Wednesday, February 26, 2014

  1. निरोप तुज देता ......

    राम राम मंडळी,वर्ष संपायला आता काही तासांचाच अवधी आहे.मला मात्र अजून अख्खा दिवस आहे.माझे लक्ष आपल्या गावाकडे लागले आहे.सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उत्सुक असतील.TV वर दरवर्षी प्रमाणे काहीतरी खुसखुशीत कार्यक्रम पाहण्यात अनेकजण दंग असतील.खाण्यापिण्याची (म्हणजे दोन्हीचीही)रेलचेल असेल.अन...ेकजण भूतकाळात डोकावत असतील.रंगीबेरंगी लाइटची सजावट,फटाके फोडण्याची घाई हे सर्व डोळ्यासमोर येतंय.

    इकडे अमेरिकेत Sunnyvale ला सकाळचे ७ वाजले आहेत.जाम थंडी आहे.भरीतभर म्हणजे आज धुकेही पडले आहे.बाहेर पहिले तर समोरच्या रस्त्यावरून अनेक वाहने जणूकाही रात्रीच धावत आहेत असे वाटते.मनात म्हटलं आता गरम चहाचे पेट्रोल आपल्या पोटात गेल्याखेरीज आपली गाडीही दिवसभर पळणार नाही.म्हणून चहा घेत असतानाच डोक्यात विचारचक्र सुरु होते.सरत्या वर्षतील अनेक सुख दुःखाचे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते.अखेर हा हा म्हणता वर्ष संपलं की राव?

    "हा हा म्हणता" म्हणता हा शब्दप्रयोग फार गुळगुळीत झालाय.उठसुठ हा हा म्हणता.स्वयंपाकघरातील डबाभर केलेला चिवडा हा हा म्हणता संपला सुद्धा.(आमच्या नाही बर का )काही दिवसापूर्वीचा एक लढाऊ कार्यकर्ता हा हा म्हणता मुख्यमंत्री झाला बर का .इ.इ.सारांश आज काय enter मारायचे ह्याचा विचार करीत असतानासुद्धा हा हा म्हणता तीन परिच्छेद झाले.पुन्हा एकदा सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.कशी करू स्वागता म्हणत २०१४ सालाचे स्वागत करून झोपायला हरकत नाही.म्हणजे तुम्हीच काय ते ठरवा..........शुभप्रभात
    See More



 
    1. नवीन वर्ष् सुखाचे जावो

      फेसबुकवरअसलेल्या माझ्या सर्व मित्रांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना येणारे नवीन वर्ष आनंदाचे,सुख समृधी,उत्कर्षाचे जावो ही सदिच्छा.
    1. काहीतरी ते.....
      "कर्हेचेच पाणी"का?

      आचार्य अत्रे ह्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात एक आगळा वेगळा सत्कार सोहोळा पार पडला.अध्यक्ष होते प्रा.ना.सी.फडके.नेहमीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिर तुडुंब भरले होते.अत्रे-फडके एकत्र हा एक प्रचंड चमत्कारच होता.गेल्या दहा हजार वर्षात ......असो.

      अत्रे उवाच : सत्काराल...ा उत्तर देतांना आचार्य अत्रे म्हणाले "अप्पासाहेब मला विचारतात की तुम्ही पुण्यात रहात होता मग तुमच्या आत्मचरित्राला" कर्हेचे पाणी " हे नाव का दिले? मी पुण्यात मुळामुठेचे वेगळे असे पाणी प्यालो नाही,जे काही पाणी नळातून यायचे तेच पाणी मी प्यायचो.त्यामुळे माझ्या आत्मचरित्राला मुळामुठेचा नळ किंवा मुळा मुठेचा हौद हेच नाव द्यावे लागले असते." हे ऐकताच नेहमीप्रमाणे हास्याचे मोठे फवारे उडाले.हे सांगायला नकोच.

      शुभा प्रभात.
      See More
    1. शुभ प्रभात:

      वडीलार्जीत वारसा (लाख मोलाची ठेव)

      खर म्हणजे इन्नाच्या (आईच्या)पाठोपाठ आप्पावर (वडिलांवर) कालच लिहिणार होतो पण आईच्या असह्य आठवणीने "आले लोचानातुनी तोय कितीकदा"अशी अवस्था झाली होती.आज" गदिमा"सारखी दिसणारी वडिलांची मूर्ती डोळ्यासमोर उभी आहे.

      माझे वडील म्हणजे दत्तात्रय नारायण बोकील.(१९१३ ते १९७०) ह्यांच...े आयुष्य सातारा कोरेगाव येथेच प्रामुख्याने गेले.ते १९४८ मध्ये S.T.च्या सेवेत सुरवातीपासून होते.नोकरीनिमित्ताने पुणे,पेण,पनवेल येथे बदलीमुळे गेले.आयुष्य भर वेगवेगळ्या स्थरावर झुंजत होते.आर्थिक उब मात्र म्हणावी तशी त्यांना कधीच मिळाली नाही.ह्याचे मला नेहमी दु:ख होते.नेहमी प्रापंचिक आणि कौटुंबिक अडचणी,समस्या ह्यांना तोंड देत असत. संसारातील अनेक जबाबदारया त्यांनी पेलल्या.थोडक्यात ते अन्य पुरूषव्यक्ती प्रमाणेच होते.विशेष असे काही नव्हते.

      पण ह्या संसाराच्या जंजाळातही त्यांनी आपली मराठी साहित्याची गोडी कायम ठेवली होती.आणि वारसदार म्हणून माझ्यावर सोपविली.आचार्य अत्रे आणि सदाबहार अशोककुमार ह्यांचे ते निस्सीम चाहते होते.अत्रे साहेबांचे लिखाण,आणि अत्र्यांची कसदार मराठी भाषा त्यांना फार आवडे.मला अत्रे साहित्याची आवड ज्या अग्रलेखामुळे निर्माण झाली तो "सती उषा भार्गव "लेख आम्ही पेणला असताना वडिलांनी कंदिलाच्या प्रकाशातही माझ्याकडून मोठठ्या आवाजात वाचून घेतला होता.तेंव्हा मी खूप कुर कुर केली.आज ह्या माझ्या आत्रेय छंदाने ने मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नेले त्याला कारण माझे वडील आहेत.माझ्या अत्रे साहित्य दर्शन प्रदर्शनाला मी "लाख मोलाची ठेव "हे नाव दिले आहे.माझ्या वडिलांनी मला आर्थिक ठेव काहीही ठेवली नाही.कारण त्या काळची परिस्थिती.पण एका रुपयाचे कर्जही माझ्या डोक्यावर ठेवले नाही. आचार्य अत्रे साहित्याची जबरदस्त गोडी/ आवड माझ्या सारख्या सर्वसामान्य मुलात
      रुजवली ही लाख मोलाची ठेव आहे अशी माझी भावना आहे.त्यामुळे जगभर थोडेसे का होईना माझे नाव झाले.

      माझ्या आजोबांचे आणि वडिलांचे मराठी इंग्रजी अक्षर फार चांगले होते.त्यांची अनेक पत्रे ६० वर्षे झाली तरी स्मृती म्हणून उराशी बाळगली आहेत.आचार्य अत्रे आणि अशोककुमार ह्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो आहे.हे फार मोठे कर्तव्य पार पडले असे नव्हे तर ह्या निमित्ताने वडिलांची स्मृती सदैव तेवत ठेवली आहे.आज मी इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामधून राहिलो ह्याचा आनंद/ समाधान जरूर आहे पण जन्मभर
      आयुष्याशी झगडणाऱ्या माझ्या वडिलांना मात्र हे सुख,हा आनंद,समाधान फारसे लाभले नाही ही खंत मनाला आहे.काय गमंत असते आयुष्याची पहा,कष्ट कोण करतो आणि त्याची फळे कोण खातो? वडिलांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून ही कुसुमांजली पूर्ण करतो.
      See More
    1. शुभ प्रभात . मातृपितुदेव भव

      काल मी माझं गाव कोरेगाव आणि आमची कुलस्वामिनी श्री तुरजा भवानीचे स्मरण केले.फार बर वाटलं मनाला.सातासमुद्रापार असूनही आपले ते आपलेच असते नेहमी नाही का? हे लिहिल्यानंतर साहजिकच मला माझ्या आई वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली.म्हणून आज ही सुमनांजली त्यांच्या चरणी अर्पण करतोय.

      आईची महती अनेकांनी आपल्या लेख आणि काव्य द्वारे वर्णिली आहे.मी त्यात क...ाय वेगळी भर घालणार?पण माझी आई श्रीमती मालती बोकील ही एक सर्वसामान्य,मध्यमवर्गीय स्त्री होती.फार शिकलेली होती असही नाही.तरीपण आपल्या बाल विकास मंदीर ह्या बालशिक्षण केंद्राच्या मार्गांनी समाजातील अनेक गोरगरिबांच्या बालकांना आपल्या कुवतीप्रमाणे ज्ञानार्जन केले,त्यांच्यावर चांगले संस्कार केले.हे कार्य तिने १९५२/ ५३ पासून केले.सुरवतीला फलटण आणि सातारा येथील बालविकास मंदिरे पाहून आपल्या गावी म्हणजे कोरेगावला आमच्या राहत्या घरातच बालवाडी सुरु केली.आईला मुळातच लहान मुलांची खूप आवड असल्यानेच हे शक्य झाले.शिवाय कौटुंबिक गाडा ओढायलाही तेवढीच मदत होत असे.त्यानंतर सातारा येथे करंदीकर वाडा,शनिवार पेठ,यादोगोपालातील खडकेश्वर मंदिर ,ज्ञानेश्वर मंदिर येथेही आईने बालवाड्या चालविल्या.काहीकाळ पेण येथील मनोहर हाल येथेही अशीच नोकरी केली.वार्षिक स्नेहसंमेलन,सहल,सार्वजनिक सण उत्सव मोठ्या आनंदात ,
      उत्साहात साजरे केले.१९७५ साली सातारच्या एका रोटरी क्लबने शिक्षक दिनानिमित तिचा सत्कारही केला.मुख म्हणजे अनेक अडचणी आणि संकटे ह्यांना तोंड देत आम्हाला घडविले.पुढे मी कोल्हापूर येथे बदलून गेल्यावर आईचे हे जीवन सर्वार्थाने
      थांबले.१९८३मध्ये दत्तजयंतीच्य सुमारास आईने ह्या दुनियेचा कायमचा निरोप धेतला.डोळे भरून येताहेत. पुढे लिहवत नाही. आजचा पूर्णविराम .............................
      See More
    1. सहजच सुचलं: बोकील (कोरेगाव .जिल्हा सातारा )

      मी कालच म्हटल्याप्रमाणे काहीतरी ते ....हेच आहे.आम्ही बोकील कोरेगावचे रहिवासी.तशी कोरेगाव बरीच आहेत.पण आमचे हे कोरेगाव सातारपासून ११ मैलावर पंढरपूर मार्गावर असून तालुक्याचे ठिकाण ,व्यापार केंद्र,रेल्वे व बस वाहतुकीची सोय सुविधा असलेले एक टुमदार गाव आहे.अनेक शैक्षणिक संस्थाही कार्यरत आहेत.भैरोबा हे ग्रामदैवत असून गावात सर्व जातीधर्माची प्...रार्थनास्थळे आहेत.

      ३०० वर्षापूर्वीचा बोकीलवाडाही वयोमानानुसार हळूहळू अस्थिपंजर होत आहे.ह्याच वाड्यात आमच्या बोकील घराण्याची कुलस्वामिनी श्री तुर्जाभवानीचे मोठे देवघर असून दरवर्षी नवरात्रात गावोगाव विखुरलेली बोकील मंडळी येत असतात.कोणाच्याही घरी स्वतंत्र नवरात्र होत नाही.ह्या देवीला अनेक गावे इनाम म्हणून पुरातन काळी मिळालेली असल्याने आम्हाला "इनामदार बोकील "म्हणूनही गावात ओळखतात.दुसरे कुलकर्णी बोकील म्हणून ओळखतात.आतामात्र इनामे गेली आणि नुसती दारे राहिली आहेत,तीही खिळखिळी होताहेत.काळाचा महिमा दुसरे काय? शुभप्रभात .
      See More
    1. शुभ प्रभात: माझे बँकेतील सहकारी मित्र श्री पी.के.देवधर ह्यांनी एका कविसंमेलनात एक चार ओळींची कविता सदर करून पारितोषिक मिळवले होते.ती कविता माझ्या मित्रांना कळवावी म्हणून हा प्रपंच :/-=ही आता 'डे"ची करामत (जीवनातील एक प्रसंग )
      सांबार संपलेले आता वडे कशाला?
      तोंडात नाही दात आता विडे कशाला?
      भांडून गांजलेशी आता गडे कशाला?
      गेली निघून वेळ आता रडे कशाला?
      (टाळ्या वाजवून दाद दिलीत तर मोठ्याने वाजवा म्हणजे कवीलाही ऐकू जातील)
    1. विनम्र श्रद्धांजली ...सर्जेराव घोरपडे (प्रेस्टीज प्रकाशन पुणे)

      आज आणि आताच सकाळ वाचला.प्रेस्टीज प्रकाशनचे श्री सर्जेराव घोरपडे गेले.त्यांनी अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली.उदा.यशवंतराव चव्हाण_कृष्णाकाठ ,गदिमा,पु.ल.ची पंचाहत्तरी इ.इ.पण माझ्या दृष्टीने आणखी एका संदर्भ ग्रंथाची भर म्हणजे आचार्य अत्रे -प्रतिमा आणि प्रतिभा- १९९७ साली आचार्य अत्रे ज...न्मशताब्दी निमित्ताने प्रेस्टीज प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केला.ह्या ग्रंथ प्रकाशनात माझा खारीचा वाटा आहे ह्याचा मला विशेष आनंद आहे.माझ्या अत्रे साहित्य संग्रहाचा भरपूर उपयोग सर्जेरावना हा ग्रंथ प्रकाशित करताना झाला.ह्या निमित्ताने आमची बर्याच वेळा भेट झाली,चर्चा झाली.अनेक लेख ,कात्रणे,अग्रलेख,बातम्या उपयोगी पडल्या.अत्रे जयंतीच्या दिवशी बाल गंधर्व रंगमंदिरात माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले.ह्या निमित्ताने प्रेस्टीज प्रकाशनने माझा सत्कार श्री.चंद्रचूड यांच्या हस्ते केला.त्याचवेळी आचार्य अत्रे साहित्य दर्शन हे माझे वाण्ग्मयीन प्रदर्शन आयोजित केले होते.अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली होती........एक फोटो पाहुण्यासमवेत .
      आज ह्या आठवणी सर्जेरावांच्या जाण्याने उफाळून आल्या.माझी विनम्र श्रद्धांजली .
      See More
    1. धन्यवाद ....आभार....कृतज्ञता
      फेसबुकच्या माध्यमामुळे अनेकजण अनेक मार्गांनी एकमेकांच्या जवळ येतात आणि आपले अस्तित्व सिद्ध करतात.मी पण याला अपवाद नाहीये.अनेक मित्र,परिचित आणि हितचिंतक(सुद्धा) रोज नवनवीन लेख,कविता,चुटके,चारोळ्या,विनोद,सुभाषिते,शुभेच्छा,
      पोस्ट करतात आणि मलाही त्यातले बरेचसे आवडते.आवडल्यावर मग मला स्वस्थ बसवत नाही."(अधिक)शहाणे करावे सकल जन"ह्या विचाराने मी ते शेअर,लाईक करतो.परिणामी अन...ेकांच्या शुभेच्छा,आभाराच्या comments,मलाच येतात .वास्तविक कर्ताकरविता दुसराच असतो.मी फक्त पोस्टमन आणि कुरियरवाल्याचे काम करतो.फरक एवढाच असतो मी शेअर केलेल्या चौकटीवर माझी एक हेडिंग ची टिकली लावतो. आणि "ये हृदयीचे ते हृदयी "करतो.खरतर ह्या सर्वांचे श्रेय माझ्या ह्या फेसबुकमित्रांनाच आहे.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद,आभार आणि माझी जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो. आता मी अमेरिकेत दिवसभर करतो काय ह्याचे आयते उत्तर सर्वांना मिळेल. शुभप्रभात.
      See More
    1. मराठीकाका ..धन्यवाद

      "मराठी असे आमुची मायबोली ...."असे मी पण इतरांसारखे म्हणत असे,पण संगणकावर मात्र हे मी सोयीस्करपणे विसरत असे.कारण मराठी टंकन थोडे अवघड असते म्हणून.गेली दोन तीन वर्षे मी संगणक थोड्याफार प्रमाणात वापरतोय पण आपल्याला मराठी टंकन करता येत नाही ही खंत मनाशी बाळगूनच.कोणत्याही विषयावर आपल्या अंतरीचे बोल /विचार खास मातृभाषेत व्यक्त करण्याचा आनंद/समाधान काही वेगळेच असते.महाराष्ट्रात अ...सतानादेखील ह्याची जेवढी जाणीव झाली नाही तेवढी अमेरिकेत आल्यानंतर झाली.नव्हे तर मी अस्वस्थ होऊ लागलो.पण कोणाचे दार ठोठवायचे?कोण करणार ह्या बाबत मार्गदर्शन?हा विचार करत असतानाच मला माझे मित्र आणि महाराष्ट्राचे मराठी काका श्री अनिल गोरे ह्यांची आठवण झाली. लगेच प्रथम इंग्रजीतूनच संपर्क साधला.आणि नंतर अ आ इ मराठीत शिकून माझ्या हृदयातले/ मनातले( मनोगत ) फेसबुकवर उतरवू शकलो.सध्यातरी LAPTOP माझा सांगाती आहे.मराठीकाका तुमचा हा पुतण्या तुमचा सदैव ऋणी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
      See More

    No comments:

    Post a Comment