मामाच्या गावाला जाऊ या ...जाऊ या ...
सर्वांना असे वाटेल की आज एकदम मामाची आठवण कशी काय झाली ?पण खर सांगू का माझ्या मनात माझ्या आईवडीलाप्रमाणेच माझ्या मामाची सदैव आठवण असते.फक्त ती आज थोडी उफाळून आली इतकेच.काही दिवासापुर्वीच फेसबुकवर "मामाचे पत्र हरवलं...."ह्या जुन्या काळातल्या खेळाविषयीचे एक चित्र आले होते.पण आता पत्र तर हरवतेच पण काही घरातून मामाही हरवत चाललाय ह्याचे मनस्व...ी वाईट वाटते".मामा " ह्या शब्दामागे किती प्रेम,आपुलकी आणि ओढ दाटलेली आहे ह्याची कल्पना मामावर मनापासून प्रेम केलेल्यांनाच येईल.आपल्या मामाशी प्रेम जिव्हाळ्याचे संबंध न ठेवता किंवा नुसते व्यवहाराचेच वायदे करत जेवढ्याच तेवढे बेगडी नातेसंबंध ठेवणाऱ्या भाचे मंडळीना ह्याची कल्पना सहजपणे येणार नाही.असे भाचे आपला मामा विसरून चौकातल्या पोलिसाला मात्र "मामा" म्हणतात.आणि मामा ह्या शब्दाला कुत्सित अर्थ करून देतात ,म्हणजे अमक्या अमक्या माणसाने तमक्या माणसाचा अगदी पुरता "मामा" केला.कामापुरता मामा तर चांगलाच माहित आहे.माझ्या एका मित्राचा मामा माझ्या चांगला परिचयाचा होता.पण मामा-भाचे ह्यांचे संबंध विशेष जिव्हाळ्याचे नव्हते.म्हणजे काडीनेच औषध लावण्या इतपत होते.एके ठिकाणी माझ्या ह्या मित्राचा मामा मला भेटल्यावर म्हणाला "त्याला (म्हणजे मित्राला ) सांगा मामा अजून' आहे' म्हणून " गावात असूनही भेटत नसायचे म्हणून मामाने माझ्यामार्फत असा" ठेवणीतला " निरोप मित्रासाठी ठेवला.असो.
माझ्या लहानपणी म्हणजे ६५ वर्षापूर्वी मी माझ्या गावाहून -कोरेगावहून -माझ्या आजोळी - फलटणला -म्हणजे मामाच्या गावाला जायचो तेंव्हा काय आनंद होत असे.मामाच्या गावाला जायचे म्हणून आधी आठवडाभर तरी आनंदी उत्साही हवा निर्माण झालेली असे.त्यासाठी नवा पोशाख (कृष्णाचा फोटो असलेल्या जरीच्या निळ्या
मखमली टोपीसह) शिवला जायचा.अगदी प्रवासाच्या दिवशी आगगाडीच्या वेळेआधी तासभर दारात छकडा (म्हणजे एका बैलाची बंदिस्त गाडी )येत असे.कोरेगाव स्टेशनवर पुण्याला जाणारी पाशिंजर पकडून पुढचा प्रवास सुरु होत असे.वाठार स्टेशन गेल्यावर आदर्की जवळ एक बोगदा लागत असे तेंव्हा उत्सुकता आणि भीती मनात असे.सालपे गाव गेल्यावर लोणंद स्टेशनला आम्ही उतरायचो.तेथेच असलेल्या S.T.stand वर फलटण गाडीची वाट पाहायचो.बाहेरचे काही खायचे नाही म्हणून तेथेच बसून घरची भाजीभाकरी/दशमी मिटक्या मारीत आनंदाने खायचो कारण मनातून मामाच्या गावाला जाण्याची प्रचंड आंतरिक ओढ असायची म्हणूनच.काही वेळातच झाडाखाली फलटणला जाणारी येष्टी यायची आणि मग रेलवे पूल ओलांडून मामाच्या गावाकडे जायला निघायची,पालखीच्या वेळचे चांदोबाच्या लिंबाचे तरडगाव गेले मग गाडी साखरवाडी फाट्यावर आत शिरत असे.तेंव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली असायची आणि आई मला "आता लवकरच येईल ह फलटण "म्हणत थोपवून धरायची. मलठण गेले की गाडी हरी भाऊच्या देवळाजवळ थांबून मग फलटणच्या standवर जात असे.
कोरेगाव ते फलटण सफर तेथे संपत असे."झुक झुक झुक आगीनगाडी .......मामाच्या गावाला जाऊ या ...."हे गाणे जन्माला येण्यापुर्वीच अगदी तसाच अनुभव मी लहानपणी घेतलाय.हे लिहित असताना माझे डोळे laptop वर असले तरी मन मात्र त्या
लोणंद फलटण परिसरातच आहे.परिसर तोच आहे.त्याचा चांगला विकासही झालाय.सुशोभीत आकर्षक दिसतोय.पण मामा मात्र कुठेच दिसत नाही. नुसते मामाचे गाव दिसून काय उपयोग?
माझ्या आजोळचे आडनाव फौजदार.मोठे कुटुंब.तीन मामा.चार मावश्या.आजी (जिला मीपण आईच म्हणायचो)मोठा मामा आणि धाकटा मामा हे नोकरीनिमित्त पहिल्यापासून मुंबईला होते.मधला मामा मात्र फलटणला असे.शिवाय मानलेले अनेक मामा आणि मावशा होतेच.कालाच्या ओघात बर्याचश्या मंडळीनी आता ह्या दुनियेतून EXIT घेतलीय. पण.सर्वांनी प्रेमळ आणि सुखद सहवासाच्या आठवणीचे गाठोडे मात्र माझ्याकडे ठेवले आहे.हा मौल्यवान ठेवा मी कायमच जवळ बाळगणार आहे........
शुभप्रभात

No comments:
Post a Comment