दिसामाजी काहीतरी ते
चि.मीरा हर्षवर्धन बोकील
(आमची नवीन माहेरवाशीण)
बहुतेक सर्व मित्रांना कळले आहेच,माझा मुलगा आणि सून सौ.राधिका ह्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.त्याबद्दल अनेकांनी मीराचे आईबाबा आणि आजी आजोबाचे हार्दिक अभिनंदन केले आहे.सर्वांच्या शुभेच्छाबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद.
अनेकांनी मला आजोबा झाल्याबद्दल माझे खास अभिनंदन केले आहे.खरतर मी २००५ सालीच आजोबा ...स्केल -I झालो आहे.पण आता स्केल II आजोबा झाल्याने माझा भाव थोडा वधारला आहे.आज ब-याच दिवसांनी माझ्यापुढे II हे दोन स्टंप उभे राहिलेत.बँकेत असताना II हे जयविजय माझे नेहमी राखणदार असत.तर काय सांगत होतो, मी आता पायस जोशी आणि मीरा बोकील ह्या दोन्ही नातवंडांचा ग्रान्डफादर आहे.असो.चि.मीराचे आमच्या घरात येण्याचे आगमन नक्की झाल्यावरच आम्ही दोघेजण अमेरिकेच्या विमानात बसलो.येथे आल्यावर म्हणजे सर्वांचे डोळे आणि लक्ष जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याकडे होते.कारण मीराच्या अपेक्षित आगमनाचा मुहूर्त प्रजासत्ताक दिनानंतरचा होता.पण डॉक्टरांच्या सल्ल्याला कोण आव्हान देणार म्हणून ९ जानेवारीलाच आम्ही MOUNTAIN VIEW CA येथील EL CAMINO ह्या पूर्णपणे अमेरिकन हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. दुस-या दिवशी पहाटे 5 लाच फोन खणखणला आणि माझ्या मुलाने पहाटे ४.५४ लाच कन्यारत्नाने पहिले' टयाहा' केल्याचे सांगितल्यावर आमचा आनंदोत्सव सुरु झाला आणि सर्वत्र फोनाफोनी
सुरु झाली. आमच्या घरात मीरा बोकील च्या रूपाने नवीन माहेरवाशीण आली आहे हे नक्की.
ह्या निमित्ताने मी अमेरिकेतील हॉस्पिटलचा सुद्धा एक नवीन अनुभव घेतला.ह्या ची सर्व व्यवस्था/नियंत्रण संपूर्णपणे अमेरिकन पद्धतीनुसारच चालते.सर्व नियम,शिस्त सर्वजण काटेकोरपणे पाळतात.बाळाच्या आईबाबाखेरीज कुणालाही कधीही तेथे प्रवेश नसतो.सर्वजण घड्याळाचे गुलाम आहेत.बाळाच्या आगमनाच्या आधी सर्व कुटुंबीय हात मागे टाकून मुलगा की मुलगी होणार ह्या चिंतेत बाहेरील पासेज्मध्ये येरझारा घालतात हे चित्रपटातील दृश्य येथे दिसत नाही.तसेच बाळाचे नावही आधीच नोद्वणे अत्यावश्यक असते. "नावात काय असते? "असली विचारसरणी चालत नाही.नूतन बाळाची अनेक पद्धतीने चाचणी/तपासणी केली जाते.आहारसुद्धा तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिला जातो.नॉर्मल परिस्थितीनुसार २/३ दिवसातच बाळाचे आपापल्या घरात आगमन होते.आम्ही मीराचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.आम्ही म्हणजे प्रामुख्याने माझ्या 'सौ 'नेच सर्व सजावट केली होती.पहिली बेटी ....म्हणून तिच्या आईबाबांनी' BABYS R US'ह्या अमेरिकन दुकानातून काय काय आणि कितीतरी नवीन वस्तू/कपडे आणले होते.मला हे सर्व नवीन होते.सर्व काही मोठ्या आनंदाने, कौतुक आणि कुतूहलाने मी हे सर्व पहात होतो.कितीही झाले तरी आमची नात आता अमेरिकन नागरिकत्वाचे दुपटे/शाल सदैव अंगावर पांघरणार आहे.त्या इतमामाला साजेसेच सर्व पाहिजे.नाही का?
सध्या आमच्या घरात एक वेगळेच आनंदी वातावरण आहे मीराचे स्वागत आणि कौतुक करण्यासाठी तिचे आणखी एक आजीआजोबा पुण्याहून आले आहेत.थोडक्यात घरातील सर्व अर्धा डझन माणसांना मीराने आपल्या संगोपनासाठी कामाला लावले आहे.आपल्याकडे घरात लहान बाळाचे आगमन झाले की अनेकजण खुश होतात कारण त्यानिमित्ताने साजूक तुपातील शिरा,डिंक आणि अळीवाचे लाडू खायला मिळतात.ही यादी मोठी असते.म्हणून येथेच पुरे.अमेरिकेत डिंक/अळीव मिश्रीत बर्गर किंवा पिझ्झा कुठे मिळत असेल तर बर होईल.अवघडच आहे ते.पण आजोबा म्हणून मला आपली शंका आली इतकेच.आता लवकरच नामकरण समारंभ होईल."मीरा "नावावर आणखी एकदा 'कुर्र्र्रर्र्र्रर्र "करून शिक्कामोर्तब होईल.मग आम्ही येथल्या विमानतळावर जाऊन मुंबईच्या विमानात बसू.विमानाने आकाशात झेप घेतली की आम्हीही अमेरिकेच्या, मीराच्या,तिच्या आई बाबांच्या आठवणी काढत काढत मुंबईत उतरू आणि पुण्याचा रस्ता धरू..
शुभप्रभात:

No comments:
Post a Comment