Wednesday, February 26, 2014

अत्रे उवाच -कवी पी.सावळाराम (गंगा यमुना .....)

गेल्या महिन्यात लोककवी पी.सावळाराम ह्यांचा स्मृतिदिन पुण्यात साजरा झाल्याचे मी इकडे वाचले.पी.सावळाराम म्हटले की गंगा यमुना ....आणि गंगा यमुना ..म्हटले की पी.सावळाराम असे समीकरणच महाराष्ट्रात तयार झाले आहे.त्यात वावगे काही नाही.सदर कार्यक्रमात ह्या कवींची अनेक लोकप्रिय गीते गायली गेली.पण सुवर्णकळस चढविला गेला तो" गंगा यमुना डोळ...्यात उभ्या का / जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा"ह्याच गाण्याने.मांडवाचा कोपरान कोपरा रडायचं तो ह्याच गाण्यामुळे.मराठी माणसाच्या ह्र्दयात खोलवर जाऊन बसलेलं हे गीत आहे.आचार्य अत्रे ह्या गाण्यावर फार फिदा होते.त्यांची आणि कवी पी.सावळाराम ह्यांची विशेष मैत्री होती.एकदा अत्रे पी.सावळाराम ह्यांना म्हणाले "तुमची सगळी गाणी एका पारड्यात आणि फक्त " गंगा यमुना ..."दुस-या पारड्यात टाकले तर "गंगा यमुना .."गाण्याचेच पारडे जास्त जड होईल ह्याबद्दल शंका नाही " पी.सावळाराम हे ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाल्यावर अत्र्यांनी आपल्या दै".मराठात "मोठा मथळ| दिला 'महाराष्ट्राचा कवी ठाण्याचा नगराध्यक्ष झाला'.कोणतेही मराठी गाणे ऐकले की अत्रे विचारत "गाणं कोणाचे आहे? सावळ्याचे का मावळ्याचे?" म्हणजे पी.सावळाराम का ग.दि.मा.?
अशी होती दाटमैत्री दोघांची .

अत्रे उवाच : मृत्यू लेख म्हणजे वार्षिक परीक्षा .....मरायचं असेल तर .....

एकदा एका सभेत (बहुधा' क-हेचे पाणी 'खंड १ प्रकाशन पुणे येथे )आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले की"मृत्यू लेख लिहिणे ही एकाद्या संपादकाची वार्षिक परीक्षाच आहे.अमका मेला तर बसलं पाहिजे संपादकांनी त्याचा मृत्युलेख लिहायला.माझे मृत्युलेख पहा.साने गुरुजीवरील "मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी "हा माझा लेख वाचा.वल्लभ भाई ,गाडगेमहाराज बाबासो आंबेडकर ह्यांच्यावरील माझे लेख वाचा.मी आपणाला अभिमानाने सांगतो की ह्या संपादकांच्या वार्षिक परीक्षेत मी यशस्वीपणे उतीर्ण झालो आहे.म्हणून मरायच असेल तर माझ्याकडून लेख लिहून घ्या आणि मग मरा" हे ऐकल्यावर श्रोत्यांमध्ये हशा आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडट झाला.


शुभ प्रभात

No comments:

Post a Comment