Thursday, February 27, 2014

शुभ प्रभात . मातृपितुदेव भव

काल मी माझं गाव कोरेगाव आणि आमची कुलस्वामिनी श्री तुरजा भवानीचे स्मरण केले.फार बर वाटलं मनाला.सातासमुद्रापार असूनही आपले ते आपलेच असते नेहमी नाही का? हे लिहिल्यानंतर साहजिकच मला माझ्या आई वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली.म्हणून आज ही सुमनांजली त्यांच्या चरणी अर्पण करतोय.

आईची महती अनेकांनी आपल्या लेख आणि काव्य द्वारे वर्णिली आहे.मी त्यात क...ाय वेगळी भर घालणार?पण माझी आई श्रीमती मालती बोकील ही एक सर्वसामान्य,मध्यमवर्गीय स्त्री होती.फार शिकलेली होती असही नाही.तरीपण आपल्या बाल विकास मंदीर ह्या बालशिक्षण केंद्राच्या मार्गांनी समाजातील अनेक गोरगरिबांच्या बालकांना आपल्या कुवतीप्रमाणे ज्ञानार्जन केले,त्यांच्यावर चांगले संस्कार केले.हे कार्य तिने १९५२/ ५३ पासून केले.सुरवतीला फलटण आणि सातारा येथील बालविकास मंदिरे पाहून आपल्या गावी म्हणजे कोरेगावला आमच्या राहत्या घरातच बालवाडी सुरु केली.आईला मुळातच लहान मुलांची खूप आवड असल्यानेच हे शक्य झाले.शिवाय कौटुंबिक गाडा ओढायलाही तेवढीच मदत होत असे.त्यानंतर सातारा येथे करंदीकर वाडा,शनिवार पेठ,यादोगोपालातील खडकेश्वर मंदिर ,ज्ञानेश्वर मंदिर येथेही आईने बालवाड्या चालविल्या.काहीकाळ पेण येथील मनोहर हाल येथेही अशीच नोकरी केली.वार्षिक स्नेहसंमेलन,सहल,सार्वजनिक सण उत्सव मोठ्या आनंदात ,
उत्साहात साजरे केले.१९७५ साली सातारच्या एका रोटरी क्लबने शिक्षक दिनानिमित तिचा सत्कारही केला.मुख म्हणजे अनेक अडचणी आणि संकटे ह्यांना तोंड देत आम्हाला घडविले.पुढे मी कोल्हापूर येथे बदलून गेल्यावर आईचे हे जीवन सर्वार्थाने
थांबले.१९८३मध्ये दत्तजयंतीच्य सुमारास आईने ह्या दुनियेचा कायमचा निरोप धेतला.डोळे भरून येताहेत. पुढे लिहवत नाही. आजचा पूर्णविराम

No comments:

Post a Comment