Friday, February 28, 2014

चंदेरी फुलबाज्या( चिंगी महिन्याची ......)

आज मला नाट्यछटाकार आणि मराठी लेखक दिवाकर ह्यांची सारखी आठवण होत आहे.ब-याच वर्षांनी त्यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम मराठी नाट्यछटा लिहिल्या आहेत.पण सर्वांना विशेष माहिती असलेली नाट्यछटा म्हणजे "चिंगी महिन्याची झाली नाही तोच ....."त्यावेळी अनेक मुली/चिंग्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस किंवा शाळेच्या स्ने...ह्समेलनात ही नाट्यछटा हटकून सादर करीत आणि तमाम महिला मंडळ फार खुश होई.हे मला आठवण्याचे माझे कारण म्हणजे माझी नात चि.मीरा हर्षवर्धन बोकील आज म्हणजे १० फेब्रुवारीला बरोबर एक महिन्याची झाली आहे.मला १० जानेवारी हा दिवस आठवतोय.त्यादिवशी आमची घाईगडबड,धावपळ आणि अत्यानंद ह्या मध्ये गेला.आता मीराच्या दिमतीला आम्ही सहाजण घरात आहोत.संपूर्ण मोठी खोली मीराच्या विविध वस्तूंनी,आकर्षक खेळण्या- कपड्यांनी व्यापली आहे.मी मात्र सुरक्षित अंतर ठेऊन तिच्याशी बोबड्या बोलानी सारखी' चर्चा 'करतो.(पुणे.तेथे काय उणे चा हा परिणाम ) बोबडे बोलण्याची कला थोडीफार अवगत असल्याने त्या साठी मी क्लास वगैरे लावला नाही.पु.लं.च्या
म्हणण्यानुसार बंगाली भाषा ही लहान मुलांशी बोलण्याप्रमाणे असते.म्हणजे :अश्यो नाय कर्राच्यो बोक्का.अश्यो.' आज संध्याकाळी आम्ही मीराचा पहिला मासिक वाढदिवस साजरा करणार आहोत.त्यासाठी "SAFEWAY"ह्या सुप्रसिद्ध अमेरिकन दुकानातून खास पद्धतीचा केक आणला आहे.आताच त्याची चव कशी कळणार ?

डॉक्टरांचे हस्ताक्षर

आता म्हणे सर्व डॉक्टरांना त्यांचे PRESCRIPTION कॅपिटल letters मध्ये लिहावे/द्यावे लागणार आहे.ह्या साठी वेगळी फी वगैरे आकारणार आहेत का? हे काही कळले नाही.पण काही घटना किस्से आठवले.माझ्या माहितीचे एक डॉक्टर मित्र होते.मित्रच असल्याने मी नेहमीप्रमाणे त्यांना' टोचून 'बोललो तरी ते कधीही विव्हळत नसत.आश्चर्याची आणि विश्वास न बसणारी बाब म्हणजे त्यांचे हस्ताक्षर कमालीचे सुंदर वळणदार होते.काळ्या शाईच्या पेनाने ते लिहित.एकदा कधीतरी मी त्यांच्याकडे काहीतरी शारीरिक रागाचे रडगाणे ऐकवायला गेलो.तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा मला आडवे करून यथावकाश माझ्याच पायावर मला उभे केले.मी म्हटलं"औषध "तेंव्हा त्यांनी ४/५ ओळींचा prescription नामक काला कागद मला दिला आणि chemist कडे जाण्यास सांगितले".अहाहा| ह्याला prescription कोणी म्हणेल काहो डॉक्टर? मी म्हणालो.कारण पेंटरच्या कागदावर कोणीही औषधविक्रेता औषध देणार नाही."एकजण डॉक्टरांचे prescription हे नाटकाचा फ्रीपास म्हणून डोरकिपरला दाखवत आणि फुकट नाटके बघत.(हे पण पु.लं चेच लिखाण) अहो ह्या पेक्षाही भारी म्हणजे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराचे(?) प्रेमपत्र त्याचे' सुवाच्च' हस्ताक्षर न लागल्याने एका केमिस्टकडून वाचून घेतल्याची बातमी हाती आली आहे.

जाहिरात कला

प्रत्येक विक्रेता,कारागीर आपल्या मालाच्या विक्रीसाठी किंवा जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी कशी जाहिरात करेल किंवा काय युक्ती वापरेल हे सांगता येत नाही.माझ्या लहानपणी सातारच्या राजपथावर पोस्टऑफिस जवळील एका झाडाच्याखाली एक चर्मकार बसत असे.त्याने शेजारच्याच झाडावर एक पाटी लावली होती ती अशी "गतप्राण पादत्रणात त्राण आणणारे एकमेव पादत्राण सुधारणा केंद्र " विशेष म्हणजे ह्या जाहिरातीचा उल्लेख एका लेखकाने आपल्या लेखात केला होता. आणि मासिकात छापूनही आल्याचे /वाचल्याचे आठवते आहे.तसेच एका ब्युटीपार्लरवर एक पाटी होती.ती अशी "ह्या पार्लरमधून बाहेर पडणा-या कोणत्याही स्त्री कडे पाहून शिट्टी वाजव नये.कदाचित ती स्त्री तुमची आजी असू शकेल" काय आणि कसं चालेल कुणाचं डोकं हे सांगता येणार नाही. खर की नाही?

शु

No comments:

Post a Comment