संगीत प्रेम:आवड
प्रत्येकाने काहीतरी/कोणता तरी छंद जोपासावा हे अनेकजण नेहमी दुस-याला सांगत असतात.अशा लोकांचा बहुतेक दुस-यांना सल्ला/उपदेश करण्याचाच छंद असावा असे वाटते'.काहीना 'मात्र उपजतच एकाद्या छंदाची गोडी,आवड असते.त्यासाठी त्यांना अशा सल्लेदारांची गरज नसते.ह्या 'काही'त मी पण आहे.मला संगीताची म्हणजे गाण्याची आवड वयाच्या ८ व्या वर्षापासून असावी असे वाटते.माझ्या लहानपणी ...आम्ही कोरेगाव येथे रहात होतो.कोरेगावच्या कोर्टरस्त्यावर आमची मावशी रहात होती. नेहमी तिच्या घरी जातायेता वाटेत माझा एक स्टोप (stop)असे.तो म्हणजे कोरेगावातील एकमेव "सदानंद संगीत विद्यालय "आमचे गाव तसे लहानच होते.पण संगीताची आवड असणारी बरीच मंडळी तेथे होती. 'त्या' रस्त्यावरून जाताना कधी गवयाच्या ताना कानावर पडत तर कधी नुसताच पेटी तबला ऐकू येई.एकजण उत्तम व्हायोलीन वाजवत तर दुसरे वीणा वाजवत.विद्यालयाजवळ आलो की माझी पाऊले तिकडे वळत आणि मी दारातच उभा राहून ऐकत असे/ पहात असे.एक दिवस गुरुजींनी मला विचारले "उद्यापासून गाण्याच्या क्लासला येशील का?"अत्यानंदाने मी "हो "म्हटले.दुस-या दिवशी मोठ्या खुशीत एक वही घेऊन क्लासला गेलो.गुरुजींनी पहिला राग शिकविला म्हणजे सांगितला तो "भूप "त्यातील चीज "भूल कशी पडली जीवाला " ही होती असे आठवते.सांगायची गोष्ट म्हणजे हा दिवस आणि हा राग माझा पहिला आणि शेवटचाच ठरला.संगीत शिकण्यापेक्षा ऐकणे चांगले वाटले की काय देव जाणे.नंतर क्लासमध्ये अनेकदा गेलो पण क्लासचा" माजी विद्यार्थी "म्हणूनच. आमच्या घराण्यातही तशी कोणालाच संगीताची आवड नव्हती. मी तानसेन,भीमसेन व्हायचे म्हणून गेलो खरा पण शेवटी कानसेनच राहिलो.स्वरराज छोटा गंधर्व हे कोरेगावचेच सुपुत्र असल्याने ते जेंव्हा येत तेंव्हा क्लासला भेट देत.त्यावेळी गावातील बुजुर्ग मंडळी जमत.दर गुरुवारी क्लासमध्ये भजने म्हणत."जय जगदीश हरे "हे सर्वजण अत्यंत तन्मयतेने म्हणत.सारांश लहान गावातूनही सांस्कृतिक दृष्ट्या पोषक वातावरण असे.
गाणे शिकलो जरी नाही तरी मला तबला मात्र पहिल्यापासून खूप प्रिय होता.त्यामुळे पुढे जेंव्हा आम्ही सातारला राहायला आलो तेंव्हा (१९५४/५५साली ) मी अमर कला मंदिर ह्या संगीत क्लासमध्ये पेठेतील अनेक मुलांप्रमाणे तबला शिकायला सुरवात केली.इर्षेने सर्वांच्या बरोबर गांधर्व महाविद्यालयाच्या तबल्याच्या दोन परीक्षा पण दिल्या.सरावासाठी आर्थिक ओढाताण करून पंचेचाळीस रुपये (४५ ) एवढी "प्रचंड "रक्कम खर्चून वडिलांनी मला तबला घेतला.पण मेहनत,सराव जो काही असतो तो मात्र झाला नाही.कोल्हापूरलाही मी गुणीदास संगीत विद्यालात तबला शिकत असे,पुढे पुण्याला आल्यावर सामंत क्लास,शांतीलाल शहा ह्यांचे मार्गदर्शन घेतले.अनेक दिग्गज तबलानवाझांचा तबला मनसोक्त ऐकला.त्यात अल्लारखासाहेब ,पंडित
सामताप्रसाद झाकीर हुसेन लतीफ अहमद ,शफात अहमद,कुमार बोस सपन चौधरी आणि असे बरेच जण आहेत.सवाई गंधर्व महोत्सवाला १९७४ पासून मी हजेरी लावली आहे.माझे मुख्य आकर्षण तबला साथीदार कोण ह्याकडेच असते.
आपल्याला संगीताचे फार ज्ञान मिळाले नाही तरी संगीताचा थोडातरी कान मिळाला ह्यात मला आनंद आहे.आतापर्यंत जागतिक आणि भारतीय कीर्तीच्या गवयांचे गाणे मी भरपूर ऐकले आहे.अनेक मैफिलीना उपस्थित राहिलो आहे.मिरज, औंध येथील संगीत महोत्सव ऐकले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे तर माझे संगीतामधले दैवतच मला माझ्या आयुष्यात .त्यांचा थोडा सहवास,त्यांच्याशी चार शब्द बोलयाला मिळाले हे भाग्यच म्हणायचे.नाहीतर काय? अनेक सांगीतिक आठवणी आहेत.पण त्यासाठी वेळ आणि जागा कुठाय?संगीताच्या प्रेमामुळे अनेक मान्यवर कलावंतांवर आलेले लेख,बातम्या,कात्रणे ,सर्व वृतपत्रे,विशेषांक मी आजपर्यंत संग्रहित केले आहेत.पण आता ह्यापुढे हा मौल्यवान ठेवा,ही मर्म बंधातली ठेव त्यांच्या वारसदारांकडे,शिष्यांकडे,आणि संस्थेकडे सुपूर्द करणार आहे. म्हणजे सर्व सुस्थळी पडेल असे वाटते.
शुभप्रभात

No comments:
Post a Comment