Friday, February 28, 2014


"लग्नाची बेडी"

माझ्या मित्रानो जर तुम्ही कोणाला सांगणार नसाल तर एक आतल्या गोटातील बातमी तुम्हाला सांगण्याचा मोह मला होतोय.पण आपल्या(?) माणसाला सांगायचे नाही तर मग कुणाला सांगायचे?म्हणून सांगतो झालं.आजच्या दिवसाचे महत्व पंचांगकर्ते काही का सांगेनात पण माझ्या नव्हे तर आमच्या दृष्टीने त्याचे महत्व असे की
६ फेब्रुवारी १९७३ साली कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या वाई मुक्कामी सका...ळी ९.३० च्या सुमारास मी" लग्नाच्या बेडीत " अडकलो.हा हा म्हणता (पुन्हा तेच) आज ४० वर्षे झाली. नांदा सौख्यभरे म्हणत अनेकांनी शुभाशीर्वाद,शुभेच्छा दिल्या.परमेश्वराच्या कृपेने,आमच्या कुलदैवत आणि मातापित्यांच्या वरद हस्तामुळे आम्ही दोघे अत्यंत सुखासमाधानाने संसाराचा हा रथ ओढत आहोत.

गेल्या ४० वर्षाच्या वैवाहिक जीवनाच्या स्मृतींची रिळे डोळ्यासमोर भराभर उलगडली जात आहेत.अनेक सुख् दुःखाचे प्रसंग मनात दाटून येत आहेत.आमच्यावर मनापासून प्रेम करणारी,प्रेम जिव्हाळा शब्द खरे करून दाखवणारी अनेक मंडळी,नातेवाईक काळाच्या ओघात आम्हाला आशीर्वाद देऊन निघून गेले. सर्वांच्या आठवणीने मन उचंबळून येत आहे.पण जग् रहाटीच अशी आहे त्याला कोण काय करणार?
प्रथम पती,मग पिता आणि आता आजोबा अशी संसारात बढती मिळत गेली.
पूर्वीच्या एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध कवितेप्रमाणे "ही ईश्वराची दया "च आहे
भारतीय स्टेट बँकेचा भरभक्कम आधार मिळाला म्हणून आयुष्यात काही तरी करू शकलो.त्यामुळे बँकेचे प्रतिकचिन्ह जगात कोठेही दिसले की कृतज्ञता दाटून येते.
सातारा जिल्हयात जन्म आणि बराच काळ जीवन गेले.पण मुलगा - सून - आणि
मुलगी - जावई ह्याच्या मुळे सातासमुद्रा पलीकडचे जग आम्हाला पाहायला मिळाले.इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या महाकाय देशात आम्हाला अनेक महिने रहाता आले आणि जे जे उत्तम, उदात्त ,उन्नत आहे ते याची देही याची डोळा बघायला मिळाले ही भाग्याची बाब आहे

अनेकांच्या सदिच्छा,फेसबुक मित्रांच्या शुभेच्छा आम्हाला असल्यावर आणखी काय हवे?ह्याच शिदोरीवर भविष्यकाळ आनंदाने घालविणार आहोत.

शुभप्रभात :
See More

No comments:

Post a Comment