लॉवरेन्स एक्सप्रेस वे (LAWRENCE EXPRESS WAY)
दोस्तांनो आज मी आमच्या येथील घराच्या राखण दाराची आणि तुमची भेट , थोडीशी ओळख करून देणार आहे.२४ तास कधीही न झोपणारा,duty वर असताना कधीही न पेंगणाऱ्या एका वाचमनचचा परिचय माझ्या दोस्तांना करून देण्याचे बरेच दिवस डोक्यात होतेच पण आज दुसरे तिसरे काही न लिहिता मित्रवर्य लॉरेन्सवरच लिहावयाचे असे ठरवले आणि केली सुरवात...........
...आपल्या देशात आणि राज्यात पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सुरु झाल्यावर सर्वांना किती आनंद झाला होता.महाराष्ट्र राज्याचे हा रस्ता म्हणजे एक वैभवच आहे.ह्या रस्त्यावरून प्रवास करताना सर्वांना वेगळाच आनंद वाटतो.अधून मधून हा रस्ता काहीतरी कारणाने गाजतच असतो.अपघात,टोल,वेगमर्यादा,इ.इ. आणि इतरही अनेक कारणामुळे.पण त्याचा पहिला क्रमांक आणि मानाचे स्थान अबाधित आहे.हे सर्व आठवायचे कारण म्हणजे सध्या मी CA usa सनीवेल येथे AVALON COMMUNITY येथे रहात असून ह्या वसाहतीच्या कोणत्याही दारावर watchman/security नाही.मात्र लॉवरेन्स वे हाच मोठा आधारस्थंभ आहे.ह्याची साथसंगत अहर्निश असते.मध्यरात्रीच्या सुमारास एखादा दुसरा तासच थोडी वर्दळ( म्हणजे गाड्यांचीच) कमी असते.नाहीतर एरव्ही सुसाट वेगाने धावणाऱ्या असंख्य मोटारी.अमेरिकेत माणसापेक्षाही मोटारी जास्त.
आमच्या येथील घराच्या कोणत्याही खोलीतून,कोणत्याही दारातून किंवा खिडकीमधून समोर बधीतले की सदैव एकच विहंगम दृश्य दिसते.ते म्हणजे विविध प्रकारच्या आकर्षक मोटारी,ट्रक्स,बसेस आणि त्यांच्या टायरचे,हॉर्न्न चे" मंजुळ "आवाज.त्यातच एखादा फटफटीवाला(म्हणजे येथील भाषेत बाईकवाला)इतक्या कर्णकरकश्य आवाजातून,इतर सर्व चार् चाकींना मागे डावलून सरकन पुढे सटकतो.जसं काही तो ह्याच रस्त्याने चंद्रावर निघालाय आणि बाकीच्या रस्त्यावर ट्रफिकजाम आहे. ह्या रस्त्यावर कोणालाही चालायला बंदी आहे. हा रस्ता क्रॉस करताना जर कोणी नियम डावलून उल्लंघन केले तर त्याचे काही खरे नसते.म्हणून मी गाडी नाही चालविली तरी चालेल पण रस्ता क्रॉस करण्याचे तंत्रद्यान.. प्राप्त करून घेतले.आहे.
लहान मुलांच्या खेळण्यात आपण सर्व प्रकारच्या मोटारी कौतुक आणि कुतूहलाने पाहतोपण मी हे सर्व आकर्षण येथे प्रत्यक्ष अनुभवतो ह्याचा आनंद वाटतो.येथे ट्रफिक सिग्नल २४ तास उत्तम प्रकारे चालू असतात.गाडीधारक/वाहन चालक कोणीही नियमाविरुद्ध वाहने चालवीत नाही .तसे केल्यास जबरदस्त दंडाचा फटका बसतो.त्यासाठी अण्णा ,भाऊ ,तात्या ,दादा,हे संकटकालीन गोतावळे उपयोगी पडत नाहीत.Lawrence आणि ओकमीड चौकात गाड्यांची वर्दळ पाहून नवखा माणूस एकदम झापडतोच.पण या रस्त्याचे,आणि चौकाचे सौंदर्य अवर्णीय आहे.विशेषता सायंकाळच्या वेळी गाड्यांचे लालदिवे झळकू लागले म्हणजे असंख्य डाळींबे फुटल्याप्रमाणे वाटते.ह्या जगात कुणाला कशाचा आनंद वाटेल सांगता येत नाही.
Lawrence express वे प्रमाणे आणखीही बरेच ex.way, फ्री वेज संनीवेल मधून जातात.विशेष म्हणजे 101 हा फ्री वे थेट लॉसएंजिल्स पर्यंत जातो. एवं गुण विशिष्टं
रोडराजाला सलाम
शुभप्रभात :
दोस्तांनो आज मी आमच्या येथील घराच्या राखण दाराची आणि तुमची भेट , थोडीशी ओळख करून देणार आहे.२४ तास कधीही न झोपणारा,duty वर असताना कधीही न पेंगणाऱ्या एका वाचमनचचा परिचय माझ्या दोस्तांना करून देण्याचे बरेच दिवस डोक्यात होतेच पण आज दुसरे तिसरे काही न लिहिता मित्रवर्य लॉरेन्सवरच लिहावयाचे असे ठरवले आणि केली सुरवात...........
...आपल्या देशात आणि राज्यात पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सुरु झाल्यावर सर्वांना किती आनंद झाला होता.महाराष्ट्र राज्याचे हा रस्ता म्हणजे एक वैभवच आहे.ह्या रस्त्यावरून प्रवास करताना सर्वांना वेगळाच आनंद वाटतो.अधून मधून हा रस्ता काहीतरी कारणाने गाजतच असतो.अपघात,टोल,वेगमर्यादा,इ.इ.
आमच्या येथील घराच्या कोणत्याही खोलीतून,कोणत्याही दारातून किंवा खिडकीमधून समोर बधीतले की सदैव एकच विहंगम दृश्य दिसते.ते म्हणजे विविध प्रकारच्या आकर्षक मोटारी,ट्रक्स,बसेस आणि त्यांच्या टायरचे,हॉर्न्न चे" मंजुळ "आवाज.त्यातच एखादा फटफटीवाला(म्हणजे येथील भाषेत बाईकवाला)इतक्या कर्णकरकश्य आवाजातून,इतर सर्व चार् चाकींना मागे डावलून सरकन पुढे सटकतो.जसं काही तो ह्याच रस्त्याने चंद्रावर निघालाय आणि बाकीच्या रस्त्यावर ट्रफिकजाम आहे. ह्या रस्त्यावर कोणालाही चालायला बंदी आहे. हा रस्ता क्रॉस करताना जर कोणी नियम डावलून उल्लंघन केले तर त्याचे काही खरे नसते.म्हणून मी गाडी नाही चालविली तरी चालेल पण रस्ता क्रॉस करण्याचे तंत्रद्यान.. प्राप्त करून घेतले.आहे.
लहान मुलांच्या खेळण्यात आपण सर्व प्रकारच्या मोटारी कौतुक आणि कुतूहलाने पाहतोपण मी हे सर्व आकर्षण येथे प्रत्यक्ष अनुभवतो ह्याचा आनंद वाटतो.येथे ट्रफिक सिग्नल २४ तास उत्तम प्रकारे चालू असतात.गाडीधारक/वाहन चालक कोणीही नियमाविरुद्ध वाहने चालवीत नाही .तसे केल्यास जबरदस्त दंडाचा फटका बसतो.त्यासाठी अण्णा ,भाऊ ,तात्या ,दादा,हे संकटकालीन गोतावळे उपयोगी पडत नाहीत.Lawrence आणि ओकमीड चौकात गाड्यांची वर्दळ पाहून नवखा माणूस एकदम झापडतोच.पण या रस्त्याचे,आणि चौकाचे सौंदर्य अवर्णीय आहे.विशेषता सायंकाळच्या वेळी गाड्यांचे लालदिवे झळकू लागले म्हणजे असंख्य डाळींबे फुटल्याप्रमाणे वाटते.ह्या जगात कुणाला कशाचा आनंद वाटेल सांगता येत नाही.
Lawrence express वे प्रमाणे आणखीही बरेच ex.way, फ्री वेज संनीवेल मधून जातात.विशेष म्हणजे 101 हा फ्री वे थेट लॉसएंजिल्स पर्यंत जातो. एवं गुण विशिष्टं
रोडराजाला सलाम
शुभप्रभात :
No comments:
Post a Comment