Wednesday, February 26, 2014

सिटी बस (VTA)

नुकतेच मी LAWRENCE EXPRESS WAY ह्या सनीवेल शहराच्या गळ्यातील रत्नहाराचे वर्णन तुम्हाला ऐकवले आता येथील सिटीबस सेवा कशी आहे ह्याचा थोडक्यात आढावा.ह्या विभागात VTA (Valley Transportation Authority)ह्या कंपनीची वाहतूक व्यवस्था कार्यरत आहे.सिटीबस आणि लाइटरेल द्वारे जनतेची वाहतूक होते.जसे PMPML,KMT,TMT तसेच येथे VTAआहे. पण बसने नियमित प्रवास करणारी मंडळी फार... थोडी असल्याने बस् वाहतूक तोट्यात असल्याचे कळले.तरीपण माझ्यासारखा हौशी प्रवासी एक दिवसाचा( DAYPASS)पास काढून कंपनीचा तोटा कमी करण्यास हातभार लावतोय. त्यामुळे बस क्रमांक 55 म्हणजे ग्रेट अमेरिका ते डी अन्झा कोलेज ह्या मार्गची आणि माझी चांगलीच मैत्री जमली आहे,आठवड्यातून एक दिवस तरी मी ही सफर करतो.बर्याच वेळा बसमध्ये मी आणि ओपरेटर] म्हणजे आपला ड्रायव्हर असतो.पण हा ड्रायव्हर म्हणजे बसचा एकखांबी तंबूच असतो.सर्व प्रवाश्यांना विशेष करुन ज्येष्ट नागरिक ,अपंग,सायकलस्वार ह्यांना सर्वतोपरी सहकार्य हाच एकमेव परमात्मा करीत असतो.गर्दी दिसली की डबल बेल मारणारा,आणि बस स्टोपच्या पुढे नेऊन बस उभी करायला लावून स्टोप वरील प्रवाशांना रुन्स(धावा) काढायला लावणारा कंडक्टर नामक इसम येथील बसमध्ये अजिबात नसतोच.किती चांगली बाब आहे ना. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी आणि ड्रायव्हर ह्यांचे खरोखरीचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध मी नेहमी अनुभवतोय.अगदी बसमध्ये आल्याबरोबर गुड मोर्निग म्हणत शेजारच्या मशीनमधून प्रथम पैसे टाकणार किवा क्लीपर कार्ड स्वेइप/पंच करून मग तिकीट किवा पास घेऊन सीटवर जाऊन बसणार.आपल्या इच्छित स्तोपवार उतर्तानादेखील ड्रायव्हरला न चुकता THANK YOU म्हणणार.मग तो प्रवासी कोणीही असो.

येथे सर्व बसमधून प्रवाश्यांना लागणारी सर्व माहिती,वेळापत्रक ,सूचना इ.उपलब्ध असते.सर्व सूचना तीन भाषेत असतात.म्हणजे इंग्रजी,स्पानिश आणि चायनीज.सिंगल/डबल बेल हा प्रकार नाही.साखळी ओढूनच प्रवाशी ड्रायव्हरला सूचना देतात.ज्येष्ठाना आणि अपंग व्यक्तींना अमेरिकेतच नव्हे तर सर्वत्र आदराची मानाची
वागणूक मिळते.कोणीही त्यांना कमी लेखून हिडीसफिडीस केल्याचे आढळून आले नाही.
व्हील चेअरवरून बसमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांना तर अत्यंत काळजीपूर्वक वागणूक दिली जाते. thank you आणि sorry चा नारा सदैव सर्वत्र सुरु असतो.

अमेरिकेत जर गाडी नसेल तर फारच हाल होतात.त्यामुळे बाहेर जाण्यासाठी हेच एक हक्काचे वाहन सर्वत्र दिसते.ऑटो रिक्षा,स्कूटर अजिबात नाहीत.सायकलला बाईक म्हणतात आणि बाईकस्वार देखील मोठ्या रुबाबात रस्त्याने जात असतात.प्रत्येक घरात प्रत्येकाची वेगळी गाडी असतेच.बसने प्रवास करणे हे येथे नाही.त्यामुळे मोटारीच्या अड्ड्यावर जाऊन परगावी जायचे हा प्रकार येथे नाही.माणसापेक्षाही गाड्या जास्त आहेत की काय अशी शंका येते.मोटोरसायकल म्हणजे आपली फटफटीची किमत एकाद्या चार चाकीपेक्षाही अधिक असते. taxis आहेत.बहतेक सरदारजीच हा व्यवसाय करताहेत.अशा अवस्थेतही VTA सारखी कंपनी कालीफोर्नियामध्ये वाहतुकीची धुरा चालवत आहे म्हणून आमच्या सारख्या लोकांचे हाल थोडे कमी होताहेत.नाहीतर घरात बसून समोरच्या Lawrence मार्गावरील सर्व गाड्या मोजण्याची वेळ आली असती.आणि येथे राहण्याचे दिवस मोजण्याची सुद्धा.|

शुभप्रभात:

No comments:

Post a Comment