बोकील म्हणजे.....अमक्याचे तमके कोण हो?
आमचं"बोकील " हे आडनाव हे काही कालपरवाचे नाही.चांगलं जुन्या काळापासून म्हणजे बघा पेशवे काळापासून सर्वांना माहित आहे.बोकील आडनाव असलेली प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सखारामबापू बोकील. हे अतिशय कर्तबगार पुरुष होऊन गेले.iइ.स.१७४८ मध्ये पुण्यातील गणेश पेठ साखराम् बापूनी स्थापन केल्याचे वाचण्यात आले.तसे बोकील कुटुंबीय हे मुक्काम पो.कोरेगाव (जि....सातारा ) ह्या गावचे.आम्ही बोकीलपण ह्याच कोरेगावचे मुळ रहिवासी.पूर्वी आमचे गाव हे "बोकील बर्ग्यांचे कोरेगाव"म्हणून ओळखले जायचे कारण बोकील आणि बर्गे आडनावाची अनेक घरे तेथे अजूनही आहेत.अशी वैशिष्ट्ये असलेली अनेक गावे महाराष्ट्रात आहेत.बहुतांश जगताप आडनाव असलेले लोक सासवडचे असतात.सासवड जवळील हिवरे ह्या गावातही बोकील कुटुंबीय जुन्या काळापासून आहेत.अर्थात ही माहिती ज्येष्ट लोकांनाच आहे.माझ्या माहितीप्रमाणे सखारामबापू बोकिलांच्या नंतर दुसरे प्रसिद्ध असलेले बोकील म्हणजे सुप्रसिद्ध लेखक वि.वि.बोकील.हे सासवड/ हिवरे गावचेच होते.हल्ली मात्र विविध क्षेत्रात अनेक बोकील मंडळी आपल्या नावाची मुद्रा निर्माण करून मोठ्या मानाने जीवन जगताहेत.त्यात सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक,साहित् यिक आणि पत्रकारिता इ.इ.क्षेत्रे आहेत.ह्या क्षेत्रातील नामवंत मंडळींची नामावली सर्वांना माहित आहेच.
माझ्या विद्यार्थीदशेत मी फक्त "बोकील" होतो.त्यात माझी काय कर्तबगारी होती?
पणजोबा,आजोबा,आणि वडील बोकील म्हणून मीही बोकील एवढेच.पण लहानपणी मला सर्वजण अमके अमके बोकील आहेत ते तुमचे कोण?असा प्रश्न करून उगीचच गोंधळून टाकत.उदा.डोळ्याचे डॉक्टर बोकील तुमचे कोण?अन ते दाताचे डॉक्टर बोकील तुमच्यापैकीच का?कारण आपल्या व्यवसायामुळे ह्या मंडळींचे "नाव "झाले होते.सगळ्यात कहर म्हणजे "वि,वि,बोकील लेखक तुमचे कोण ?"ह्या प्रश्नाने केला.अर्थात लोकांचेही काही चुकत नव्हते.मग मी सुधा "लेखक बोकील हे आमचे आडनाव बंधू आहेत"असे उत्तर फेकत असे.असे सर्वत्र होत असे.अगदी बँकेतपण हाच अनुभव येत असे.एकदा तर गमतच झाली.SBI सातारा शाखेला असताना (४०/४५ वर्षापूर्वी)मुंबईहून रिजनल म्यानेजर शाखा भेटीसाठी सातारला येणार होते.ते साहेब मराठी म्हणजे महाराष्ट्रातीलच होते.पण अतिशय कडक म्हणून त्यांचा दबदबा होता.त्यामुळे आम्ही सर्वजण जरा टरकुन च होतो.भेटीच्या दिवशी आमच्या शाखाधिकार्यांनी ओळख परेड घेतली.मोठे साहेब (R.M.)प्रत्येकाच्या टेबलाजवळ जाऊन काहीतरी विचारात होते.माझ्याजवळ जसे येवू लागले तसे मला धडधडायला लागले.म्हटलं आता आपले खरे नाही.काय विचारणार?माझ्या टेबलासमोर आल्यावर "सर मी सुहास बोकील ......"असे होते नव्हते ते सर्व धाडस गोळा करून त्यांना सांगितले. त्या साहेबांनी मला लगेचच विचारले "बोकील म्हणजे वि.वि.बोकीलांचे पैकीच का ?त्यांचे तुमचे काही नाते?हे ऐकताच मा झ्या अंत करणाची
एकदम कुल्फी मलई झाली.डोक्यात बर्याच वेळ असलेल्या मुंग्या त्यांच्या ह्या प्रश्नाने झपाट्याने वारुळाबाहेर पडू लागल्या.असे एकेक गमतीचे प्रसंग अनुभवले.
नंतर मात्र मी सर्वांना खास आत्रेय शैलीत उत्तर देऊन प्रश्न कर्त्याला निरुत्तर करू लागलो.म्हणजे सन्मानानेच कटुता न ठेवता.कोणीही विचारले "का हो लेखक वि.वि.बोकीलांचा आणि तुमचा काय संबंध?"मग मी ताडकन सांगत असे "दक्षिण ध्रुवाचा आणि उत्तर ध्रुवाचा जेवढा संबंध तेवढाच आमचा संबंध.तरी पण आम्ही दोघेही लेखकच आहोत.त्यांनी "बुके "लिहिली आणि मी बँकर असल्याने "डे-बुके " लिहिली."एवढाच काय तो फरक आहे.मग हास्यविनोदात थोडा वेळ जायचा.
लेखक वि.वि.बोकीलांचा आणि माझा कधी संबंधही आला नसल्याने माझा त्यांचा परिचय नव्हता.पण त्यांचे बरेच नातलग माझ्या चांगल्या माहितीचे आहेत.ते सासवडचे होते आणि आचार्य अत्र्यांना वि,वि,बोकील आणि वि.वा.हडप ह्यांचे लिखाण फार आवडत असे.
शुभप्रभात
आमचं"बोकील " हे आडनाव हे काही कालपरवाचे नाही.चांगलं जुन्या काळापासून म्हणजे बघा पेशवे काळापासून सर्वांना माहित आहे.बोकील आडनाव असलेली प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सखारामबापू बोकील. हे अतिशय कर्तबगार पुरुष होऊन गेले.iइ.स.१७४८ मध्ये पुण्यातील गणेश पेठ साखराम् बापूनी स्थापन केल्याचे वाचण्यात आले.तसे बोकील कुटुंबीय हे मुक्काम पो.कोरेगाव (जि....सातारा ) ह्या गावचे.आम्ही बोकीलपण ह्याच कोरेगावचे मुळ रहिवासी.पूर्वी आमचे गाव हे "बोकील बर्ग्यांचे कोरेगाव"म्हणून ओळखले जायचे कारण बोकील आणि बर्गे आडनावाची अनेक घरे तेथे अजूनही आहेत.अशी वैशिष्ट्ये असलेली अनेक गावे महाराष्ट्रात आहेत.बहुतांश जगताप आडनाव असलेले लोक सासवडचे असतात.सासवड जवळील हिवरे ह्या गावातही बोकील कुटुंबीय जुन्या काळापासून आहेत.अर्थात ही माहिती ज्येष्ट लोकांनाच आहे.माझ्या माहितीप्रमाणे सखारामबापू बोकिलांच्या नंतर दुसरे प्रसिद्ध असलेले बोकील म्हणजे सुप्रसिद्ध लेखक वि.वि.बोकील.हे सासवड/
माझ्या विद्यार्थीदशेत मी फक्त "बोकील" होतो.त्यात माझी काय कर्तबगारी होती?
पणजोबा,आजोबा,आणि वडील बोकील म्हणून मीही बोकील एवढेच.पण लहानपणी मला सर्वजण अमके अमके बोकील आहेत ते तुमचे कोण?असा प्रश्न करून उगीचच गोंधळून टाकत.उदा.डोळ्याचे डॉक्टर बोकील तुमचे कोण?अन ते दाताचे डॉक्टर बोकील तुमच्यापैकीच का?कारण आपल्या व्यवसायामुळे ह्या मंडळींचे "नाव "झाले होते.सगळ्यात कहर म्हणजे "वि,वि,बोकील लेखक तुमचे कोण ?"ह्या प्रश्नाने केला.अर्थात लोकांचेही काही चुकत नव्हते.मग मी सुधा "लेखक बोकील हे आमचे आडनाव बंधू आहेत"असे उत्तर फेकत असे.असे सर्वत्र होत असे.अगदी बँकेतपण हाच अनुभव येत असे.एकदा तर गमतच झाली.SBI सातारा शाखेला असताना (४०/४५ वर्षापूर्वी)मुंबईहून रिजनल म्यानेजर शाखा भेटीसाठी सातारला येणार होते.ते साहेब मराठी म्हणजे महाराष्ट्रातीलच होते.पण अतिशय कडक म्हणून त्यांचा दबदबा होता.त्यामुळे आम्ही सर्वजण जरा टरकुन च होतो.भेटीच्या दिवशी आमच्या शाखाधिकार्यांनी ओळख परेड घेतली.मोठे साहेब (R.M.)प्रत्येकाच्या टेबलाजवळ जाऊन काहीतरी विचारात होते.माझ्याजवळ जसे येवू लागले तसे मला धडधडायला लागले.म्हटलं आता आपले खरे नाही.काय विचारणार?माझ्या टेबलासमोर आल्यावर "सर मी सुहास बोकील ......"असे होते नव्हते ते सर्व धाडस गोळा करून त्यांना सांगितले. त्या साहेबांनी मला लगेचच विचारले "बोकील म्हणजे वि.वि.बोकीलांचे पैकीच का ?त्यांचे तुमचे काही नाते?हे ऐकताच मा झ्या अंत करणाची
एकदम कुल्फी मलई झाली.डोक्यात बर्याच वेळ असलेल्या मुंग्या त्यांच्या ह्या प्रश्नाने झपाट्याने वारुळाबाहेर पडू लागल्या.असे एकेक गमतीचे प्रसंग अनुभवले.
नंतर मात्र मी सर्वांना खास आत्रेय शैलीत उत्तर देऊन प्रश्न कर्त्याला निरुत्तर करू लागलो.म्हणजे सन्मानानेच कटुता न ठेवता.कोणीही विचारले "का हो लेखक वि.वि.बोकीलांचा आणि तुमचा काय संबंध?"मग मी ताडकन सांगत असे "दक्षिण ध्रुवाचा आणि उत्तर ध्रुवाचा जेवढा संबंध तेवढाच आमचा संबंध.तरी पण आम्ही दोघेही लेखकच आहोत.त्यांनी "बुके "लिहिली आणि मी बँकर असल्याने "डे-बुके " लिहिली."एवढाच काय तो फरक आहे.मग हास्यविनोदात थोडा वेळ जायचा.
लेखक वि.वि.बोकीलांचा आणि माझा कधी संबंधही आला नसल्याने माझा त्यांचा परिचय नव्हता.पण त्यांचे बरेच नातलग माझ्या चांगल्या माहितीचे आहेत.ते सासवडचे होते आणि आचार्य अत्र्यांना वि,वि,बोकील आणि वि.वा.हडप ह्यांचे लिखाण फार आवडत असे.
शुभप्रभात
No comments:
Post a Comment