कोल्हापूर ते सांगली आणि सांगली ते कोल्हापूर:
(दैनंदिन सुहानी सफर)
कालपासून माझे मन बिंदू चौक, लक्ष्मीपुरी,राजाराम पुरी,दसरा चौक, खासबाग असे करत करत पंचगंगेच्या काठाकाठाने रमतगमत येत येत कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर एक नंबरच्या platformवर उभ्या असलेल्या सांगली "पाशिंजर "मध्ये आज येऊन बसले.आमच्या बँकेने मला ही रम्यनगरी आंदण म्हणून दिलेली नसल्याने ठराविक काळ झाला (सोप्या भाषेत ...'दिवस भरले ")म्हणजे नारळ-पंचा आणि बदलीची ओर्डर
हातात देऊन आणि घेऊन पुढच्या ब्रान्च् ची वाट धरायची असा साधारण शिरस्ता असतो.(म्हणजे असायचा हल्लीचे माहित नाही ) पु.लंच्या भाषेत सांगायचे तर आमच्या जीवनातले उष्टे खरकटे(म्हणजे अन्नाचा शेअर नाहीतर काहीजण शब्दशः अर्थ लावायचे म्हणून खुलासा )कोल्हापूरनंतर सांगलीत सांडले होते.पण घरची मंडळी येथील स्थावर आणि जंगम मालमता सोडून सांगलीला येण्यास तयार नव्हती.मलाही सर्व सुरळीत चाललेले बदलून "बदलीचे "दुखणे नको होते."पोटासाठी भटकत जरी दूर देशी" फिरण्याचे माझ्या नशिबात नसले तरी दूर गावी जायलाच हवे होते म्हणून मी एकट्यानेच दैनंदिन सांगली सफर करण्याचे ठरविले.१९८६ ते १९८८ तीन वर्षे गणपती हे ग्राम दैवत असलेल्या पवित्र गावात काढली.
सकाळची ही गाडी म्हणजे चाकर मान्यांचीच असे.महिन्याचा पास काढला की T.C.नामक नोकराचे भय नसे.आमच्या डब्यात विविध बँकेचे लोक आणि शासकीय कर्मचारी असत.गप्पाटप्पा,वायफळ चर्चा,हास्यविनोदात जयसिंगपूर स्टेशन आलेले कळत नसे.आणि कळले की बाहेर उभी असलेली माधव नगरची बस पकडण्यासाठी पळापळ हा नेहमीचा कार्यक्रम असे.तासाभराने सांगली औ.वसाहत शाखेत जात असे.ब-याच वेळेला त्याच ट्रेनने मिरज मार्गे प्रवास होई..पण मिरजेला कोयना express ही आमच्या गाडीची"सवत "उभी असायची.मग आधी" ही का ती" जाणार हा सार्वजनिक चर्चेचा विषय फलाटावरील चहा पिता पिता चघळला जाई. रेल्वेने जाण्यात एक फायदा असा की सांगली स्टेशनवर गाडी "खाली "झाल्यावर रेल्वे engine वळण्यासाठी ह्याच लायनीत पुढे एक मैल जात असे.नंतर तसेच पुढे चालत गेले की आमची ब्रांच असे.
रोजची मंडळी सांगलीला डब्यातून engine मध्ये येऊन बसत.डायवर दादांशी गप्पा मारताना त्यांचे गाडीचे शिट्टी वाजवण्याचे काम मी पण एकदा हौसेखातर केल्याचे आठवते आहे.दिवसभरचे डेबिट/क्रेडीट ,ग्यानबा / तुकाराम सायंकाळी ६ला संपविले की पुन्हा सांगली कोल्हापूर ह्या ६.२० च्या गाडीने रात्री ८.१५ ला कोल्हापूर.असा सर्व साधारण प्रवासी योग असे. अधूनमधून डब्यात सार्वजनिक भेळेचा कार्यक्रम महिलावर्ग घरचे कार्य समजून मोठ्या हिरीरीने करे.".केसरी " चे एक संपादक आमच्याच डब्यात असत'.अत्रेप्रेम' हे आमचे दोघांचे एकच गोत्र असल्याने येताना गप्पांची मैफिल रंगत असे.कोल्हापुरात गेल्यावर आमची "प्रिया "( म्हणजे स्कूटर ) माझी वाट पहात सकाळपासून उभी असे.तिच्यासह नागाला पार्कची सफर होई.
रविवार मात्र पूर्णपणे कोल्हापुरात नेहमीप्रमाणे घालवायचा. महाद्वार रोडवरून एक फेरी मारून झाली की कृत कृत्य झाल्यासारखे वाटे.पुन्हा सोमवार पासून नवीन साप्ताहिकी सुरु होई. "पंचगंगेचे पाणी,वारणेचे दुध,आणि चोरगे ह्यांची मिसळ "हे "ह्या" तब्येतीचे रहस्य होते. पण १० वर्ष कोल्हापुरात काढूनही कोणत्याच रंगाचा रस्सा मी कधी चाखला नाही.त्यामुळे अनेकांना 'माझे कसं होणार?' ह्याची चिंता वाटे.कारण मी' काहीच' न खाणारा,' न पिणारा ' आणि न ओढणारा बाळबोध माणूस.असे असूनसुद्धा मी कोल्हापूर सांगलीचे जीवन मोठ्या उत्साहात,आनंदात जगलो आहे.अनेकांची मैत्री, प्रेम आणि सुखद सहवास लाभला आहे.सर्वसामान्य भित्र्या काळजाच्या माणसाला आणखी काय हवे?वर्तमानकाळ म्हणजे हार्ड कॅश असते अस म्हणतात.कारण तो stale किंवा postdated चेक़ नाही.मी रोजच्या रोज आनंदी जीवनाचे नाणे खणखणीत वाजवून घेतो.ही समाधानाची बाब आहे. आता नंतर दुस-या कोणत्या तरी गावाला जाणार आहे आणि बरोबर तुम्हालाही नेणार आहे.

No comments:
Post a Comment