Mr.SAN FRANSISCO (श्रीयुत सन फ्रांसिसको)
महाराष्ट्राचे लाडके पु.ल. देशपांडे ह्यांनी आपल्या प्रवासवर्णनामध्ये" मिस्टर सन फ्रान्सिस्को"असा एक लेख लिहिला आहे.लेखाचे हे शीर्षक वाचून माझ्या मनातही कुतूहल निर्माण झाले.मनात म्हटलं ह्या साहेबांच्या मिसेस कोण आणि कुठायत त्या?मला हे प्रवासवर्णन फार आवडले.तेंव्हापासून पु.लं .च्या ह्या आवडत्या शहराला म्हणजे MR.SFO ना भेटायची माझी खू...प इच्छा होती ती 1999 मध्येच माझ्या पहिल्या अमेरिका भेटीत पूर्ण झाली.आणि आतातर काय तीन चार वेळा मी SFO ला जाऊन आलोय.काही फोटोही मी फेसबुक मध्ये टाकले आहेत.अनेकांना ते आवडले असल्याचे मला आवर्जून कळविले.धन्यवाद त्यांच्या रसिकतेला.(आणि सहनशक्तीला.असो)
मी १३ डिसेंबर ला SFO ला जाऊन आलो.म्हणजे एखादा पुणेकर जितक्या सहजपणे मी जरा आज पिंपरी चिंचवडला जाऊन येतो असे म्हणतो असेच माझे जाऊन येणे होते.तासदीड तासाचाच प्रवास.पुढच्या दारी SFO आणि मागच्या दारी सन होजे असे आहे.कालीफोर्नियामध्ये CALTRAIN आहे ती ह्याच मार्गावरून धावते. येथील नोकरदारवर्ग VT किंवा चुर्चगेटला गेल्याप्रमाणे नोकरीला SFOला जातो.मी त्यादिवशी सकाळीच थंडीशी मुकाबला करावा लागेल म्हणून वेशभूषेचा जामानिमा करून आणि आपल्या आवडीचे बाहेर काही मिळणार नाही (आणि ते येथे मिळत नाहीच)म्हणून घरचे दडपे पोहे पोटात दडपून ११ वाजताच संनीवेल ठेसनावर जाऊन बसलो.अमेरिकेत वय झाल्याचा फायदा सर्वांना जागोजागी मिळतो,मी पण ज्येष्ठ नागरिकाचा एक दिवसाचा 7 डॉलर देऊन caltrainचा pass घेतला.पण माझ्या मनात जे स्टेशन ठाण मांडून बसले होते तसे काहीच न दिसल्याने चकितच झालो.कुठाय ते रेल्वे स्टेशन ?काही up आणि काही down मधले?योगायोगाची बाब म्हणजे सहकारनगर २ पुणे येथला एक परिचित भेटला आणि मग आम्ही जणूकाही लोणावळ्याला जाण्यासाठी शिवाजीनगर स्टेशनवर गप्पा मारीत बसल्यासारखेच बसलो.वेळेवर ती राणी आली.म्हणजे आपली जशी द खनची राणी तशीच.प्रवास चांगला झाला.शेवटी अमेरिकेचीच ती सर्व व्यवस्था असल्याने तक्रार,असमाधान आणि कसलीच कुरकुर नव्हती.
१२.४५ ला SFO स्टेशनवर उतरल्यावर तिथे मात्र स्टेशन वाटत होते.भव्य आणि सुसज्ज होते.प्रथम SUBWAY मध्ये गेलो तेंव्हा रांगेतील मागचा माणूस मराठी बोलतोय असे वाटल्याने मी त्याला" काय हो कुठचे तुम्ही?" असे बेधडक विचारले तेंव्हा "आकुर्डी पुणे "ऐकल्यावर मी उडालोच.मग आमच्या गावाकडच्या गप्पा झाल्यावर मी स्टेशन बाहेरील रस्यावर आलो.दुपारचे २ वाजले होते.sfoला नेहमीच थंडी आणि गारठा असतो म्हणे.त्या दिवशीही चांगलेच जाणवत होते.३ तासांनी परतायचे असल्याने मी आसपासच हिंडत होतो.SFO मधील भव्य इमारती लक्षवेधक वाटल्या.अनेक इमारतीत इंग्रजी चित्रपटात पाहायला मिळतात तसे संकटकालीन जिने होते.प्रशस्त रस्ते,आणि पदपथ त्यावर अधूनमधून फुलांच्या कुंड्या ,प्रत्येक चौकात १०/ १२ पेट्या,(वर्तमानपत्राच्या),आकर्षक सिटीबसेस,ट्राम,खेळाडू कलावंतांचे पुतळे,ला इट ट्रेन आणि वेगवेगळ्या आकारमानाचे प्रचंड देहाचे स्त्री पुरुष दिसत होते.उगीचच बुजल्यासारखे वाटत होते.दोनतीन मोठ्या दुकानात जाऊन शो-केसेस पाहत मी वेळ काढला.येथील जानी दोस्त केमेरा बरोबर होताच.काही फोटो काढले आणि थोडावेळ mc Donald मध्ये गरम गरम कॉफ्फी घेत घेत घड्याळाकडे पाहिले.लगेच स्टेशनवर आलो return ticket असल्याने स्टेशनवरील ते वातावरण न्याहाळीत बाकावर बसलो.आता थंडी" मी " म्हणू लागली होते.एका गोर्यापान साहेबाने आज्ञा दिल्यावर सर्व प्रवासी गाडीत बसले.आणि गाडी सन होजेच्या दिशेने धावू लागली. परतीच्या प्रवासासाठी.
शुभ प्रभात.:
महाराष्ट्राचे लाडके पु.ल. देशपांडे ह्यांनी आपल्या प्रवासवर्णनामध्ये" मिस्टर सन फ्रान्सिस्को"असा एक लेख लिहिला आहे.लेखाचे हे शीर्षक वाचून माझ्या मनातही कुतूहल निर्माण झाले.मनात म्हटलं ह्या साहेबांच्या मिसेस कोण आणि कुठायत त्या?मला हे प्रवासवर्णन फार आवडले.तेंव्हापासून पु.लं .च्या ह्या आवडत्या शहराला म्हणजे MR.SFO ना भेटायची माझी खू...प इच्छा होती ती 1999 मध्येच माझ्या पहिल्या अमेरिका भेटीत पूर्ण झाली.आणि आतातर काय तीन चार वेळा मी SFO ला जाऊन आलोय.काही फोटोही मी फेसबुक मध्ये टाकले आहेत.अनेकांना ते आवडले असल्याचे मला आवर्जून कळविले.धन्यवाद त्यांच्या रसिकतेला.(आणि सहनशक्तीला.असो)
मी १३ डिसेंबर ला SFO ला जाऊन आलो.म्हणजे एखादा पुणेकर जितक्या सहजपणे मी जरा आज पिंपरी चिंचवडला जाऊन येतो असे म्हणतो असेच माझे जाऊन येणे होते.तासदीड तासाचाच प्रवास.पुढच्या दारी SFO आणि मागच्या दारी सन होजे असे आहे.कालीफोर्नियामध्ये CALTRAIN आहे ती ह्याच मार्गावरून धावते. येथील नोकरदारवर्ग VT किंवा चुर्चगेटला गेल्याप्रमाणे नोकरीला SFOला जातो.मी त्यादिवशी सकाळीच थंडीशी मुकाबला करावा लागेल म्हणून वेशभूषेचा जामानिमा करून आणि आपल्या आवडीचे बाहेर काही मिळणार नाही (आणि ते येथे मिळत नाहीच)म्हणून घरचे दडपे पोहे पोटात दडपून ११ वाजताच संनीवेल ठेसनावर जाऊन बसलो.अमेरिकेत वय झाल्याचा फायदा सर्वांना जागोजागी मिळतो,मी पण ज्येष्ठ नागरिकाचा एक दिवसाचा 7 डॉलर देऊन caltrainचा pass घेतला.पण माझ्या मनात जे स्टेशन ठाण मांडून बसले होते तसे काहीच न दिसल्याने चकितच झालो.कुठाय ते रेल्वे स्टेशन ?काही up आणि काही down मधले?योगायोगाची बाब म्हणजे सहकारनगर २ पुणे येथला एक परिचित भेटला आणि मग आम्ही जणूकाही लोणावळ्याला जाण्यासाठी शिवाजीनगर स्टेशनवर गप्पा मारीत बसल्यासारखेच बसलो.वेळेवर ती राणी आली.म्हणजे आपली जशी द खनची राणी तशीच.प्रवास चांगला झाला.शेवटी अमेरिकेचीच ती सर्व व्यवस्था असल्याने तक्रार,असमाधान आणि कसलीच कुरकुर नव्हती.
१२.४५ ला SFO स्टेशनवर उतरल्यावर तिथे मात्र स्टेशन वाटत होते.भव्य आणि सुसज्ज होते.प्रथम SUBWAY मध्ये गेलो तेंव्हा रांगेतील मागचा माणूस मराठी बोलतोय असे वाटल्याने मी त्याला" काय हो कुठचे तुम्ही?" असे बेधडक विचारले तेंव्हा "आकुर्डी पुणे "ऐकल्यावर मी उडालोच.मग आमच्या गावाकडच्या गप्पा झाल्यावर मी स्टेशन बाहेरील रस्यावर आलो.दुपारचे २ वाजले होते.sfoला नेहमीच थंडी आणि गारठा असतो म्हणे.त्या दिवशीही चांगलेच जाणवत होते.३ तासांनी परतायचे असल्याने मी आसपासच हिंडत होतो.SFO मधील भव्य इमारती लक्षवेधक वाटल्या.अनेक इमारतीत इंग्रजी चित्रपटात पाहायला मिळतात तसे संकटकालीन जिने होते.प्रशस्त रस्ते,आणि पदपथ त्यावर अधूनमधून फुलांच्या कुंड्या ,प्रत्येक चौकात १०/
शुभ प्रभात.:
No comments:
Post a Comment