SUNNYVALE: सनीवेल (बुद्रुक)
चार पाच दिवसापूर्वी Sunnyvale संनीवेल (खुर्द ) ह्या भागातून तुम्हाला हिंडवून आणले.आता Sunnyvale बुद्रुक ओघानेच आले.चला तर मग माझ्याबरोबर.Lawrence ex.way च्या पल्याडचा भाग म्हणजे बुद्रुक माझ्या सोयीप्रमाणे.Lawrence आणि oakmead चौकातच एक gas स्टेशन म्हणजे पेट्रोल पुम्प आहे.तेथेच कारवाश आहे.(Carwash)ह्या भागात प्रामुख्याने निवासी घरे,बंगले सोसायटी,...आहे.काही कंपन्या पण आहेत.पण खुर्द सारख्या जास्त नाहीत.तिकडे जसे OAKMEAD VILLAGE आहे तसे इकडे LAKEWOOD VILLAGE आहे.येथेच MEDICAL UNIVERCITY असून प्रसिद्ध AMD ही I.T. कंपनी आहे.कंपनीची इमारत whitehouse प्रमाणे गोलाकार असून दारासमोरील प्रांगणात अमेरीकेचा राष्ट्रध्वज फडफडत असतो.माझी आवडती सिटीबस NO.55 ह्याच भागातून जात असल्याने हा भाग माझ्या चांगला परिचयाचा झाला आहे.ह्याच मार्गावर एका बाजूला एक सुंदर अलिशान घरांची कम्युनिटी आहे.माझे बँकेतील एक सहकारी येथे रहात होते तेंव्हा मी ह्या सोसायटीमध्ये येत असे.शेजारी SWEGLES PARK आहे.तेथे मस्त हिरवळ असलेले ग्राउंड असून जॉगिंग पार्क आहे.अनेक ज्येष्ठ नागरिक त्याचा उपभोग घेतात. SANDIS नावाची ENGG,कंपनी येथेच आहे. ह्या भागाला FAIR OAK PARK म्हणून ओळखतात.मुख्य रस्त्याच्या दुस-या बाजूला FAIROAK PLAZA नावाचे COMMERICAL COMPLEX आहे,
ह्या संकुलात SUPER SUNNYVALE नावाचे एक मेक्सिकन/अमेरिकन स्टोर आहे.तेथे अर्थातच सर्व ग्राहक अमेरिकन,चायनीज,आहेत.मेक्सिकन/ चायनीज/विएटनामीज अन्नछत्रे असून इतरही दैनंदिन जीवनासाठी लागणा-या वस्तूंची दुकाने आहेत.समोरच अमेरिकेच्या रिवाजाप्रमाणे मोठे कार पार्किंग आहे.येथून जवळच रेनबो ही बालवाडी/शाळा असून खेळाचे मोठे मैदान आहे.skate park,टेनिस कोर्ट, एक सभागृह इ.इ.आहे.दुतर्फा बसथांबे असून बरोबर बस येण्याच्या वेळेसच तेथे माणसे दिसतात नाहीतर तेथे अक्षरश: कुत्रेही नसते.नाहीतर ....जाऊ द्या.नजरेत भरणारी दुसरी बाब म्हणजे येथील पदपथ.फारच प्रशस्थ,आणि स्वच्छ आहेत.ह्याचे कारण म्हणजे त्याला लागुनच कोणत्याही टप-या नसल्याने 'फूटपाठचा'' फूडपाथ 'झालेला नाही. ह्यावेळी मात्र मला आपल्या येथील फुटपाथची आवर्जून आठवण येते. कारण अनेक कसरती करूनच पुढे चालता येते हा रोजचा अनुभव आहे.सुरवातीला तर इतक्या देखण्या आणि कमालीच्या फूटपाथला "पाय "लावायलाच मला नको वाटले म्हणून दोन्ही कर जोडूनच नंतर त्यावरून लेफ्ट-राईट सुरु केले. फुटपाथचा उपयोग करणारी माणसे येथे किती आणि कुठे आहेत?बहुतेक जनता आपापल्या घरात आणि कार मध्येच असते. त्यामुळे एका विनोदी लेखकाने आपल्या अमेरिकादौरा प्रवासाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की"येथील रस्त्यावर तूप जरी सांडले तरी ते चाटून खायला हरकत नाही इतके रस्ते स्वच्छ आहेत."
FAIR OAK PLAZA च्या जवळच अमेरिकन पद्धतीचे बांधकाम असलेली घरे/बंगले वजा भागातून जाताना मला पुण्याच्या लोकमान्यानगरची आठवण झाली.अर्थात काही बाबतीतच.अनेक गल्ल्या असून प्रत्येक गल्लीच्या सुरवातीला त्या रस्त्याचे नाव SANTA किवा' सेंटने 'सुरु होते.प्रत्येक बंगल्याच्या दाराशी अमेरिकन गाड्यांची 'खिलारी जोडी'असतेच.घराचा क्रमांक मोठ्या अक्षरात ठसठशीतपणे दिसतो.मात्र घराच्या मालकाच्या नावाची पाटी (म्हणजे ना.ना.फडणीस) अशी पाहिली नाही.प्रत्येक बंगाल्यासमोर छोटीशी फुलबाग,फळफुल झाडे,रेखीव कम्पौंड,टपाल पेटी,बागेत लहान पूल,घर,दिवे,पुतळे असतात.मला तर दिवाळीतील किल्ल्याचीच आठवण येते.अशाच एका घरासमोर मी बराच वेळ उभे राहून हे नेत्रसुख घेतो. सर्व दिसते फक्त माणसेच कुठे दिसत नाहीत.माणसे बघायला सुद्धा येथे मॉल मध्ये जावे लागते.रस्त्यावर संचार् बंदी असेच वातावरण दिसते.येथील रूढी परंपरा अशीच आहे त्याला कोण काय करणार?
शुभप्रभात :See More
चार पाच दिवसापूर्वी Sunnyvale संनीवेल (खुर्द ) ह्या भागातून तुम्हाला हिंडवून आणले.आता Sunnyvale बुद्रुक ओघानेच आले.चला तर मग माझ्याबरोबर.Lawrence ex.way च्या पल्याडचा भाग म्हणजे बुद्रुक माझ्या सोयीप्रमाणे.Lawrence आणि oakmead चौकातच एक gas स्टेशन म्हणजे पेट्रोल पुम्प आहे.तेथेच कारवाश आहे.(Carwash)ह्या भागात प्रामुख्याने निवासी घरे,बंगले सोसायटी,...आहे.काही कंपन्या पण आहेत.पण खुर्द सारख्या जास्त नाहीत.तिकडे जसे OAKMEAD VILLAGE आहे तसे इकडे LAKEWOOD VILLAGE आहे.येथेच MEDICAL UNIVERCITY असून प्रसिद्ध AMD ही I.T. कंपनी आहे.कंपनीची इमारत whitehouse प्रमाणे गोलाकार असून दारासमोरील प्रांगणात अमेरीकेचा राष्ट्रध्वज फडफडत असतो.माझी आवडती सिटीबस NO.55 ह्याच भागातून जात असल्याने हा भाग माझ्या चांगला परिचयाचा झाला आहे.ह्याच मार्गावर एका बाजूला एक सुंदर अलिशान घरांची कम्युनिटी आहे.माझे बँकेतील एक सहकारी येथे रहात होते तेंव्हा मी ह्या सोसायटीमध्ये येत असे.शेजारी SWEGLES PARK आहे.तेथे मस्त हिरवळ असलेले ग्राउंड असून जॉगिंग पार्क आहे.अनेक ज्येष्ठ नागरिक त्याचा उपभोग घेतात. SANDIS नावाची ENGG,कंपनी येथेच आहे. ह्या भागाला FAIR OAK PARK म्हणून ओळखतात.मुख्य रस्त्याच्या दुस-या बाजूला FAIROAK PLAZA नावाचे COMMERICAL COMPLEX आहे,
ह्या संकुलात SUPER SUNNYVALE नावाचे एक मेक्सिकन/अमेरिकन स्टोर आहे.तेथे अर्थातच सर्व ग्राहक अमेरिकन,चायनीज,आहेत.मेक्सिकन/
FAIR OAK PLAZA च्या जवळच अमेरिकन पद्धतीचे बांधकाम असलेली घरे/बंगले वजा भागातून जाताना मला पुण्याच्या लोकमान्यानगरची आठवण झाली.अर्थात काही बाबतीतच.अनेक गल्ल्या असून प्रत्येक गल्लीच्या सुरवातीला त्या रस्त्याचे नाव SANTA किवा' सेंटने 'सुरु होते.प्रत्येक बंगल्याच्या दाराशी अमेरिकन गाड्यांची 'खिलारी जोडी'असतेच.घराचा क्रमांक मोठ्या अक्षरात ठसठशीतपणे दिसतो.मात्र घराच्या मालकाच्या नावाची पाटी (म्हणजे ना.ना.फडणीस) अशी पाहिली नाही.प्रत्येक बंगाल्यासमोर छोटीशी फुलबाग,फळफुल झाडे,रेखीव कम्पौंड,टपाल पेटी,बागेत लहान पूल,घर,दिवे,पुतळे असतात.मला तर दिवाळीतील किल्ल्याचीच आठवण येते.अशाच एका घरासमोर मी बराच वेळ उभे राहून हे नेत्रसुख घेतो. सर्व दिसते फक्त माणसेच कुठे दिसत नाहीत.माणसे बघायला सुद्धा येथे मॉल मध्ये जावे लागते.रस्त्यावर संचार् बंदी असेच वातावरण दिसते.येथील रूढी परंपरा अशीच आहे त्याला कोण काय करणार?
शुभप्रभात :See More
No comments:
Post a Comment