अशी माणसे तशी माणसे
मागील पाच महिन्यापासून मी येथील AVALON COMMUNITY मध्ये रहात आहे.जवळजवळ 700/750 निवासी गाळे/ घरे येथे आहेत.जगाच्या अनेक देशांतील लोक ह्या संकुलात रहात असून प्रत्येकजण आपापली रूढी परंपरा ,रीतीरिवाज,स्वभाव वैशिष्ट्ये बाळगून रहात आहे.'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे सूत्र येथेही लागू आहे.ह्या संकुलात अमेरिकन्स,चायनीज,भारतीय,मेक्सिकन जापनीज आणि असे बरेच काही जात...ीधर्माचे लोक व्यवसाय/नोकरी निमित्ताने येथे रहातात.मला जाणवलेली आणि आढळलेली काही ठळक लोक वैशिष्ट्ये :
अमेरिकन्स : सर्वसाधारणपणे अमेरिकन माणूस हा आपल्याच नादात म्हणा किंवा कामात म्हणा गर्क असतो.जो तो आपले वैयक्तिक जीवन/स्वातंत्र्य ह्याचाच विचार करतो.अमेरिकेतील शेजारधर्म (?) माणुसकी ह्या बाबत आम्ही अनेक सुरस आणि चमत्कारिक किस्से वर्षनुवर्षे ऐकतो आहोत.शेजारच्या घरातून पापड तळण्याचा वास किंवा धूर दिसला की म्हणे लगेच पोलिसात तक्रार करतात.आणि पोलिसांच्या आगमनानंतर शेजा-याची ओळख होते.तोपर्यंत शेजारी कोण रहातो आणि काय करतो हे एकमेकांना माहितच नसते.इतकेच काय पण कुणी आपल्या प्रकृतीची विचारपूस केलेली देखील त्यांना आवडत नाही.असे कळले.माझा तसा फारसा संबंध आला नाही पण चार पाच अमेरिकन्स कधी एकत्र बोलत असताना कधी पाहीले नाही.एकमेकांकडे बघतच नाहीत मग बोलणे तर दूरच.जातिवंत म्हणजे शहाण्णव कुळी अमेरिकन माणूस आणखी वेगळाच.चुकून दृष्टादृष्ट झालीच तर हाय,हेलो ह्या प्रदीर्घ संभाषणानंतर लगेच तो FULSTOP घेत पुढे जातो.अनेकजण आपापले कुत्रे कौतुकाने सर्वत्र फिरवीत असतात.समोरच्या दोन पायाच्या "मोतीराम "शी न बोलता चार पायाच्या "मोत्या "शी
मात्र लारीलाप्पा सर्वजण मारतात.अपंग माणूस देखील आपल्या व्हीलचेअर बरोबर कुत्रे फिरवीत असतो.थोडक्यात मनुष्यप्राणी सोडून इतर सर्व प्राण्यावर प्रेम करतात.
चायनीज : मला तर काही वेळा असे वाटते की आपण अमेरिकेत आहोत का चीनमध्ये आहोत?कारण चिनी लोकांची संख्या येथे फारच आहे.अनेक वर्षापासून चिनी माणसाचे वर्चस्व येथे असल्याचे कळते.अनेक चिनी नोकरदार ह्या संकुलात रहात आहेत.पण त्यांची भाषा दुसर-या कुणालाच समजत नाही.सकाळी प्रभात फेरीच्या वेळी अनेक चिनीणी/आज्या आपापली मुले/नातवंडे स्ट्रोलर/बाबा गाडीतून हिंडवत असतात चार पाच चिनी माणसे(स्त्रिया ) एकत्र आली की त्यांच्या बोलण्याचा स्वर,उच्चारांचा बाज काही मजेशीर वाटतो.ही मंडळीदेखील त्यांच्याशिवाय इतरांशी संबंध ठेवत नाहीत.अमेरिकेत सर्व दुकानात" MADE IN CHINA" बझार जोरदार आहे.सर्व सार्वजनिक ठिकाणी इंग्रजी प्रमाणे चायनीज भाषेतही सूचना लिहिलेल्या आहेत.मुद्दा असा की चिनी संख्या लक्षणीय आहे.
भारतीय :भारताच्या अनेक राज्यातील लोक/नोकरदार येथे आहेत.शीख/सरदारजीही
संकुलात दिसतात.आय .टी.मुळे अनेक तरुण तरुणी येथे ग्रुपने रहात आहेत.विशेष म्हणजे येथील भारतीयांमध्ये तेलगु(आंध्र प्रदेश)लोक लक्षणीय आहेत.दक्षिणात्य लोकांची खास दुकाने आहेत.पुण्यामुंबई कडील मोजकी मंडळी येथे भेटतात.पण आपल्या बांधवांमध्येसुद्धा विशेष प्रेम जिव्हाळ्याचे संबंध आढळून येत नाहीत.तरुण पिढीबद्दल तर काही बोलायलाच नको.त्यांना कुणाला वेळच नसतो म्हणे.त्यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी,गप्पाटप्पा ह्याचा अभावच आहे."मी का म्हणून ....तो का नाही "असेच चालू असते.कुणाला कुणाची गरज नाही हेच जाणवते.आणि असलीच किंवा हीच लाट "आपल्याकडे "आलेली आहे.EGO रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो.कितीही लिहिले तरी कमीच आहे.ह्या रोगावरील औषधाचा अद्याप शोध लागलेला नाही असे वाटते.
एकदा सकाळी मी फिरायला गेलो असताना एका कट्ट्यावर एक हैदराबादचे आजोबा असेच एकटे बसलेले दिसले.थंडीचे दिवस होते म्हणून मी पण उन्हात त्यांच्या जवळ जाऊन बसलो.बराच वेळाने घसा साफ करत ते बोलू लागले.आपल्या देशाचे लोकही "असे "का वागतात ह्या बद्दल तळमळीने बोलत होते.शेवटी एकच ब्रम्हवाक्य बोलून ते जाऊ लागले.हे वाक्य मी कधीही विसरणार नाही. येथे येणा-या सर्व भारतीय नागरिकांनीपण आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे तरच ........जाऊ द्या.ते म्हणाले 'AT LEAST INDIANS SHOULD OPEN THEIR MIND AND MOUTH'
शुभप्रभात
मागील पाच महिन्यापासून मी येथील AVALON COMMUNITY मध्ये रहात आहे.जवळजवळ 700/750 निवासी गाळे/

No comments:
Post a Comment