ते माझे घर" (अमेरिकेतील) म्हणजे मुलाचे घर:
"आटपाट नगर होते ....."ह्या वाक्याने सुरु होणा-या अनेक गोष्टी,कहाण्या लहानपणी वाचल्या होत्या.आटपाट नगर म्हणजे काय आणि ते असते तरी कसे हे सर्व कळणे अशक्यच होते.मोठेपणी मात्र तशा महानगरातून राहायला मिळाले ही भाग्याचीच गोष्ट आहे. सध्या मी अमेरिकेच्या कालीफोरनिया राज्यातील सनीवेल येथे रहात आहे.Lawrence express way आणि oakmead vill...age जवळ AVALON COMMUNITY नामक आजकालच्या काळातले हे एक आटपाट नगरच आहे असे वाटते.८०० flats/टुमदार घरे ह्या हौसिंग कोम्प्लेक्स आहेत.विविध प्रकारच्या सुखसोयींनी युक्त असलेली ही वसाहत म्हणजे एक चिरेबंदी वाडाच वाटतो.तीन मोठे दिंडी दरवाजे (म्हणजे गेट्स)आहेत.लहानमोठी अशी २०/२५ तरी गेट्स आहेत.कोणालाही सहजासहजी आत येता येत नाही बाहेर जाण्यास अडचण नसते.पण फॉब दाखूनच इलेक्ट्रोनिक्स कुलूप उघडले जाते. पोहण्याचे दोन पूल, जाकुझी म्हणजे गरम पाण्याची एक विहीर/ हौद, हेलथ स्पा,(म्हणजे आपली हनुमान व्यायामशाळा तालीम नसलेली),बाल् गोपालांसाठी उद्यान खेळांची उपकरणी ,मोठ्यासाठी जोग्गिंग पार्क,क्लबहाउस,कारपार्किंगस,ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके/बेंचेस,पदपथ,पार्किंग सर्कल्स इ.इ.
वसाहतीमध्ये कमालीची स्वच्छता/टापटीप आहे.विविध प्रकारची शोभिवंत झाडे/फुलझाडे,जागोजागी पानाफुलांच्या मोठ्या कुंड्या,निरनिराळ्या प्रकारची कारंजी,विद्युत रोषणाई,खेळांची लहानमोठी मैदाने,इ.इ.अमेरिकन पद्धतीनेच सर्व बांधकाम झालेले आहे.म्हणजे लाकूडकाम जास्त सिमेंटचा वापर त्या मानाने कमी,बहुतांश घरांना सर्व अमेरिकन परंपरेनुसार सुखसोयी पुरविल्या आहेत.म्हणजे
फ्रीज,वाशिंगमशीन, डिशवाषर,मायक्रोओव्हन,कारपेट्स, टबबाथ,वाशबेसिन्स,हिटर्स,
एअरकंडीशनर्स,इ.इ. आणखीही लहानमोठे बरेच काही असते.येथील हवामानानुसार घरे आहेत.सर्व घरांना काचेच्या दारेखिडक्या,जाळीच्या खिडक्या,सगळीकडे काचेला ब्लाइंड्स,वगैरे
वसाहतीचे व्यवस्थापन अमेरिकन्स करतात.कर्मचारीवर्ग बहुधा मेक्सिकन असून ते स्पेनिश भाषा बोलतात.वसाहतीमध्ये जगातील विविध जातीधर्माचे लोक राहताहेत.पण चिनी लोक फार आहेत.दहा बारा भारतीय लोकही असावेत.त्यात महाराष्ट्रातील पाच सहाजण आहेत.विशेष म्हणजे कोथरूड आणि कर्वेनगरचे दोनजण भेटल्याने येथे आमच्या गप्पा रंगल्या.हे भाग्य तिथे मिळाले नसते पण इथे मिळाले ह्याचा विशेष आनंद झाला.पण सहसा कोणी एकमेकांशी बोलताना,खिदळताना,आणि हसताना सुद्धा दिसत नाही काय करणार वेळच नसतो कोणाला.मग शेजारधर्म,माणुसकी प्रेम आणि लळजिव्हाळा दूरच राहिला.सारे कसे शांत शांत असते.भांडण,बाचाबाची आरडाओरडा ही मंडळी अजून दिसली नाहीत.शोधून तरी मिळतील कि नाही हेपण माहित नाही,एकंदरीत ठीक चाललय.
गेल्या ४ महिन्यात जे अनुभवले,जे दिसले,जे पाहिले आणि जे ऐकले असे जेजे काही गवसले ते उलगडून ठेवले आहे इतकेच.
शुभप्रभात
"आटपाट नगर होते ....."ह्या वाक्याने सुरु होणा-या अनेक गोष्टी,कहाण्या लहानपणी वाचल्या होत्या.आटपाट नगर म्हणजे काय आणि ते असते तरी कसे हे सर्व कळणे अशक्यच होते.मोठेपणी मात्र तशा महानगरातून राहायला मिळाले ही भाग्याचीच गोष्ट आहे. सध्या मी अमेरिकेच्या कालीफोरनिया राज्यातील सनीवेल येथे रहात आहे.Lawrence express way आणि oakmead vill...age जवळ AVALON COMMUNITY नामक आजकालच्या काळातले हे एक आटपाट नगरच आहे असे वाटते.८०० flats/टुमदार घरे ह्या हौसिंग कोम्प्लेक्स आहेत.विविध प्रकारच्या सुखसोयींनी युक्त असलेली ही वसाहत म्हणजे एक चिरेबंदी वाडाच वाटतो.तीन मोठे दिंडी दरवाजे (म्हणजे गेट्स)आहेत.लहानमोठी अशी २०/२५ तरी गेट्स आहेत.कोणालाही सहजासहजी आत येता येत नाही बाहेर जाण्यास अडचण नसते.पण फॉब दाखूनच इलेक्ट्रोनिक्स कुलूप उघडले जाते. पोहण्याचे दोन पूल, जाकुझी म्हणजे गरम पाण्याची एक विहीर/
वसाहतीमध्ये कमालीची स्वच्छता/टापटीप आहे.विविध प्रकारची शोभिवंत झाडे/फुलझाडे,जागोजागी पानाफुलांच्या मोठ्या कुंड्या,निरनिराळ्या प्रकारची कारंजी,विद्युत रोषणाई,खेळांची लहानमोठी मैदाने,इ.इ.अमेरिकन पद्धतीनेच सर्व बांधकाम झालेले आहे.म्हणजे लाकूडकाम जास्त सिमेंटचा वापर त्या मानाने कमी,बहुतांश घरांना सर्व अमेरिकन परंपरेनुसार सुखसोयी पुरविल्या आहेत.म्हणजे
फ्रीज,वाशिंगमशीन, डिशवाषर,मायक्रोओव्हन,कारपेट्स,
एअरकंडीशनर्स,इ.इ. आणखीही लहानमोठे बरेच काही असते.येथील हवामानानुसार घरे आहेत.सर्व घरांना काचेच्या दारेखिडक्या,जाळीच्या खिडक्या,सगळीकडे काचेला ब्लाइंड्स,वगैरे
वसाहतीचे व्यवस्थापन अमेरिकन्स करतात.कर्मचारीवर्ग बहुधा मेक्सिकन असून ते स्पेनिश भाषा बोलतात.वसाहतीमध्ये जगातील विविध जातीधर्माचे लोक राहताहेत.पण चिनी लोक फार आहेत.दहा बारा भारतीय लोकही असावेत.त्यात महाराष्ट्रातील पाच सहाजण आहेत.विशेष म्हणजे कोथरूड आणि कर्वेनगरचे दोनजण भेटल्याने येथे आमच्या गप्पा रंगल्या.हे भाग्य तिथे मिळाले नसते पण इथे मिळाले ह्याचा विशेष आनंद झाला.पण सहसा कोणी एकमेकांशी बोलताना,खिदळताना,आणि हसताना सुद्धा दिसत नाही काय करणार वेळच नसतो कोणाला.मग शेजारधर्म,माणुसकी प्रेम आणि लळजिव्हाळा दूरच राहिला.सारे कसे शांत शांत असते.भांडण,बाचाबाची आरडाओरडा ही मंडळी अजून दिसली नाहीत.शोधून तरी मिळतील कि नाही हेपण माहित नाही,एकंदरीत ठीक चाललय.
गेल्या ४ महिन्यात जे अनुभवले,जे दिसले,जे पाहिले आणि जे ऐकले असे जेजे काही गवसले ते उलगडून ठेवले आहे इतकेच.
शुभप्रभात
No comments:
Post a Comment