योगायोग (महाशिवरात्र ,जागतिक मराठी दिन आणि माझा मराठी ब्लॉग)
देवदर्शन
आज महाशिवरात्र.वर्षभरात आपण जे मोजके उपवास पाळतो त्यातीलच एक आजचा दिवस.कालच घरी सर्वांनी आज सकाळी साबुदाण्याची खिचडी नाश्त्यासाठी करावी अशी याचिका स्वयंपाकघराला सादर केली होती आणि त्वरित कोणत्याही चर्चेशिवाय ती अमलात आली.उपवासाचे पुण्य सकाळीच प्राप्त करून घेतल्यावर आजचे मोठे परम कर्तव्य म्ह...णजे शिवदर्शन.त्यासाठी कोणत्या तरी "श्वर''मंदिरात जायला पाहिजे.येथील Fair oak , Sunnyvale भागात भव्य दिव्य असे हिंदू मंदिर आहे.मी ह्या मंदिरात दोनवेळा गेलो असल्याने आज शिव् दर्शनासाठी मोर्चा तिकडेच वळवला होता. हा परिसर म्हणजे हिंदूंचे एकादे "पूरम"असल्यासारखे आहे.मंदिराच्यावर भगवा ध्वज सदैव फडकत असल्याने मंदिर सहज लक्षात येते.मुख्य मंदिराच्या मोठ्या मंडपात सर्व हिंदू देवांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.गणपती,सरस्वती,लक्ष्मी,शंक र पार्वती,व्यंकटेश बालाजी इ.इ.ओडिशा ,पंजाब,आंध्र ह्या प्रांतातील देखील देव देवींच्या मूर्ती आहेत.आज त्या मानाने( शिव्ररात्रीनिमित्त) गर्दी होती.महादेवाला दुधाचा अभिषेक करायला मोठी रांग होती. हे सर्व पाहून आपण नक्की अमेरिकेतच आहोत का असे वाटत होते.मुख्य पुजारी आणि त्यांची टीम संस्कृतप्रचुर इंग्रजी भाषेतून सर्व भाविकांना आवाहने,सूचना इ. करीत होती.ह्या भागातील असंख्य हिंदू भाविकांचे दर्शन झाले.मंदिरात सर्व सुखसोयी आहेत.स्वच्छता तर कमालीची आहे.मंदिराच्या मागील बाजूस विविध प्रकारची दुकाने,भोजन् गृहे आहेत.सर्व भाविकांना प्रसाद आणि चहापान मंदिरातर्फे मोफत होते.यंदा शिवरात्रीचा माझा योग येथे होता तरीसुद्धा नेहमीच्या पुण्यातील मृत्युंजयमंदिराची आणि तेथील वातावरणाची आठवण येत होतीच.
जागतिक मराठी दिन
आज आपला जागतिक मराठी दिन.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांचा वाढदिवस.सर्वत्र मराठी मराठी आणि मराठी चा जयघोष सुरु असतो.लेख कविता,चारोळ्या आणि चुटके मराठी भाषेची स्तोत्रे,गुणगान गात असतात.सुरेश भटांच्या "लाभले भाग्य आम्हास ......."ह्या कवितेने तर हल्ली लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे."मराठी असे आमुची मायबोली" हे तर सर्वांनाच वर्षानुवर्षे पाठ आहे.
माझा मराठी ब्लॉग: http:///www.suhasdbokil.blogspot.com
माझ्या दृष्टीने मोठी आणि योगाची गोष्ट म्हणजे मी माझा स्वतंत्र मराठी ब्लॉग आजच्या मराठी दिनी निर्माण केला आहे.कित्येक दिवसापासून अनेकजण ह्या ब्लॉग करण्याविषयी मला सुचवत होते.सांगत होते.पण मी काही तेवढा फारसा उत्सुक नव्हतो.कारण आपण काही मोठे साहित्यिक,महनीय व्यक्ती किंवा celebrity नाही मग कशाला पाहिजे हे असलं काही ?असे मला वाटे.अमेरिकेच्या वास्तव्याचा मोठा फायदा असा झाला की मी काहीतरी थोडेफार लिहू शकलो आणि माझ्याखेरीज इतर "चार "माणसे माझी खर्डेघाशी वाचू लागली.बरेच जण लगेच टीचकी मारून Like
करू लागले,काही comments तर काहीजण आवडलेले share सुद्धा करू लागले.शिवाय येथे माझा चांगला वेळ गेला आणि विरंगुलाही मिळाला.आता महिनाभरातच आम्ही मायदेशी परतणार आहोत.मग मात्र हे व्रत रोज पाळणे जमणार नाही.अधून मधून( म्हणजे दिसामाजी नाही ) आपला पण ब्लॉग आहे हे विसरू नये म्हणून लिहीन इतकेच.लोकांना तरी वाचण्याचा किती त्रास द्यायचा?"आता बस्स झालं "हे ऐकायला नकोय.ह्या नवीन धाडसाबद्दल अनेकांनी अभिनंदन शुभेच्छा देऊन माझी जबाबदारी वाढविली आहे.सर्वांना मनापासून धन्यवाद.पण ज्यांच्यामुळे मी हे काहीतरी करू शकलो आणि लिहू शकलो त्यांचे विशेष आभार.माझ्या मुलाने मला laptop दिला ,आपल्या पुण्याच्या मराठीकाकानी मला मराठी टंकन/font इ.मार्गदर्शन केले आणि सर्वात महत्वाचे फेसबुक मित्र आणि वाचक ह्यांच्याशिवाय हे शिवधनुष्य मला पेलले नसते.हे सत्य आहे.कालच मुंबईच्या एका मित्राने फोनवरून प्रेमाची धमकी दिली आहे की सर्व लेखांचे एक पुस्तकच छापायचे मी म्हटलं आधी पुरेसे वाचक गोळा कर मग पाहू.ह्या संगणकीय क्षेत्रात माझे ज्ञान जुजबी आहे.फार काही नाही.थोडक्यात सायकलवर बसता येते पण उतरता येत नाही अशी अवस्था होते.
मराठी दिनाच्या दिवशी माझा मराठी ब्लॉग झाला हा एक योगायोगच म्हणायाचा नाही का ?
शुभप्रभात:२७ फेब्रुवारी २०१
देवदर्शन
आज महाशिवरात्र.वर्षभरात आपण जे मोजके उपवास पाळतो त्यातीलच एक आजचा दिवस.कालच घरी सर्वांनी आज सकाळी साबुदाण्याची खिचडी नाश्त्यासाठी करावी अशी याचिका स्वयंपाकघराला सादर केली होती आणि त्वरित कोणत्याही चर्चेशिवाय ती अमलात आली.उपवासाचे पुण्य सकाळीच प्राप्त करून घेतल्यावर आजचे मोठे परम कर्तव्य म्ह...णजे शिवदर्शन.त्यासाठी कोणत्या तरी "श्वर''मंदिरात जायला पाहिजे.येथील Fair oak , Sunnyvale भागात भव्य दिव्य असे हिंदू मंदिर आहे.मी ह्या मंदिरात दोनवेळा गेलो असल्याने आज शिव् दर्शनासाठी मोर्चा तिकडेच वळवला होता. हा परिसर म्हणजे हिंदूंचे एकादे "पूरम"असल्यासारखे आहे.मंदिराच्यावर भगवा ध्वज सदैव फडकत असल्याने मंदिर सहज लक्षात येते.मुख्य मंदिराच्या मोठ्या मंडपात सर्व हिंदू देवांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.गणपती,सरस्वती,लक्ष्मी,शंक
जागतिक मराठी दिन
आज आपला जागतिक मराठी दिन.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांचा वाढदिवस.सर्वत्र मराठी मराठी आणि मराठी चा जयघोष सुरु असतो.लेख कविता,चारोळ्या आणि चुटके मराठी भाषेची स्तोत्रे,गुणगान गात असतात.सुरेश भटांच्या "लाभले भाग्य आम्हास ......."ह्या कवितेने तर हल्ली लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे."मराठी असे आमुची मायबोली" हे तर सर्वांनाच वर्षानुवर्षे पाठ आहे.
माझा मराठी ब्लॉग: http:///www.suhasdbokil.blogspot.com
माझ्या दृष्टीने मोठी आणि योगाची गोष्ट म्हणजे मी माझा स्वतंत्र मराठी ब्लॉग आजच्या मराठी दिनी निर्माण केला आहे.कित्येक दिवसापासून अनेकजण ह्या ब्लॉग करण्याविषयी मला सुचवत होते.सांगत होते.पण मी काही तेवढा फारसा उत्सुक नव्हतो.कारण आपण काही मोठे साहित्यिक,महनीय व्यक्ती किंवा celebrity नाही मग कशाला पाहिजे हे असलं काही ?असे मला वाटे.अमेरिकेच्या वास्तव्याचा मोठा फायदा असा झाला की मी काहीतरी थोडेफार लिहू शकलो आणि माझ्याखेरीज इतर "चार "माणसे माझी खर्डेघाशी वाचू लागली.बरेच जण लगेच टीचकी मारून Like
करू लागले,काही comments तर काहीजण आवडलेले share सुद्धा करू लागले.शिवाय येथे माझा चांगला वेळ गेला आणि विरंगुलाही मिळाला.आता महिनाभरातच आम्ही मायदेशी परतणार आहोत.मग मात्र हे व्रत रोज पाळणे जमणार नाही.अधून मधून( म्हणजे दिसामाजी नाही ) आपला पण ब्लॉग आहे हे विसरू नये म्हणून लिहीन इतकेच.लोकांना तरी वाचण्याचा किती त्रास द्यायचा?"आता बस्स झालं "हे ऐकायला नकोय.ह्या नवीन धाडसाबद्दल अनेकांनी अभिनंदन शुभेच्छा देऊन माझी जबाबदारी वाढविली आहे.सर्वांना मनापासून धन्यवाद.पण ज्यांच्यामुळे मी हे काहीतरी करू शकलो आणि लिहू शकलो त्यांचे विशेष आभार.माझ्या मुलाने मला laptop दिला ,आपल्या पुण्याच्या मराठीकाकानी मला मराठी टंकन/font इ.मार्गदर्शन केले आणि सर्वात महत्वाचे फेसबुक मित्र आणि वाचक ह्यांच्याशिवाय हे शिवधनुष्य मला पेलले नसते.हे सत्य आहे.कालच मुंबईच्या एका मित्राने फोनवरून प्रेमाची धमकी दिली आहे की सर्व लेखांचे एक पुस्तकच छापायचे मी म्हटलं आधी पुरेसे वाचक गोळा कर मग पाहू.ह्या संगणकीय क्षेत्रात माझे ज्ञान जुजबी आहे.फार काही नाही.थोडक्यात सायकलवर बसता येते पण उतरता येत नाही अशी अवस्था होते.
मराठी दिनाच्या दिवशी माझा मराठी ब्लॉग झाला हा एक योगायोगच म्हणायाचा नाही का ?
शुभप्रभात:२७ फेब्रुवारी २०१
No comments:
Post a Comment