अवघी दुमदुमली साहित्यपंढरी _मुक्काम पोस्ट सासवड
नववर्षाची सुरवात मराठी साहित्य संमेलनाने झाल्याने साहित्यिक जगतात एक वेगळेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अर्थात कोणतेही संमेलन, मेळावा म्हटला की लोकांमध्ये आनंदाचा, उत्साहाचा महापूर येतोच.मी पण आतापर्यंत १०-१२ साहित्य संमेलनाला हजर राहिलोय.पण नेमके आचार्य अत्रे ह्यांच्याच गावच्या म्हणजे सासवडच्या साहित्य संमेलानास मी परदेशी असल्या...ने हजर राहू शकत नाहीये ह्याची मनाला जरूर खंत वाटत आहे.तरीपण रोजच्या वर्तमानपत्रातून सर्व माहिती वाचत असल्याने शरीराने नसलो तरी मनाने क-हा नदीच्याकाठी असलेल्या सरदार पुरंदर्यांच्या वाड्याभोवती, संगमेश्वराच्या देवळाजवळ वसलेल्या सासवड येथेच आहे.
आचार्य अत्रे ह्यांनी आपल्या "मी कसा झालो" व" क-हेचे पाणी "आत्मचरित्रात सासवड चे सुंदर वर्णन केले आहे.ते अत्रेप्रेमी वाचकांनी नक्कीच वाचले असेल.त्याच सासवड मध्ये ८७ वे मराठी साहित्य संमेलन भरत आहे ही अत्यानंदाचीच बाब आहे.अत्रे जन्म शताब्दीच्या वर्षात माझे अत्रे साहित्य संमेलन सासवडला मी भरवले होते हा एक माझ्या जीवनातील आनंदाचा प्रसंग आहे." क-हा काठ "ही स्मरणिका पाहण्याची आणि वाचण्याची आता मला उत्सुकता आहे.विशेष आनंदाची बाब म्हणजे अत्रेकलादालन सासवडला निर्माण केले आहे.
मराठी माणसाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे हळू हळू विस्मृतीत जात असलेल्या आचार्य अत्रे ह्यांची आठवण पुन्हा एकदा उफाळून आली आहे."अत्रे म्हणजे कोण रे भाऊ ?"असे विचारण्याची वेळ नवीन पिढीला येणार नाही.महाराष्ट्राच्या ह्या महापुरुषाची स्मृती जागृत झाली हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणायचे..
सासवडच्या ह्या संमेलनास माझ्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. शुभप्रभात

No comments:
Post a Comment