मराठीकाका ..धन्यवाद
"मराठी असे आमुची मायबोली ...."असे मी पण इतरांसारखे म्हणत असे,पण संगणकावर मात्र हे मी सोयीस्करपणे विसरत असे.कारण मराठी टंकन थोडे अवघड असते म्हणून.गेली दोन तीन वर्षे मी संगणक थोड्याफार प्रमाणात वापरतोय पण आपल्याला मराठी टंकन करता येत नाही ही खंत मनाशी बाळगूनच.कोणत्याही विषयावर आपल्या अंतरीचे बोल /विचार खास मातृभाषेत व्यक्त करण्याचा आनंद/समाधान काही वेगळेच असते.महाराष्ट्रात अ...सतानादेखील ह्याची जेवढी जाणीव झाली नाही तेवढी अमेरिकेत आल्यानंतर झाली.नव्हे तर मी अस्वस्थ होऊ लागलो.पण कोणाचे दार ठोठवायचे?कोण करणार ह्या बाबत मार्गदर्शन?हा विचार करत असतानाच मला माझे मित्र आणि महाराष्ट्राचे मराठी काका श्री अनिल गोरे ह्यांची आठवण झाली. लगेच प्रथम इंग्रजीतूनच संपर्क साधला.आणि नंतर अ आ इ मराठीत शिकून माझ्या हृदयातले/ मनातले( मनोगत ) फेसबुकवर उतरवू शकलो.सध्यातरी LAPTOP माझा सांगाती आहे.मराठीकाका तुमचा हा पुतण्या तुमचा सदैव ऋणी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद

No comments:
Post a Comment