कट...कट ...हेअरकट ..सुपर कट
वरील मथला म्हणजेच "हेडींग" वाचून काहीतरी वेगळेच वाटते ना.विषय अक्षरश:"डोक्याचाच"आहे.आतापर्यं त कौटुंबिक,साहित्यिक,असेच काहीबाही लिहिले.आज जरा थोडे हलकफुलक लिहाव म्हटलं.मनोरंजन आणि हास्य.सांगतोच तुम्हाला काय घडलं ते.काल येथे आल्यापासून बाहेर दुकानात असे प्रथमच हसायला मिळाले आणि बाकीचेही हसले.म्हणजे असं झालं,अमेरिकेत येऊन आता ३ महिने झाले.डोक्यावरील... विपुल केशसंभार आता अगदी डोईजड होऊ लागला होता.किती वेळा पुढील तारीख घ्यायची.म्हणून शेवटी आज "शिखर परिषदेला "जायचेच असे ठरविले आणि माझ्या मुलाबरोबर आम्ही supercut ह्या साखळीवजा केशकर्तनालयात गेलो.सर्व पुरुष मंडळींची डोकी बहुतेक ठिकाणी बायकांच्याच हाती असतात हे ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मला प्रथम कसेसेच वाटत होते.पण आता माघार घेणे नाही.ह्या दुकानातला थाट काय विचारायचा.गेल्यावर प्रथम संगणकावर पंजीकरण केले.बारीक डोळ्याच्या आणि चपट्या नाकाच्या एका चिनी अक्काबाईनी थोडा वेळ "बसा "अशी आज्ञा केली.
मी आपला दुकानाची पाहणी करीत होतो.महिलाराज असल्याने दहा बारा चिंग्याच केश कर्तनात व्यग्र होत्या. तेवढ्यात एक गोरेपान मेक्षिकन आजोबा आपल उरकून परत जाताना मला म्हणाले"Do u want to shave?do it, as my told me if u don't shave, leave the house early"अस म्हणून स्वता:च जोरात हसत होते त्यांच्या बरोबर आम्ही आणि बाकीचीही मंडळी हसत होतो.तेवढ्यात मघाशी बोललेल्या चिनी अक्काबाई हातात कात्री घेऊन आल्या आणि 'शुव्हास शोव्हास"करू लागल्या.(म्हणजे सुहास सुहास)
मग मी त्यांच्या आज्ञेनुसार फिरत्या सिंहासनावर जाऊन बसलो.त्यांनी त्यांचे काळ्या रंगाचे महावस्त्र दिले आणि पांढर्या रंगांच्या गळापट्टीत माझा गळा आवळला.हे झाल्यावर मी" दर्पणी बघतो का बघते ......"हे गाणं म्हणत आरशाकडे पाहू लागलो.इकडे अक्काबाईनी कात्रीद्वारे आपली कला दाखवायला सुरवात केली होती.मला मान खाली घालायची वेळ आल्याने "हुं कि चू"ही करता येईना.शेवटी "ओके"म्हणत चौ अक्काने मला डोक्यामागे आरसा फिरवून आपली कर्तबगारी दाखवली आणि मला विचारले "Are u satisfied?"मी लगेच"Yes"म्हटल्यावर चौ अक्कांनी मला शाप दिला "NOW U WILL GET GOOD GIRLFRIEND" अस म्हणत खी खी ची ची करत स्वतः हसल्या आणि आम्हालाही हसविले.मी म्हणालो" madam he is my son"मला काय म्हणायचे होते ते त्यांना बरोबर कळाले आणि मग "I know,I know"म्हणत आम्हाला बाय बाय केले. शुभ प्रभात.See More
वरील मथला म्हणजेच "हेडींग" वाचून काहीतरी वेगळेच वाटते ना.विषय अक्षरश:"डोक्याचाच"आहे.आतापर्यं

मस्त आहे ब्लॉग.. आवडला
ReplyDelete