Thursday, February 27, 2014

वडीलार्जीत वारसा (लाख मोलाची ठेव)

खर म्हणजे इन्नाच्या (आईच्या)पाठोपाठ आप्पावर (वडिलांवर) कालच लिहिणार होतो पण आईच्या असह्य आठवणीने "आले लोचानातुनी तोय कितीकदा"अशी अवस्था झाली होती.आज" गदिमा"सारखी दिसणारी वडिलांची मूर्ती डोळ्यासमोर उभी आहे.

माझे वडील म्हणजे दत्तात्रय नारायण बोकील.(१९१३ ते १९७०) ह्यांच...े आयुष्य सातारा कोरेगाव येथेच प्रामुख्याने गेले.ते १९४८ मध्ये S.T.च्या सेवेत सुरवातीपासून होते.नोकरीनिमित्ताने पुणे,पेण,पनवेल येथे बदलीमुळे गेले.आयुष्य भर वेगवेगळ्या स्थरावर झुंजत होते.आर्थिक उब मात्र म्हणावी तशी त्यांना कधीच मिळाली नाही.ह्याचे मला नेहमी दु:ख होते.नेहमी प्रापंचिक आणि कौटुंबिक अडचणी,समस्या ह्यांना तोंड देत असत. संसारातील अनेक जबाबदारया त्यांनी पेलल्या.थोडक्यात ते अन्य पुरूषव्यक्ती प्रमाणेच होते.विशेष असे काही नव्हते.

पण ह्या संसाराच्या जंजाळातही त्यांनी आपली मराठी साहित्याची गोडी कायम ठेवली होती.आणि वारसदार म्हणून माझ्यावर सोपविली.आचार्य अत्रे आणि सदाबहार अशोककुमार ह्यांचे ते निस्सीम चाहते होते.अत्रे साहेबांचे लिखाण,आणि अत्र्यांची कसदार मराठी भाषा त्यांना फार आवडे.मला अत्रे साहित्याची आवड ज्या अग्रलेखामुळे निर्माण झाली तो "सती उषा भार्गव "लेख आम्ही पेणला असताना वडिलांनी कंदिलाच्या प्रकाशातही माझ्याकडून मोठठ्या आवाजात वाचून घेतला होता.तेंव्हा मी खूप कुर कुर केली.आज ह्या माझ्या आत्रेय छंदाने ने मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नेले त्याला कारण माझे वडील आहेत.माझ्या अत्रे साहित्य दर्शन प्रदर्शनाला मी "लाख मोलाची ठेव "हे नाव दिले आहे.माझ्या वडिलांनी मला आर्थिक ठेव काहीही ठेवली नाही.कारण त्या काळची परिस्थिती.पण एका रुपयाचे कर्जही माझ्या डोक्यावर ठेवले नाही. आचार्य अत्रे साहित्याची जबरदस्त गोडी/ आवड माझ्या सारख्या सर्वसामान्य मुलात
रुजवली ही लाख मोलाची ठेव आहे अशी माझी भावना आहे.त्यामुळे जगभर थोडेसे का होईना माझे नाव झाले.

माझ्या आजोबांचे आणि वडिलांचे मराठी इंग्रजी अक्षर फार चांगले होते.त्यांची अनेक पत्रे ६० वर्षे झाली तरी स्मृती म्हणून उराशी बाळगली आहेत.आचार्य अत्रे आणि अशोककुमार ह्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो आहे.हे फार मोठे कर्तव्य पार पडले असे नव्हे तर ह्या निमित्ताने वडिलांची स्मृती सदैव तेवत ठेवली आहे.आज मी इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामधून राहिलो ह्याचा आनंद/ समाधान जरूर आहे पण जन्मभर
आयुष्याशी झगडणाऱ्या माझ्या वडिलांना मात्र हे सुख,हा आनंद,समाधान फारसे लाभले नाही ही खंत मनाला आहे.काय गमंत असते आयुष्याची पहा,कष्ट कोण करतो आणि त्याची फळे कोण खातो? वडिलांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून ही कुसुमांजली पूर्ण करतो

No comments:

Post a Comment