थंडगार शुभेच्छा
नुकतेच २०१३ हे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरवात झाली आहे.एरव्ही वर्षभर न भेटणारे लोक आणि भेटूनही न बोलता लक्षपूर्वक दुर्लक्ष करणारे लोकही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मोकळे होतात.म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी पर्यंत बघायला नको. अजूनही शुभेच्छांचा कोरस सुरूच आहे.मलाही अनेकजणांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.(न द...ेऊन करतील काय बिचारे.नाहीतर वर्षभरात कोठे भेट झाली तर आपला काही खर नाही ह्या धास्तीने )यंदा विशेष म्हणजे एका मित्राने मला थंडीनिमित्त थंडगार शुभेच्छा दिल्या.आतापर्यंतच्या आयुष्यात अशा शुभेच्छा पहिल्यांदाच आल्याने त्या मिळाल्यापासूनच अगदी हुडहुडी भरली आहे बघा .त्यामुळे "ठंडी ठंडी हवा ....,ठंडी हवाये किंवा थंडगार ही हवा अशी गाणीही गुणगुणता येत नाहीत.सहजासहजी घराबाहेरही पडता येत नाही.
परदेशात सकाळच्या प्रहरीच दिवसाच्या हवामानाची घरोघर चर्चा होते.म्हणजे आज हवामान WINDY,RAINY की SUNNY,CLOUDY?आपल्याकडे काय सब घोडे बारा टक्के.लहानपणापासून चार गुणिले तीन बारा महिन्याचा एकदम हिशोब,उन्हाळा पावसाला आणि थंडी.हे कळल्यापासून ६८ वर्षे अनेक वेळा पावसाळे ,उन्हाळे आणि थंडी अनुभवली पण यंदाची थंडी काही औरच दिसतेय.ह्या थंडीची मी कौटुंबिक सामाजिक सांगीतिक रूपे बघितलीत.पाहुणा घरी आला की डासांच्या तोंडाला कसं पाणी सुटत तसं अमेरिकेच्या थंडीचे आहे कि काय असे वाटते.ह्या अमेरिकन थंडीने मला अगदी घर र्कोंबडा केलय.अर्थात ह्याचा फायदा अनेक वाचक मित्रांना मात्र होतोय.मराठी काकांनी मला मराठी टंकन कलेची दीक्षा दिल्याने मी काहीतरी (ते) लिहू शकतो.नाहीतर अशा थंडीत घरी बसून माझ्यासारखा माणूस काय करणार?
ह्या थंडीमुळे सकाळी कधीही उठलो म्हणजे दहाला सुधा तरी सहालाच उठल्यासारखे वाटते.मग नेहमीचे चाकोरीबद्ध कार्यक्रम सुरु होतात.दुपारीतर तीन वाजल्यापासूनच तिन्हीसाअनजा वातावरण भासू लागते आणि पाचलाच अंधेरनगरी राज्य सुरु होते.त्यामुळे घराबाहेर पडायला नको वाटते.सारांश थंडीमुळे आता "सातच्या आत घरात "ऐवजी "चारच्या आतच घरात" अशी हवा आहे.बर बाहेर् तरी पटकन जाता येते का?थंडीचे भरमसाठ कपडे थर दिल्याप्रमाणे एकावर एक घालावे लागतात. बनियन,थर्मल,टीशर्ट किंवा सुखी/दुखी माणसाचा जो असेल तो सदरा,आणि ह्या सर्व प्रजेला कुशीत घेणारे एखादे जाकीट किंवा मानेवर उसवलेला कोट,हे नसेल तर लोकरीचे चिलखत आणि लोकरीचाच जिरेटोप/मुगुट,पुरुषांची कर्णफुले (किमत अवघी रुपये दहा),हातमोजे ,पायमोजे,गळफास लावणारा मफलर इ.इ.अरे बापरे आपल्या मानेचा उपयोग एकाद्या हंगरप्रमाणे किंवा एक मोठी खुंटी समजून करणार तर.जामानिमा करायलाच इतका वेळ तर मग बाहेर जायचे कशाला .त्यापेक्षा घरीच थंडीचे काहीतरी पीत बसलेले बरे (म्हणजे चहा,कॉफ्फी,दुध वगैरे )असो.ह्या थंडीच्या निमात्ताने एक थंडगार काव्य (पंक्ती)आठवल्या .त्या अशा- -
|सकाळी वाजताच थंडी,घालावी बंडी,खावी अंडी,प्यावी ब्रांडी,थोडी थोडी|
शुभप्रभात:

No comments:
Post a Comment