नमस्कार मित्रांनो.गेले अडीच महिने मी अमेरिकन जीवन (थोडेसे पुणेरी मिश्रीत)जगतोय.जगतोय म्हणजे आनंदाने रहातोय.अनेकांना माझ्या येथील जीवनाबद्दल उत्सुकता आहे म्हणजे वेळ कसा जातो?दिवसभर करता तरी काय?अगदी bore होत असाल वगैरे .अनेकात माझे हितचीतक(?),मित्र,नुसते परिचित, अति परिचित मंडळी आहेत.खरा सांगू का रोजचे जीवन पुण्यासारखेच सुरु आहे.दोन्ही देशांच्या राहणीमानात तसा भरपूर फरक असतोच पण म्हणून काही सारखी तुलना करता येत नाही.'तुमचे बरे अन आमचेही बरे,तुमचे चांगले आणि आमचेही चांगलेच" असा विचार केला तर काही कठीण जात नाही.तसे आपणाला येईल त्या आणि असेल त्या प्रसंगांना सामोरे जावेच लागते.नाही का?मग उगीच धुसफूस करण्यात काय अर्थ आहे.सारांश एकंदरीत ठीक चाललय.म्हटले आहेच की"ठेविले अनंते तैसेची रहावे"शुभ प्रभात
No comments:
Post a Comment