Friday, February 28, 2014

अत्रे उवाच : माझ्या लहानपणी घरात कोणालाच साहित्याची आवड नव्हती.आमच्या घराण्यामध्येही कोणालाच साहित्याची आवड नसल्याने पुस्तकेही नसायाची. घरात फक्त एकच पुस्तक असायचे ते म्हणजे" पंचांग."

महाराष्ट्राला वंदन

नमस्ते श्री महाराष्ट्रा,स्वातंत्र्याच्या जवाहरा/तीन कोटी मराठ्यांच्या पितृदेवा परात्परा,

संतांच्या वंद्य माहेरा,वीरांच्या बलसागरा /तुला निर्मून झाली ही धन्य वाटे वसुंध...रा,

तुझे गोटे,तुझे काटे,फुलांची शेजही मला /कणी कोंडा तुझा आहे गोड मांड्याहूनी मला,

महाराष्ट्रा तुझ्या पायी असो माझे साष्टांग वंदन /तुझ्या साठी झिजो माझ्या देहाचे नित्य चंदन,

महाराष्ट्रा तुझ्या पायी घालू लोटांगणे किती /तुझी गीते तुझी स्तोत्रे भक्तीने गाऊ मी किती?
आचार्य अत्रे(संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुरुंगातून बाहेर आल्यावर) शुभ प्रभात

No comments:

Post a Comment