दैनंदिनी (म्हणजे मराठीत डायरी )
नवीन वर्ष सुरु होऊन दहा दिवस होऊन गेले.पण मला मात्र नवीन वर्ष सुरु झाल्याचे काही जाणवत नाही.कारण डिसेंबर महिन्यातच पुढील संपूर्ण वर्षभर आमच्या घरी ठिय्या देणारी माझी जीवलग सखी अजून आलेली नाही.असे कधी झाले नाही हो.येथे दोन मोठ्या स्टेशनरींच्या प्रचंड वखारीतही तिचा खूप शोध घेतला.पण पाहिजे तशी,आखूड शिंगी,कमी किमतीची सखी मिळालीच नाही.त्यामुळे ...चुकल्यासारखे झाले आहे.तशी तूर्तास वेळ भागवली आहे.पण तिची सर नाहीये हे खर|सखी म्हणजे दैनंदिनी म्हणजेच मराठीत डायरी. जाऊ द्या तुमची उत्सुकता तरी किती ताणायची?इंग्रजीमध्ये एक म्हण आहे आणि ती माझ्या वडिलांनी मला डायरी विकत घेण्याची ऐपत नसतानाच सांगितली होती.ती अशी ":ONE'S DIARY IS A ONE'S FAITHFUL FRIEND WHICH CAN TELL ALL THE SORROWS AND JOYS OF ONE'S LIFE "(डायरी हा एकाद्याचा असा मित्र आहे, जो त्याला त्याच्या आयुष्याची सर्व सुखदुखे सांगतो) फक्त मतितार्थ लक्षात घ्या ही नम्र विनंती.
गेल्या आठवड्यातच डायरीच्या किमती आणि हल्ली असलेली नगण्य मागणी ह्याविषयी वाचले.आता सर्व काही संगणकावर असते.त्यामुळे डायरी लिहिण्याचा नसता उद्योग म्हणा किंवा वेडेपणा म्हणा कोण करणार?(हे विधान माझ्यासाठी नाही.)खरतर आपल्या सवयी आणि आवडीनिवडी चव्हाट्यावर कशाला आणायच्या हा विचार माझा होता.पण एक उदाहरण म्हणून असे सांगावेसे वाटते की कोणत्याही वर्षी कोणताही संकल्प न करता मी गेली चार तपे (करा गुणाकार) डायरी लिहितोय आणि ती सुद्धा अपटूडेट म्हणजे अगदी कालपर्यंत. ह्या डायरीची पाने फडफडायला लागली म्हणजे मन सैरावैरा धावते.भूतकाळात डोकावते.आनंदाने बेहोष होते आणि दुखा:ने व्याकूळ होते.डायरी लिहिण्याची सवय ही मला कोणाच्या उपदेशामुळे किवा जबरदस्तीमुळे लागली नाही तर कौटुंबिक परिस्थितीमुळे माझी मीच लावून घेतली.माझ्या वडिलांच्या निधनानंतर म्हणजे ऑगस्ट १९७० नंतर मीच कुटुंबप्रमुख झालो आणि आहे त्या प्रपंचाची जीवननौका अनेक प्रकारच्या वादळाशी सामना करत यशस्वी होण्यासाठी मला माझी डायरी चांगलीच साथ देत आहे.बँकेच्या नोकरीत असताना मला अनेक प्रसंगांच्या वेळी डायरी उपयोगी पडली आहे.ही माझी सवय अनेकांना माहित आहे पण click आज करतोय.
मार्च १९६९ मध्ये मुंबईला आचार्य अत्रे ह्यांची समक्ष भेट घेतलत्या दिवसाची माझी डायरी १७ पानांची आणि ४२५ ओळींची असून त्या आधारेच "आचार्य अत्रे भेट _पहिली आणि शेवटचीच "हा लेख मी लिहू शकलो हे विशेष.त्या प्रमाणेच पु.ल.देशपांडे,अशोककुमार आणि पंडित भीमसेन जोशी ह्या माझ्या दैवतांच्या भेटी ही डायरीत शब्दबद्ध केल्या आहेत.तरीही ही एका सर्वसामान्य माणसाचीच डायरी आहे.कारण मी कोणी विचारवंत,कलावंत किंवा प्रज्ञावंत नाहीये.फक्त मनात असेल तर कोणीही माणूस आपले इप्सित साध्य करू शकतो हेच ध्यानात घ्यायला हवे.
शुभप्रभात:See More

No comments:
Post a Comment