EL CAMINO REAL - HISTORIC ROAD IN CA USA
(sunnyvaleचा लक्षमी रोड )
मध्यंतरी मी Lawrence ex. way बद्दल लिहिले होते.आता' अल कमिनो रीअल 'ह्या ऐतिहासिक रोडबद्दल थोडेसे.मुळात हा स्पानिश शब्द आहे.त्यामुळे लक्षात रहात नसे.सुरवातीच्या दिवसात तर ह्या रोडने माझ्या स्मरण शक्तीची सारखी परीक्षाच घ्यायचे ठरविले होते.मी सर्वत्र त्याचे स्पेलिंग आणि उच्चार लिहून ठेवले.बर्याच वेळा 'ह्या'... नावाचा सारखा जपही करीत असे.आता परिस्थिती चांगलीच सुधारली असून झोपेतही ताडकन उठून ' अल कमिनो रिआल ' बिनधास्त उच्चारू शकतो.ह्या रोडला रॉयल रोड म्हणूनही ओळखतात तर कॅलिफोर्निया स्टेट रूट नंबर . 82 असेही म्हणतात.हा रोड ६०० मैल-९६६ किलो मीटर लांब असून SFO to SAN JOSE सह अनेक शहरातून हा रस्ता जातो.एवंगुण विशिष्ठम रस्त्याला मात्र मी सन्नीवेलचा लक्ष्मी रोड म्हणून ओळखतो.
येथे आल्यावर पहिल्या आठवड्यातच ह्या रोडने जातांना मला' PNG ज्वेल्लेर्स' ही पाटी एका दुकानावर दिसल्यावर निळाकोट आणि काळी टोपी घात लेली दाजीकाका गाड्गीळांची मूर्तीच डोळ्यासमोर आली.पुण्याच्या लक्ष्मिरोडवर १९५८ पासून गाडगीळ सराफांचे दुकान आहे तसेच Sunnyvale मध्येही काही वर्षे दाजीकाका आपले बस्तान बसवून आहेत.म्हणून आपलं सुटसुटीत नाव बर असा विचार करून सर्रास अल कमिनो रिआल रोडचे माझ्यापुरते नवीन बारसे केले.लक्ष्मिरोड प्रमाणेच येथे दुतर्फा अनेक दुकाने आहेत.अत्यंत गजबजलेला हा मार्ग आहे.VTA बस वाहतूकही ह्याच रस्त्यावरून चालू असते.अमेरिका म्हटली की नाना प्रकारच्या आकर्षक मोटारी आल्याच.विविध प्रकारच्या असंख्य मोटारी सुसाट वेगाने पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने रस्त्याच्या दोनही बाजूनी धावत असतात.अर्थात होर्न न वाजवताच.चायनीज,थाई,इटालियन,मेक
भारतीय वस्तू/ जिन्नस मिळणारी दोन मोठी दुकाने (पटेल ब्रदर्स,इंडिअन ग्रोसअर्स)तसेच चाट भवन,राधेचाट,पिकॉक ही भारतीय हॉटेल्स,अनेक भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची जबाबदारी मोठ्या नेटाने पार पाडत आहेत.जगप्रसिद्ध मोटार कंपन्यांचे डीलर्सही ह्याच रस्त्यावर ठाण मांडून आहेत.
SAFEWAY,बेबीजआरस,CVS PHARMASY ही अमेरिकन दुकाने येथे आहेत.सर्व दुकानांना मी भेटी दिल्या आहेत.विशेषतः SAFEWAY हे प्रचंड storeबघून चक्रावलोच.माझे भाग्यच म्हणायचे अशा दुकानात" काहीतरी ते "खरेदी.करता आले.२०१४ सालची नवीन वर्षाची डायरी घेण्यासाठी मी 'OFFICE DEPOT'आणि OFFICE MAX" ही स्टेशनरी मालाची दुकाने पालथी घातली.टाचणी पासून ते संगणकापर्यंत a to z सर्व मोठ्या प्रमाणावर विक्रीस होते.एवढ्या भाऊ गर्दीत कोठेतरी "येथे मिसळ,खिचडी,पोहे ,अळूवडी,कोथिम्बीरवडी मिळेल " अशी पाटी शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला.पण उपयोग झाला नाही.कुठाय तो मराठी माणूस आणि त्याचा महाराष्ट्र? उत्तर आणि दक्षिण भारतीयांनी आपापली खाद्य संस्कृती मोठ्या नेटाने आणि जोमाने जपलीय पण आपण नुसतीच आकडेवारी जपतो.इतकी हजार मराठी माणसे,त्यात सुधा पुण्याची इतकी वगैरे वगैरे.कधीतरी कोणाला ह्याची उपरती व्हावी हीच इच्छा आहे. मी जरी लक्ष्मी रोड म्हटलं तरी आपल्याप्रमाणे एकाला एक लागून अशी दुकाने येथे नाहीत.त्यामुळे पद्यातरा काढावी लागते.प्रत्येक व्यापारी संकुलाबाहेर मोठाले पार्कींग असते. अमेरिकन हॉटेल्स जागोजागी आहेत पण मला मात्र Mc Donald किंवा SUBWAY ह्या पाट्या पाहिल्या म्हणजे हायसे वाटते.
काहीही असले तरी" अल कमिनो रीअलचा "रुबाब / तोरा वेगळाच आहे हे नक्की.
शुभप्रभात
No comments:
Post a Comment