Thursday, February 27, 2014

निरोप तुज देता ......

राम राम मंडळी,वर्ष संपायला आता काही तासांचाच अवधी आहे.मला मात्र अजून अख्खा दिवस आहे.माझे लक्ष आपल्या गावाकडे लागले आहे.सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उत्सुक असतील.TV वर दरवर्षी प्रमाणे काहीतरी खुसखुशीत कार्यक्रम पाहण्यात अनेकजण दंग असतील.खाण्यापिण्याची (म्हणजे दोन्हीचीही)रेलचेल असेल.अन...ेकजण भूतकाळात डोकावत असतील.रंगीबेरंगी लाइटची सजावट,फटाके फोडण्याची घाई हे सर्व डोळ्यासमोर येतंय.

इकडे अमेरिकेत Sunnyvale ला सकाळचे ७ वाजले आहेत.जाम थंडी आहे.भरीतभर म्हणजे आज धुकेही पडले आहे.बाहेर पहिले तर समोरच्या रस्त्यावरून अनेक वाहने जणूकाही रात्रीच धावत आहेत असे वाटते.मनात म्हटलं आता गरम चहाचे पेट्रोल आपल्या पोटात गेल्याखेरीज आपली गाडीही दिवसभर पळणार नाही.म्हणून चहा घेत असतानाच डोक्यात विचारचक्र सुरु होते.सरत्या वर्षतील अनेक सुख दुःखाचे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते.अखेर हा हा म्हणता वर्ष संपलं की राव?

"हा हा म्हणता" म्हणता हा शब्दप्रयोग फार गुळगुळीत झालाय.उठसुठ हा हा म्हणता.स्वयंपाकघरातील डबाभर केलेला चिवडा हा हा म्हणता संपला सुद्धा.(आमच्या नाही बर का )काही दिवसापूर्वीचा एक लढाऊ कार्यकर्ता हा हा म्हणता मुख्यमंत्री झाला बर का .इ.इ.सारांश आज काय enter मारायचे ह्याचा विचार करीत असतानासुद्धा हा हा म्हणता तीन परिच्छेद झाले.पुन्हा एकदा सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.कशी करू स्वागता म्हणत २०१४ सालाचे स्वागत करून झोपायला हरकत नाही.म्हणजे तुम्हीच काय ते ठरवा..........शुभप्रभात

No comments:

Post a Comment