माझी गरुडझेप ----गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
(असू आणि हसू मिश्रित)...
(असू आणि हसू मिश्रित)...
मी आजपर्यंत आचार्य अत्रे ह्यांच्या साहित्याची एकूण 42 वाण्ग्मयीन प्रदर्शने देशात आणि विदेशात आयोजित केलेली आहेत. माझ्या ह्या छंदाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने 2009 मध्ये नोंद घेतली असून "एकाच लेखकाची एवढी प्रदर्शने "आयोजित केल्याबद्दल मला सन्मानित केले.ही गोष्ट जगजाहीर आहे.(Most exhibitions on a single writer's works'.)
ह्या सन्मानाने मी आनंदित झालोखरा पण माझी भूक आणखी वाढली आणि आपण आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड् मध्येचह्या उपक्रमाची का नोंद करू नये ह्या विचाराने मी अस्वस्थ होऊ लागलो.
प्रयत्न तरी करून बघू.जमले तर ठीक नाहीतर नाही.पण दुनियेतील ह्या संस्थेत आचार्य अत्रे ह्यांचे नाव,कार्य नोंद केल्याचे मोठे समाधान आणि परमानंद मिळेल ह्या आशेने मी प्रयत्न सुरु केले. सुरवातीला कित्येक महिने' हा 'विषयच डोक्यात नुसता वळवळत होता. कुणाच्यातरी मार्गदर्शनाची मला आवश्यकता गरजेची होती.अनेकजणांचे दरवाजे ठोठावले. इच्छा असली
की मार्ग सापडतो ह्याचा प्रत्यय चांगलाच आला.माझे बँकेतील सहकारी आणि एक अभ्यासू मित्र माझ्या मदतीला धावत आले आणि ह्या प्रकल्पाचा शुभारंभ आम्ही 2 मे 2015 ला केला."गिनीज" चे नियम ,कार्याची पद्धत सर्व काही काटेकोरपणे पाळले.एकूण प्रकरण नवीनच एका विषयाचे असल्याने निकालासाठी 3 महिन्याची मुदत होती. पण उत्सुकतेपोटी मी अधूनमधून त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन सद्य स्थिती पहात होतो. तेंव्हा STATUS--PENDING ची पाटी दिसायची.मुदतीनंतर e-मेलने चौकशी केली.त्या साठीही 15 दिवस थांबणे आवश्यक होते
अखेर मुदतीच्या शेवटच्या दिवशी 'निकालाचे' (म्हणजे निक्काल लागल्याचे) पत्र e मेल आले.(एकदाचे) ते वाचून हसावे की रडावे हे क्षणभर कळेनाच.कारण" हा आणि असल्या" प्रकारचा
विषयच "गिनीज "च्या अखत्यारीत येत नव्हता. त्यामुळे नेहमीच्या गोड गोड भाषेत त्यांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या. नंतर एक मधाचे बोट पण लावले.ते असे की"सध्याच्या policyनुसार असे नवीन रेकॉर्ड करता येत नाही पण पुढे कधी बदल झालाच तर तुमच्या प्रकरणाचा अवश्य विचार करू कारण सर्व तपशिलाची फाईल आमच्याकडे आहे"थोडक्यात मी ह्या वाक्याचा अर्थ असा लावला की " सध्या तरी कटा" असो. माझे मन काही काळ खट्टू झाले.पण अनेक दिवसापासून डोक्यात उसळ्या मारणारा एक विषय तूर्त तरी संपला म्हणून थोडा शांत झालो.कारण माझा हा उपक्रम जगाच्या दृष्टीने अगदीच नगण्य आहे.म्हणजे "गिनीज" मध्ये जाण्याच्या योग्यतेचा नसावा असे मलाही अनेकदा वाटत असे. पण प्रयत्ने रगडीता वाळूतून तेलही गळे असेही मनात येई म्हणून हा प्रपंच मांडला.असो.
जर काही अधिक चांगले व समाधानकारक झाले असते तर महाराष्ट्राच्या महा पुरुषाचे कर्तृत्व सर्व दुनियेत नोंदले गेले असते.महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला प्रचंड आनंद झाला असता हे नक्की.पण माझी सर्व फाईल"गिनीज" ने परत न करता आपल्या दप्तरी ठेवली आहे हेही नसे थोडके म्हणत काही काळ आता स्वस्थ रहायचे.
ह्या "गिनीज "प्रकरणात मला माझे स्नेही सर्वश्री एसेम जोशी,आणि हेमंत नवरे ह्यांनी खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार.विशेष धन्यवाद श्री हेमंत नवरे ह्यांना देतो. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय मी पुढे गेलोच नसतो आणि येथपर्यंत आलोच नसतो.हे सत्य आहे.
शुभप्रभात दि.२७ ऑगस्ट २०१५. &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

No comments:
Post a Comment