंधी सोडायची नव्हती.त्यामुळे १५ जुलैला सायंकाळी शाखेत गेलो आणि लगेच दुस-या दिवशी SBI चा तीला(टीला) कपाळी लागला तो ३० एप्रिल २००६पर्यंत राहिला.शाखेतील सर्व सहका-यांनी सर्व मदत केली.पगारही गलेलठ्ठ म्हणजे रुपये १२० बेसिक आणि ४० रुपये तत्कालीन महागाई असा १६० रुपये मासिक तनखा होता.आता निवारा कोठे?तर गावातील झेंडा चौकाजवळ असलेल्या आझाद चित्रपटगृहाच्या समोरील दामले वाड्यात.सुरवातीला नाशिकचा माझा सहकारी आणि मी एकत्र रहात होतो.शाखा घरापासून दूर होती.तेंव्हा आतासारखी रिक्षा,सिटीबस टांगा काहीच सोय नसल्याने रोज दोन्ही वेळेस चालण्याची परेड करावी लागे.निवा-याच्या सोयीनंतर उदरभरणासाठी "स्वच्छतेचे माहेरघर"ओळखल्या
जाणा-या एका खानावळीचा मासिक मेम्बर झालो.(पुढे कधीतरी ही स्वच्छता कायमची सासरी नांदायला गेल्याचे कोणीतरी सांगितले) पाण्याचे नळ नव्हते तर फडणीस हौदावरूनच पिण्याच्या पाण्याची तहान भागवावी लागे.गावात सर्वत्र हातमाग असल्याने एक विशिष्टप्रकारचा आवाज कानात बसला होता.केवळ ३० नव्या पैशात दमदमीत नाश्ता होत असे.झेंडा चौक हे मध्यवर्ती ठिकाण होते.तेथेच घोरपडे संस्थानिकांचा राजवाडा,एस.टी.चा गावातील stand,आपटे वाचन मंदिर, भाजीमंडई,विविध दुकाने असे बरेच काही होते.काही नामवंत नेत्यांची भाषणेही ह्याच ठिकाणी मी ऐकली होती.सुप्रसिद्ध गोविंदराव हाय स्कूल मुख्य रस्त्यावर आहे.३ सिनेमा थिएटर्स गावातील अनेकांचे मनोरंजन करीत.अशा अनेक आठवणी आहेत मलातरी न विसरता येण्याजोग्या ह्या माझ्या कर्मभूमीच्या.पुढे अनेक ठिकाणी मोठ्या महानगरातून बदल्या झाल्या.पण ह्या आठवणींची मजा/ चव काही वेगळीच.
नोकरीच्या निमित्ताने गावातील अनेक कुटुंबांशी,बँकेतील मित्रांशी काही आप्तांशी जिव्हाळ्याचे संबंध.निर्माण झाले आणि विशेष म्हणजे अद्यापही मी ते टिकवले आहेत.काही काळ मी एका आजीकडे दोन्ही वेळेला भोजनासाठी जात असे तेंव्हा घरच्या सारखेच स्वादिष्ट रुचकर भोजनाचा आनंद मिळे .नोकरी /निवृत्तीच्या आधी मी मुद्दाम माझ्या कर्मभूमीला भेट देण्यासाठी गेलो होतो.दामले वाड्याच्या जागी आता flats झाले,पाण्याचा 'तो 'हौदही त्या ठिकाणी नाही,काही दुकानांनी कात टाकली आहे,तर काही घरेही थोड्याच दिवसासाठी तग धरून उभी आहेत,काही परिचित मंडळीपण पिकल्या पानाप्रमाणे गळून पडल्याचे समजले तेंव्हा त्यांचे चेहरे समोर येऊन माझ्याशी बोलत आहेत असेच वाटले.शेवटी "कालाय तस्मै नमः"
शुभप्रभात

No comments:
Post a Comment