कॅलिफोर्निया आणि मेक्सिको
मी येथे आल्यापासून मला एका गोष्टीचे सारखे नवल म्हणा,कुतूहल म्हणा असे वाटायचे की ह्या ठिकाणी मेक्सिको ह्या देशाचे एवढे वर्चस्व का आणि कशासाठी आहे?कारण संपूर्ण अमेरिकेत कॅलिफोर्निया ह्या प्रांतातच मेक्सिकोचे इतके महत्व आणि महात्म्य आहे म्हणून कळले.मी ह्या जिज्ञासेपोटी काहीना विचारले सुद्धा.ब-याच वर्षापुरवी कॅलिफोर्निया हा भाग मेक्सिको ह्या वेगळ्या... देशातच समाविष्ट होता.पुढे अमेरिका आणि मेक्सिको ह्या दोन देशामध्ये युद्ध झाले आणि त्यात अमेरीकेचा विजय झाल्याने हा निसर्गरम्य सुंदर प्रदेश अमेरिकेत आला आहे.आता जरी कॅलिफोर्निया अमेरिकेत असला तरी येथील वातावरण/ संस्कृतीवर मेक्सिकन पगडा असल्याचे जाणवते बहुतांश ठिकाणी नोकरदार/कारागीर/कर्मचारी वर्ग हा मेक्सिकन असून ते सर्व स्पानिश ( Spanish) भाषा बोलतात.सार्वजनिक ठिकाणी,सिटीबस,रेल्वे मोठमोठ्या दुकानातून सर्व सूचना ह्या इंग्लिश चायनीज आणि स्पानिश ह्या तीन भाषेत असतात. अनेकजण स्पानिश भाषेचा अभ्यासही करतात आणि दैनंदिन जीवनात बोली भाषा म्हणून वापरतात असे जाणवले. अनेक व्यापारी संकुलातून किंवा हमरस्त्यावर मेक्सिकन ग्रील हॉटेल्स आढळतात.मेक्सिकन फूड मिळण्याच्या मोठ्या आणि आकर्षक जाहिरातीही मी येथे पाहिल्या. आमच्याही कम्युनिटीत कार्यालयीन व्यवस्थापनेत स्पानिश भाषा बोलणारेच अनेकजण आढळले.गेल्या अनेक दिवसापासून मी येथे असल्याने बरेचजण ओळख दाखवितात, हाय/हलो करताना त्यांच्या चेह-यावर एकादी तरी स्मित रेषा उमटते.नाहीतर "आमची माणसे......" कालच एका मराठी माणसाने माझ्याशी बोलताना ह्या बाबतीत परखड मत व्यक्त केले.बोलणे दूरच पण लक्षपूर्वक दुर्लक्ष करणे हाच आमचा "तो "हक्क असल्याचे जाणवते.त्यामुळे कोणत्याही भावाचा चेह-यावर अभाव असतो.असलाच तर no profit no loss हाच.असो.
सारांश हे मेक्सिकन वातावरण पाहून मला गोवा आठवले.अजूनही तेथे पोर्तुगीज साम्राज्याच्या संस्कृतीच्या खुणा मला जाणवल्या.तेथील इमारती,बोली भाषेतील शब्द आणि संस्कारावर पोर्तुगीज पगडा जाणवतो.जसे येथे SAN JOSE (san जोसे नव्हे ) EL CAMINO REAL(HISTORIC ROAD) हे स्पानिश शब्द/शब्दोच्चार आहेत.तसेच तेथेही आहे.आल्तिनो,सुशेगात असेच बरेच काही.येथील अल कमिनो रिआल हा लांबलचक रस्ता हा मेक्सिको (स्पानिश)आणि अमेरिका ऐतिहासिक संबंधाची मोठी खुण आहे.असे समजतात.
हलके/फुलके
आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीजमती आहेत.त्यातीलच काही:
एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द आणि वेगवेगळी क्रियापदे.
(१)तोंड : हे लपविण्यासाठी ( २) चेहरा : हा पाहण्यासाठी( ३)थोबाड किंवा मुस्काट: हे फोडण्यासाठी
त्या प्रमाणे एक शब्द तीन लिंगात
१)भिंतीत ठोकली की.................खुंटी
२)जात्यात ठोकला की .................खुंटा
३)जमिनीत ठोकल की .................खुंट
No comments:
Post a Comment