क्रम बदललेला )दिनक्रम आणि
(कोलमडलेले) वेळापत्रक
"वेळच्या वेळी"'जागच्या जागी " आणि " जिथल्या तिथं" हे शब्दप्रयोग मी "इथल्या इथं "गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून विसरलो आहे,भारतीय घड्याळे आणि अमेरिकेची घड्याळे ह्यांचे जिव्हाळ्याचे संबंध नसल्याने हा घोळ होतो.१२ /१३ तासांचा फरक असतो.त्यामुळे भारतीय माणसाची धावपळीची वेळ जेंव्हा असते तेंव्हा अमेरिकन माणसांची ब्रम्हानंदी टाळी लागले...ली असते किंवा डाराडूर घोरण्याची त्यांची वेळ असते.हे विधान उलटे करून वाचले तरी चालेल.नमनाला एवढे घडाभर तेल घालण्याचा उद्देश म्हणजे निवृत्तीनंतर मी आता घड्याळाचा गुलाम नाही हे सांगण्याचा आहे.शाळेत असताना प्रा.अनंत काणेकरांचा "घड्याळाचे गुलाम "हा धडा मला होता.त्यावेळी त्याचा अर्थ लगेच समजला नाही पण प्रदीर्घ नोकरी करताना मात्र चांगलाच समजला.त्यामुळे तेंव्हाच मनाशी ठरविले की आता ह्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे.
ह्या वेळेच्या फरकामुळे माझे येथील दैनंदिन जीवन मी जेंव्हा कधी ८ ,कधी ९ तर फार थंडी असली तर सकाळी १० वाजता सुद्धा सुरु होते.तरी पण आपण सकाळी सहालाच उठलो आहोत अशी गोड समजूत करून घेऊन पुढील कार्यक्रम' तिकडे 'म्हणजे घड्याळाकडे न पहाता "वेळच्या वेळी" (म्हणजे इथल्या ) पार पाडतो.गजराचा गळा अधूनमधून दाबायची मलाही सवय आहे नाही असे नाही.त्यामुळे जेंव्हा उठतो तेंव्हाच
आमचे झुंजूमुंजू होते.नंतर नेहमीचे आन्हिक,स्प्लेंडामिश्रित चहापान,मग laptopवर थोडी झटापट,आवडलेले सर्व मित्रांना पाठविण्याचे forwarding agency चे विना वेतन काम, नंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे "रोज् खर्डा"|( पाणी घेऊन स्वता:ची स्वतः दाढी केली म्हणजे ह्या पवित्र कामाचे श्रेय पाण्याशिवाय दिवसभरात दुसरा कोणी घेऊ शकत नाही.) मग आधी औषधी गोळ्यांचा नाश्ता, पाठोपाठ मराठमोळी रुचकर डिश,हे झालं की प्रभात फेरीची जय्यत तयारी म्हणजे उघड्या डोळ्यांनी आणि झाकल्या डोक्यानी नखशिखांत अवस्थेत अंतराळवीर समजून मोर्निंग वॉकला बाहेर पडणे.केंव्हाही बाहेर गेलो तरी कोवळेच उन्ह असते.रखरखते,तळपते,प्रखर उन्ह कधी जाणवले नाही.आमच्या सोयीसाठी येथे सूर्यदेखील १२ ला डोक्यावर न येता थोडा लेटच येतो.कधी येताना तर कधी बाहेर जातानाच कम्युनिटीत असलेल्या HEALTH SPA म्हणजे आपल्या ( तालमीशिवाय असलेल्या) हनुमान व्यायाम शाळेत झेपणारा व्यायाम आणि रामदेवबाबांचे स्मरण करीत प्राणायाम.घरी आल्यावर आधी आपली अंघोळ मग .देवाची,त्यानंतर "उदरभरण नोहे ...हे यज्ञकर्म " सोसायटीच्याच आवारात शतपावली म्हणून सहस्रपावली घालत असतानाच आजच्या 'होणा-या' लेखाच्या कळा सुरु होतात. घरी आल्यावर कर्ता,कर्म आणि क्रियापद ही मंडळी मी येण्यापुर्वीच laptop वर माझी वाट पाहत असतात.मग लगेच ताशा बडवायला सुरवात यथावकाश
"दिसामाजी काहीतरी ते "डोळ्यासमोर उमटते.ते post करून थोडेसे हश्य हुश्य करत लोळणे.नंतर पाच/सहा वाजता तिन्हीसांजला ' दुपारचा चहा '. थंडीमुळे चार वाजल्यापासूनच अंधार पडत असल्याने" सातच्या आत घरात" ऐवजी" चार पर्यंत घरात "येतो.
संध्याकाळी दीडदोन तास internetवर "आपला महाराष्ट्र "वाचत बसतो.मिसिसीपी नदीच्या काठी काय चालते त्यापेक्षा मुळामुठेच्या ,कृष्णेच्या आणि पंचगंगेच्या काठी काय काय घडते ह्याची मनाला ओढ असते.त्यानंतर" दोन घास" खावून घेतल्यावर अनेक वर्षाची' दैनंदिनी' नामक सोबतीण,सग्यासोय-याशी फोनाफोनी ,अधूनमधून शास्त्रीय संगीत ,नाट्यगीते ,भले बिसरे गीत ऐकत डोळ्यावर डूव्हे ओढून झोप .
सर्व साधारणपणे गेले पाच महिने अमेरिकेत माझे असे जीवन सुरु आहे.घड्याळाची गुलामगिरी कधी पाळत तर कधी धुडकावत.
शुभप्रभात

No comments:
Post a Comment