Friday, February 28, 2014

ये नवीन वर्षा,ये

ये नवीन वर्षा,ये "आगतम स्वागतं सुस्वागतम "नवीन वर्षा तू आल्याने आम्हाला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू.अरे डिसेम्बर महिना लागला कीच आम्हाला तुझ्या आगमनाचे आणि जोरदार स्वागताचे वेद लागतात आणि नवीन संकल्पांचेही.
ये ना जरा आत ये बघतर तुझ्या स्वागताची तयारी किती आणि कशी केलीय. दिवाणखाना बघ कसा नटलाय.रंगीत दिव्यांच्या माल...ा,विविध आकाराचे फुगे,शोभिवंत पानाफुलांनी आणि वस्तूंनी घर कसं भरलय नुसतं.अन हो ते डायनिंग टेबल पाहिलस का विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल आहे.आणि तो क्रेट तर बघ,बाटल्यांनी नुसता तुडुंब भरलाय. यंदा दोन ओपनर ठेवले आहेत.गेल्या वर्षी ह्यामुळे तुझ्या स्वागताला थोडा उशीर झाला होता आठवतंय ना नंतरचा अंक?आता १२ वाजले की एका कोरसमध्ये HAPPY NEW YEAR म्हणून आम्ही ओरडणार नाचणार गाणार खाणार आणि पिणारसुधा.मग मात्र पुढील ३१ डिसेंबर च्यादिवशीच तुला भेटणार बर का.बराय तर मग.HAPPY NEW YEAR. शुभप्रभात

No comments:

Post a Comment