सुरेल सकाळ
(अरे वेड्या मना तळमळसी)
गेले तीन दिवस पावसाळा उलटला की काय असे वातावरण आहे.अमेरिकेच्या पूर्वेला बर्फ कोसळतोय आणि पश्चिमेला माणस गारठून गेली आहेत.सकाळी तर सर्वत्र सडाच घातल्यासारखे वाटते.सूर्यदर्शन नाही.त्यामुळे वातावरण अगदी कुंद असते.सकाळचे दहा वाजले तरी आपण सहालाच उठल्यासारखे वाटते.आज शनिवार असल्याने तर आणखीनच आळस कारण चाकरमान्यांची दोन दिवसाची सुट्टी असते.मी पण... गरम चहा घेत घेत मित्रवर्य फेसबुकरावांशी गप्पा मारीत होतो.माझ्या एका मित्राने एक post पाठवली त्यावर स्वर्गीय वसंतराव देशपांडेंची प्रतिमा होती आणि "अरे वेड्या मना ...."ह्या संगीत शाकुंतल मधील गीताचा उल्लेख होता.ते पाहिल्यावर मला रहावेना. लगेच श्रवणसमाधीच लागली. डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हणजे संगीत क्षेत्रातली उच्च विभूती.त्यांनी गायलेली नाट्यगीते ऐकताना होणा-या आनंदाचे शब्दात वर्णन करणे अवघड.मास्टर दीनानाथ मंगेशकरांची गायकी कशी होती हे जर कुणाला माहिती नसेल तर त्याने खुशाल वसंतरावांची नाट्यगीते ऐकावी. मला संगीतातले फार ज्ञान आहे की नाही माहित नाही पण संगीतातला थोडा कान असावा असे वाटते.
त्यामुळे आज सकाळी मस्त मैफिल ऐकायला मिळाली.वसंतराव त्यांच्या खास गायकीनुसार गात होते.विविध प्रकारानी समेवर येत होते.विशेष म्हणजे साथीला दोन दिग्गज कलाकार होते.हार्मोनियमवर पंडित गोविंदराव पटवर्धन तर तबल्यावर पंडित नाना मुळे होते.असा त्रिवेणी संगम होता.त्यामुळे न कळत मी पण जाम तल्लीन झालो होतो आणि हातवारे करीत,मानेला हिसके देऊन वसंतरावांच्या पाठोपाठ समेवर येत होतो.पण थोड्याच वेळात पुन्हा भानावर येऊन नंतरच्या दैनंदिन कामाकडे वळलो.दिवसभर डोळ्यासमोर" ह्या त्रिमूर्ती " होत्या.पंडित वसंतराव देशपांडे आणि सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे ह्यांची "मराठी नाट्यसंगीताची वाटचाल " अशी एक कासेट/सी,डी. आहे.त्यामध्ये वसंतरावांचा नाट्य आणि नाट्यसंगीतावर किती सखोल अभ्यास होता हे कळून येते.ज्याला ह्या विषयात रुची/रस आहे त्याने ऐकली नसल्यास जरूर ही कासेट/सी.डी.ऐकावी.ह्या निमित्ताने वसंतरावांच्या आठवणी किस्से मला आठवले.ते असे:
१)एका मुलाखतीत वसंतराव म्हणाले "अहो नाट्यसंगीत असा वेगळा प्रकार किंवा वेगळे संगीत नाहीये.केवळ नाटकामध्ये गायले म्हणून ते नाट्यसंगीत नाही.नाटक हे वेगळे आणि त्यातील संगीत ,गायन हे वेगळे.ट्रंकेत एखादी वस्तू आपण ठेवतो त्याला आपण "ट्रंकवस्तू "म्हणतो का ? मग नाटकातल्या संगीताला नाट्य संगीत का म्हणायचे?वस्तू ही वेगळीच असते."
२)आयुष्यातील काही काळात वसंतरावांचे गायनाचे कार्यक्रम नेहमी होत पण बिदागी मानधन मिळत नसे किंवा फारच कमी असायचे.एकाने त्यांना विचारले "काय वसंतराव कसे चालले आहे ?लगेच वसंतराव त्यांना म्हणाले "सध्या भूप रागासारखे जीवन सुरु आहे. म.........नी.........वर्जित "म्हणजे भूप रागात जसे म आणि नी स्वर वर्ज्य आहेत तसे सध्या मनी( MONEY)शिवाय दिवस घालवतोय"
३)गायनाखेरीज अनेक विषयांचा सखोल अभ्यास,ज्ञान आणि माहिती त्यांना होती अगदी साप कसा कसा पकडायचा हे देखील ते सांगत.स्वयंपाक क्षेत्रातही ते पारंगत होते.बटाट्याची भाजी ते उत्तमरीतीने करत.त्याची रेसिपी सांगत."नेहमी ह्या भाजीसाठी बटाटे असे खर्जातले घ्यायचे "असे म्हणत.
४)पु.ल.देशपांडे आणि वसंतराव ह्यांची मैत्री जगजाहीर आहे.पु. ल.नी त्यांच्यावर "वसंतखा"हा अप्रतिम लेख लिहिला आहे."वसंता' पुरीयाच्या' जंगलात शिरला की दोन दोन तास बाहेर येत नाही"असे पु.ल.नी म्हटले आहे.
शुभप्रभात :

No comments:
Post a Comment