'प्रचंड" माणसाचे "प्रचंड "आत्मचरित्र ......
आचार्य प्र.के.अत्रे ह्यांच्या आत्मचरित्राचा ८ वा खंड अत्रे जयंतीला १३ ऑगस्ट २०१५ ला प्रकाशित झाला आहे. असे अष्टखंडात्मक चरित्र/आत्मचरित्र लिहून अत्र्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक चमत्कारामध्ये हा एक विक्रमच केला आहे. १९६४मध्ये "क-हेचे पाणी" पहिल्या खंडाच्या प्रकाशन समारंभातच आ.अत्रे ह्यांनी ह्या अष्टखंडात्मक आत्मचरित्राची घोषणा केली होती आणि असे आत्मचरित्र जगात कोणाचेही झाले नसेल असे सांगितले होते.आज हे ८ खंड वाचकासाठी उपलब्ध आहेत.... ह्या बाबत महाराष्ट्राचे वाल्मिकी "गदिमा "म्हणतात "आचार्य अत्रे ह्यांनी क-हेच्या पाण्याचे रांजण जनतेसाठी भरून ठेवले आहेत."असो.

ह्या आठव्या खंडाच्या पूर्ततेसाठी मला खारोटीची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्यच म्हणायचे.माझ्या आत्रेय संग्रहातील" दैनिक मराठा "च्या प्रगतीचे 5 अग्रलेख पुस्तकाच्या लेखिकेकडे पाठवले होते.ह्याचा आनंद आणि समाधान मला नक्कीच आहे.अत्रे प्रेमी वाचकांनी हे अष्टखंडात्मक आत्मचरित्र वाचले म्हणजे महाराष्ट्राचा तत्कालीन राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहास समजेल असे वाटते
No comments:
Post a Comment