विनम्र श्रद्धांजली ...सर्जेराव घोरपडे (प्रेस्टीज प्रकाशन पुणे)
आज आणि आताच सकाळ वाचला.प्रेस्टीज प्रकाशनचे श्री सर्जेराव घोरपडे गेले.त्यांनी अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली.उदा.यशवंतराव चव्हाण_कृष्णाकाठ ,गदिमा,पु.ल.ची पंचाहत्तरी इ.इ.पण माझ्या दृष्टीने आणखी एका संदर्भ ग्रंथाची भर म्हणजे आचार्य अत्रे -प्रतिमा आणि प्रतिभा- १९९७ साली आचार्य अत्रे ज...न्मशताब्दी निमित्ताने प्रेस्टीज प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केला.ह्या ग्रंथ प्रकाशनात माझा खारीचा वाटा आहे ह्याचा मला विशेष आनंद आहे.माझ्या अत्रे साहित्य संग्रहाचा भरपूर उपयोग सर्जेरावना हा ग्रंथ प्रकाशित करताना झाला.ह्या निमित्ताने आमची बर्याच वेळा भेट झाली,चर्चा झाली.अनेक लेख ,कात्रणे,अग्रलेख,बातम्या उपयोगी पडल्या.अत्रे जयंतीच्या दिवशी बाल गंधर्व रंगमंदिरात माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले.ह्या निमित्ताने प्रेस्टीज प्रकाशनने माझा सत्कार श्री.चंद्रचूड यांच्या हस्ते केला.त्याचवेळी आचार्य अत्रे साहित्य दर्शन हे माझे वाण्ग्मयीन प्रदर्शन आयोजित केले होते.अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली होती........एक फोटो पाहुण्यासमवेत .
आज ह्या आठवणी सर्जेरावांच्या जाण्याने उफाळून आल्या.माझी विनम्र श्रद्धांजली

No comments:
Post a Comment