Wednesday, February 26, 2014

रिकामपण दे गा देवा

असं कुणी देवाला मागितलय का? "लहानपण दे गा देवा "ही डीमांड तर सर्वांचीच असते.पण मी मात्र देवाला थोड्या दिवसांसाठी तरी रिकामपण देण्याविषयी गळ घातली आहे.कारण थोडा निवांत वेळ मिळाला की" काहीतरी "लिहिता येते.नाहीतर आयुष्यभर डे बुके लिहावयाची (आणि चेक करायची) असेच झाले असते.नुकतेच रा.ग.गडकरींचे "रिकामपणची कामगिरी "हे पुस्तक आतापर्यंत महाराष्ट्रात माहिती होते तर...ी वाचायचा योग आला तो मात्र अमेरिकेत.कारण येथे मिळालेले थोडेसे रिकामपण.नाहीतर नेहमीच कसला ना कसला तरी भुंगा पाठीमागे लागलेला असायचाच.त्यामुळे आवड आणि सवड ह्यांची सांगड घालता येत नसे.आता जरा बर चाललय.त्यामुळे काहीतरी खर्डेघाशी होत आहे.माझ्या एका मित्राने तर अमेरिकेच्या थंडीचेच खास आभार मानले आहेत.का तर म्हणे थंडीमुळे मी सारखं घराबाहेर जात नाही आणि घरात बराचसा वेळ laptap समोरच असल्याने काहीतरी आम्हाला वाचायला मिळतंय.माझ्या डोळ्यासमोर महादेवापुढे नंदी हे चित्र उभे रहाते.काही का असेना मित्रांना रोज एक नवीन डिश मिळत आहे.अर्थात हे काही कायमचे राहणार नाही.आज ना उद्या एक दिवस हे दुकान बंद करावेच लागेल.मला खात्री आहे ह्या माझ्या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळेल.आणि थोडेच दिवस ही परिस्थिती सहन करावी लागेल.

सकाळी प्रभात फेरीला बाहेर पडलो की डोक्यात विचारचक्र सुरूच असते आज काय शिजवायचे?अनेक लहान मोठे प्रसंग घटना डोळ्यासमोर असतात पण नक्की काय ते लवकर सुचत नाही. फ्रिझमध्ये खच्चून भाज्या असल्या तरी आज आणि आता कोणती भाजी करायची हे जसं अनेक गृहिणीवर्गाला सुचत नाही तसंच.पण एकदा का ताशा बडवायला सुरवात झाली की मग कर्ता, कर्म. क्रियापद ही मंडळी एका रांगेत निमुटपणे येऊन बसतात.आणि हा हा म्हणता एक परीछेद पूर्ण होतो.(येथे पुन्हा हा हा म्हणता आलेच))

गेल्या ६५ वर्षातील अनेक आठवणी,सुख्दुःखाचे प्रसंग,नोकरीच्या काळातील गमतीचे दिवस,आयुष्यात भेटलेली अनेक प्रकारची माणसे,आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये,निरनिराळ्या शहरातील आपले जीवन,संघर्षाचा काळ असे अनेक विषय आहेत.आजपर्यत हे डोक्यात असे आणि डायरीत असे.पण सुदैवाने आता click करता येऊ लागल्याने मित्रांनाही कळते आहे ह्याचा आनंद आहे.अत्रे नेहमी म्हणत"लेखकाच्या एका हातात लेखणी हवी आणि दुस-रया हातात ढोल पाहिजे.तुम्ही काय करताय हे जगाला त्याशिवाय कळणार कसं?"

शुभप्रभात:

No comments:

Post a Comment