SUNNYVALE(सनीवेल -खुर्द आणि बुद्रुक)
मी अमेरिकेत आल्यापासून आमचा तंबू सनीवेलमध्येच ठोकला आहे.सनीवेल हे कॅलिफोर्नियामधील एक विकसित शहर/विभाग आहे.आसपास मिलपिटस,मौटन व्ह्यू,सान होजे,संता क्लारा इ.इ.उपनगरे आहेत.सर्व उपनगरे एकमेकाशी निगडीत आहेत.आधी कॅलिफोर्निया हेच अमेरिकेचे एक महत्वाचे राज्य आहे."कोकणाचा कॅलिफोर्निया "सारखे सारखे वापरून आणि ऐकून गुळगुळीत झालेल्या ह्या शब्...दप्रयोगावरून लक्षात येईलच. पण सनिवेल् पूर्व कोणते आणि पश्चिम कोणते हे समजेना.बर एकाद्या अमेरिकन "गुरुजीना"विचारावे तर तेही अवघडच.अशा' दिशाहीन 'परीस्थितीत मी माझ्यापुरती एक खुणगाठ मनाशी बांधली ती अशी :
सानिवेल्च्या मध्यातून Lawrence express way मोठ्या दिमाखाने जातो.ह्या रस्त्याच्या अल्याड खुर्द आणि पल्याड बुद्रुक सनीवेल मानायचे म्हणजे झालं.आमची AVALON community ही खुर्द भागात असून काही फुटावरूनच Lawrence मार्ग जातो.गेल्या 5 महिन्यातील माझे निरीक्षण,अनुभव इ.असे आहेत.
सनीवेल (खुर्द)
आम्ही रहात असलेल्या निवासी संकुलात 750 निवासी गाळे(flats)आहेत.Avalon प्रमाणेच MARRIOTT RESIDENCY सुद्धा ह्याच भागात असून आणखीही काही निवासी घरे आहेत.पण प्रामुख्याने अनेक कार्यालये,कंपनीज,व्यापारी संकुले,औद्योगिक संस्था आहेत.मी रोज प्रभात् फेरीला (मोर्निंग वॉक) जातो तेंव्हा अनेक कंपन्या मंदीच्या काळात बंद पडलेल्या दिसतात.ब-याच इमारती आणि मोठाली पार्किंगस भकास अवस्थेत असून NOW LEASING/FOR LEASING असे बोर्ड्स कपाळी लावून खरेदीदाराची वाट पाहत आहेत.ह्या भागातच OAKMEAD VILLAGE आहे.फार पूर्वी ओंकमीड हे खेडेगाव असल्याने अनेक ठिकाणी, इमारतीवर, रस्त्यावर ह्याचा उल्लेख होतो.काही प्रसिद्ध कंपन्या ,OTIS,DOLBBY,ABBOT,WI-FI ALLIANCE,HONEYWEl etc येथेच आहेत.अनेक व्यापारी संकुलातून ठराविक दुकाने आहेत,FLORIST,HAIR AND NAILS,PRESS/CLEANERS, ZEROX,ACCUPUNCTURE etc. मेक्सिकन ग्रील इटालिओन /थाई चायनीज फूड मिळणारी तसेच sub way,Mc Donald हॉटेल्स पण आहेत.चायनीज डॉक्टरांचे दात/डोळे क्लिनिक्स,WELLS FORGO BANK इतरही अनेक बँका इकडेच आहेत.बराचसा भाग commercial असल्याने असंख्य मोटारी धावत असतात.
LAKESIDE DRIVE( POND)-या इथे तरुतळी ...........
ह्याच भागाला lakeside drive आहे.AVALON म्हणजे आमच्या सोसायटीच्या बरोबर समोरच POND( छोटे तळे )आहे तळ्याचा.हा परिसर, स्थानिक परिषदेने चांगलाच रमणीय केला/ठेवला आहे.बहुतेक पूर्वी oakmead गावाचा आंबील ओढा येथे असावा असे मला वाटते.प्रथम मी जेंव्हा ह्या तळ्याला भेट दिली तेंव्हा उमर् खय्यामाची प्रसिद्ध रुबाई 'या इथे तरुतळी ,सुरई एक सुरेची,खावया भाकरी अन वही एक कवितेची " आठवली.तळ्यामध्ये चार कारंजी असून ती नेहमीच उसळत्या/उचमबळत्या स्थितीत दिसतात.कोणतेही कारंजे कधीही बंद पडल्याचे मी अद्याप पहिले नाही हे विशेष.तळ्यात अनेक प्रकारची बदके असून त्यांची पिल्ले सर्वत्र मुक्तपणे संचार करीत असतात.तळ्याच्य काठाकाठाने सुंदर पदपथ तयार केले असून चार लाकडी पूल आणि बरीच बाके आहेत.अनेक प्रकारची फुलझाडे तळ्याकाठी येणा-यांचे लक्ष वेधून घेतात.एकूणच परिसर फार रमणीय,मनमोहक असा असल्याने नागरिक जीवनातील आनंद उपभोगत आहेत.तळ्याच्या काठीच एक अमेरिकन हॉटेल आहे.मग काय विचारता?enjoy and cheers cheers cheers.
सनीवेल (बुद्रुक) आता नंतर पाहू,
शुभप्रभात

No comments:
Post a Comment