मंगल प्रभात(?) नव्हे नुसती प्रभात :
गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून येथेही रोज प्रभात होत असते आणि मी ती अनुभवत .असतो. पण पूर्वी अनुभवलेली मंगल प्रभात मात्र आजपर्यंत कधीही ऐकायला मिळाली नाही.अमेरिकन कोंबडाही लवकर जागा होत नाही.आणि आम्हाला कंट्रोल मध्ये ठेवलेल्या साखरझोपेत घड्याळाने व्यत्यय आणला की लगेच मी त्याचा गळा दाबून पुन्हा काहीवेळ लोळतो.त्यामुळे "घनश्याम सुंदरा .........""उठी उठी गोपाला ......""प्रभात समयी....."किंवा "उठी श्रीरामा ....."ह्या भूपाळ्या किंवा मधुर भक्तिगीते कित्येक दिवसात ऐकायला मिळाली नाहीत.किंवा बिस्मिल्ला खान साहेबांचा "तोडी किंवा ललत "हा रागही ऐकला नाही.त्यामुळ जरी मंगलप्रभात म्हटले तरी प्रभात अगदीच गद्य आहे.पद्य नाहीच.समोरच्या लोंरेन्स एक्सप्रेसवरून एकादी पोलीस व्हान सायरन वाजवत गेली म्हणजे मग काहीतरी मंगल/ मंजुळ कानी पडते.नाहीतर दिवसभर सर्व प्रकारच्या वाहनांचे आणि त्यांच्या टायरचे आवाजच ऐकत दिवस निघून जातो.असली गद्य आणि रुक्ष प्रभात असते.घराच्या कोणत्याही खिडकीतून समोर बघितले की असंख्य मोटारी म्हणजे त्यांची खरीखुरी मोडेल्स सुसाट वेगाने धावताहेत फेच "विहंगम दृष्य"बघायला मिळते.
घड्याळाकडे न पहाता भल्या सुप्रभाती समोर येणा-या पहिल्या चहाला" बेड टी" म्हणून स्वीकारायचे आणि १० /११ वाजता प्रभातफेरीला बाहेर पडायचे आणि.बरीच लांबची परेड करून रिकाम्या पोटी परतायचे.बाहेर कोठे साधी चहाची टपरीही नाही ह्या बलाढ्य विकसित देशात ,काय सांगायचं ?अमेरिकन हॉटेल्स भरपूर आहेत.पण पिझ्झा आणि बर्गर आणि असलेच काहीतरी.बर्गर खायचा म्हणजे लहान तोंडी मोठा घास (खर तर तो मोठ्या तोंडी लहान(सा) घास ठरतो)पालेकरांची किंवा पिळाची खारी येथे नाही ना.पुण्यात' बिपिनच्या' किंवा' आनंदच्या' पोह्याला,'श्रीकृष्णच्या' मिसळीला डेक्कनवरील अप्पाच्या खिचडीला आणि खमंग थालीपीठाला मुकलेल्या जिभेचे बाहेर फारच हाल होताहेत.घरी हे घरच्या सारखे होतेच पण काहीतरी द्रव्य देऊन खाण्याचे समाधान/ आनंद काही वेगळाच असतो.(इतरांच्या दृष्टीने) वाईट बाब म्हणजे बारा महिने तेरा काळ आम्ही शाकाहारी त्यामुळे आणखीनच बिकट अवस्था होते.ह्यामुळेच २००७ मध्ये लंडनच्या मुक्कामतही एका सायंकाळी टेम्स नदीच्या काठावर बसून भाजणीचे थालीपीठ लोणच्याबरोबर खाण्याचा विक्रम (वेडेपणा)मी केलाय.
सकाळी अनेक नाना -नानी आपल्या श्रावणबाळाच्या बाळाला स्ट्रोलरमधून फिरवताना दिसतात.अनोळखी माणसे बोललीच तर दिलखुलास बोलतात पण आपली मंडळी मात्र उगीचच बिचकत बोलतात.चौ अक्काबाईचा चिवचीवाट तर ऐकण्यासारखा असतो.काही महिन्यापूर्वी भेटणारी नेहमीची माणसे (येथे राहण्याचे)दिवस भरल्याने आपापल्या देशी परतली आहेत.सध्या एका माजी केंद्रीय मंत्री महोदयांचे बंधू सपत्नीक येथे रोज सकाळी भेटतात आणि खुलाम्खुला बातचीत करतात.हे विशेष आहे.कधी कधी सकाळी उन्हात पोहायला मजा येते.नंतर ज्याकुजी म्हणजे गरम पाण्याच्या विहरीत/हौदात डुंबायला मस्त वाटते.सर्वांग चांगले रगडून शेकून निघते.सध्या माझा" रोज खर्डा" नसल्याने बरे आहे. नाहीतर दाढीचा ब्रश आणि त्याची भावंडे ह्यांना कधीच सुट्टी नसते.ह्या सर्व मंडळीना एक महिना पगारी रजा मंजूर केली आहे.नाहीतर इकडे येताना मध्य रात्रीचे मुंबईचे विमान सकाळी १० ला Hongkong ला पोहोचल्यावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता SFO चे विमान होते.4/5 तास विमानतळावर करायचे तरी काय?मग ठरविले आपले दैनदिन क्रियाकर्म आताच आणि येथेच उरकून घ्यावे.ठरल्याप्रमाणे सर्व तेथेच
पार पाडले. एरव्ही.नेहमीचा प्रभात समयीचा कार्यक्रम येथे संपतो आणि माध्यान्हीची तयारी सुरु होते.
शुभप्रभात

No comments:
Post a Comment