रविवारचा मोरावळा
(दत्तू बांदेकर)
आज रविवार.नेहमीपेक्षाही आजचा अधिक आरामाचा दिवस म्हणून भल्या पहाटे सकाळी ९ वाजता उठल्यावर का कोण जाणे पण मला एकदम" रविवारचा मोरावळा"आणि कै.दत्तू बांदेकरांची आठवण झाली.आजकालच्या पिढीला आणि माझ्या अनेक फेसबुक मित्रांना वरील हेडिंग आणि दत्तू बांदेकर म्हणजे कोण हे बहुतेक माहित नसेल.म्हणून मला जे माहित आहे ते तरी इतरांना सांगावे ह्याकरिता हा प्र...पंच मांडलाय.खरतर मलाही त्यांच्याबद्दल फार माहिती आहे अशातला भाग नाही.दत्तू बांदेकरांची विनोदी लेखनशैली जेव्हा ऐन बहरात होती (म्हणजे १९५५ ते १९६०) त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात मी सातारच्या नगरपालिकेच्या शाळेत इ.५ आणि ६ मध्ये होतो.पण नंतर आचार्य अत्रेच्या मुळे मला थोडेफार दत्तू बांदेकर समजले
आचार्य अत्रे ह्यांनी २० वर्षे" साप्ताहिक नवयुग "मोठ्या प्रभावीपणे चालविले.महाराष्ट्रातील जनता" नवयुगची" अगदी चातकासारखी वाट पाहत असे.ते अत्रे ह्यांचे "अत्रे उवाच "आणि दत्तू बांदेकरांचा "रविवारचा मोरावळा ".वाचण्यासाठी.हे सदर अतिशय विनोदी भाषेत बांदेकर लिहित असत.त्यामध्ये विडंबन काव्य,चेष्टा-मस्करी,टपल्या आणि टिचक्या,फिरक्या,चारोळ्या असा बराच मालमसाला असे.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रचंड प्रमाणात सुरु होती त्यावेळी अनेक राजकीय व्यक्तींचे,पुढार्यांचे,मंत्र्य ांचे आणि ढोगी देशभक्तांचे 'वस्त्रहरण 'बांदेकर आपल्या 'रविवारच्या मोरावळ्यात' करीत.त्यामुळे मराठी माणूस ह्या सदरावर खुश असे.आचार्यअत्रे आणि दत्तू बांदेकरानी जी काही राजकीय विडंबन गीते लिहिली ती सर्व "पंचगव्य"ह्या काव्यसंग्रहात आहेत.बादेकरांचेही लिखाण "चिरीमिरी "\"प्यारी"अशा
काही पुस्तकामधून आहे.बांदेकरांच्या लेखणीचा अत्रेवर प्रभाव असल्याने'' नवयुग मध्ये
त्यांना अत्र्यांचे उजवे हात समजत. बांदेकरावर अत्र्यांनी "कारुण्याचा विनोदी शाहीर "हा मृत्युलेख लिहिला आहे.इतर कोणीही आले गेले तरी चालेल पण मी बांदेकराना कधीही सोडणार नाही असे अत्रे म्हणत.इतका प्रभाव होता.बादेकरानीही "आमचे साहेब "म्हणून अत्र्यांवर एक उत्कृष्ठ लेख लिहिला आहे.बांदेकरांच्या निधनानंतर त्यांची जागा कै.वि.आ.बुवा ह्यांनी घेतली.म्हणजे अत्र्यांच्याच पसंतीने आणि सम्मतीने.
बांदेकरांच्या लेखणीच्या प्रभावामुळे अनेकजणांना त्यांच्याविषयी कुतूहल असे.एके दिवशी एक ग्रहस्थ बांदेकर कोण आणि कसे आहेत हे पाहण्यासाठी "दै .मराठा"मध्ये आले अत्रेसाहेबांना भेटले आणि" बांदेकर कोण आणि कुठ बसतात? असे विचारले.तेंव्हा अत्रे त्यांना म्हणाले "त्या समोरच्या खोलीचे दार उघडा आणि पहा.समुद्राकडे पहात खिडकीत पाय टाकून एकजण बिड्या ओढीत बसलेला माणूस दिसेल.जो पाहताच हे बांदेकर नसतील असेच तुम्हाला वाटेल पण तेच दत्तू बांदेकर आहेत."बांदेकर हे अतिशय साधे सरळ मार्गी होते.त्यांचे हस्ताक्षरही चांगले होते असे म्हणतात.
ह्या दोन्हीही विनोद लेखकांना विनम्र अभिवादन'
शुभप्रभात
(दत्तू बांदेकर)
आज रविवार.नेहमीपेक्षाही आजचा अधिक आरामाचा दिवस म्हणून भल्या पहाटे सकाळी ९ वाजता उठल्यावर का कोण जाणे पण मला एकदम" रविवारचा मोरावळा"आणि कै.दत्तू बांदेकरांची आठवण झाली.आजकालच्या पिढीला आणि माझ्या अनेक फेसबुक मित्रांना वरील हेडिंग आणि दत्तू बांदेकर म्हणजे कोण हे बहुतेक माहित नसेल.म्हणून मला जे माहित आहे ते तरी इतरांना सांगावे ह्याकरिता हा प्र...पंच मांडलाय.खरतर मलाही त्यांच्याबद्दल फार माहिती आहे अशातला भाग नाही.दत्तू बांदेकरांची विनोदी लेखनशैली जेव्हा ऐन बहरात होती (म्हणजे १९५५ ते १९६०) त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात मी सातारच्या नगरपालिकेच्या शाळेत इ.५ आणि ६ मध्ये होतो.पण नंतर आचार्य अत्रेच्या मुळे मला थोडेफार दत्तू बांदेकर समजले
आचार्य अत्रे ह्यांनी २० वर्षे" साप्ताहिक नवयुग "मोठ्या प्रभावीपणे चालविले.महाराष्ट्रातील जनता" नवयुगची" अगदी चातकासारखी वाट पाहत असे.ते अत्रे ह्यांचे "अत्रे उवाच "आणि दत्तू बांदेकरांचा "रविवारचा मोरावळा ".वाचण्यासाठी.हे सदर अतिशय विनोदी भाषेत बांदेकर लिहित असत.त्यामध्ये विडंबन काव्य,चेष्टा-मस्करी,टपल्या आणि टिचक्या,फिरक्या,चारोळ्या असा बराच मालमसाला असे.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रचंड प्रमाणात सुरु होती त्यावेळी अनेक राजकीय व्यक्तींचे,पुढार्यांचे,मंत्र्य
काही पुस्तकामधून आहे.बांदेकरांच्या लेखणीचा अत्रेवर प्रभाव असल्याने'' नवयुग मध्ये
त्यांना अत्र्यांचे उजवे हात समजत. बांदेकरावर अत्र्यांनी "कारुण्याचा विनोदी शाहीर "हा मृत्युलेख लिहिला आहे.इतर कोणीही आले गेले तरी चालेल पण मी बांदेकराना कधीही सोडणार नाही असे अत्रे म्हणत.इतका प्रभाव होता.बादेकरानीही "आमचे साहेब "म्हणून अत्र्यांवर एक उत्कृष्ठ लेख लिहिला आहे.बांदेकरांच्या निधनानंतर त्यांची जागा कै.वि.आ.बुवा ह्यांनी घेतली.म्हणजे अत्र्यांच्याच पसंतीने आणि सम्मतीने.
बांदेकरांच्या लेखणीच्या प्रभावामुळे अनेकजणांना त्यांच्याविषयी कुतूहल असे.एके दिवशी एक ग्रहस्थ बांदेकर कोण आणि कसे आहेत हे पाहण्यासाठी "दै .मराठा"मध्ये आले अत्रेसाहेबांना भेटले आणि" बांदेकर कोण आणि कुठ बसतात? असे विचारले.तेंव्हा अत्रे त्यांना म्हणाले "त्या समोरच्या खोलीचे दार उघडा आणि पहा.समुद्राकडे पहात खिडकीत पाय टाकून एकजण बिड्या ओढीत बसलेला माणूस दिसेल.जो पाहताच हे बांदेकर नसतील असेच तुम्हाला वाटेल पण तेच दत्तू बांदेकर आहेत."बांदेकर हे अतिशय साधे सरळ मार्गी होते.त्यांचे हस्ताक्षरही चांगले होते असे म्हणतात.
ह्या दोन्हीही विनोद लेखकांना विनम्र अभिवादन'
शुभप्रभात
No comments:
Post a Comment