मित्रांनो आज १ डिसेंम्बर मला अमेरिकेत येऊन आज २ महिने झाले.खरतर माझी हि अमेरिकेची दुसरी वारी आहे.जुलै १९९९ मध्ये आचार्य अत्रे साहित्य दर्शनाच्या निमित्ताने BMM अधिवेशनाला आलो होतो.आचार्य अत्रे सर्व जगभर संचार करून आले होते पण अमेरिकेला गेले नव्हते म्हणून त्यांना मरणोत्तर का होईना मी अमेरिकेला आणतोय ह्याचा त्यावेळी मला खूप आनद वाटत होता.महाराष्ट्राच्या ह्या बलदंड महापुरुषाला सातासमुद्रापार आणल्याचे... समाधानही वाटत होते.परदेशात हे प्रदर्शन भरविण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता.ह्या वेळी मात्र माझी वारी आचार्य अत्रे शिवाय आहे. गेले २ महिने मी अमेरिकेतील जीवन अनुभवतोय.मागे मी म्हटल्याप्रमाणेच" मनोरथा चल त्या नगरीला" गीताची सारखी आठवण येते.येथे सर्वच भव्य आणि दिव्य.मी लेखक असतो तर वाचकांना चांगले अमेरिका दर्शन घडवले असते.जे जे काही पाहिले,अनुभवले ते सर्व अदभूत अफाट आणि अचाटच.काही काही घटना कॅमेरात बंद केल्या आहेत.अधून मधून facebook वर टाकतोच येथे आता थंडीही चांगलीच जाणवत आहे.त्यामुळे संध्याकाळी सातच्या आत ऐवजी चारच्या आताच घरीयेतो. Laptop आणि कॅमेरा ह्यांच्याशी घट्ट जवळीक निर्माण केली आहे.मधूनच अनेकांशी फोनाफोनी होते.एकंदरीतठीकचआहे. सर्वांना नमस्कार.See More
No comments:
Post a Comment