Sunday, November 8, 2015

८ नोव्हेंबर ...दिनविशेष (पु.ल.देशपांडे जयंती आणि माझे SBI मधील सहकारी श्रीधर उर्फ शिरुभाऊ सहस्रबुद्धे ह्यांचा स्मृतिदिन )
आजच्या दिनी जगातील मराठी माणसाला आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आठवण झाल्याशिवाय रहावत नाही.त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाबद्दल सर्व काही जगजाहीर आहे.माझे त्यांना विनम्र अभिवादन.माझे भाग्य थोर की अशा विभूतीला भेटण्याचा मला माझ्या जीवनात ४/५ वेळा तरी योग आला होता.
दुसरी व्यक्ती म्हणजे माझे SBI मधील सहकारी मित्र श्रीधर सहस्रबुद्धे.शिरुभाऊ ह्या टोपण नावाने ...जगप्रसिद्ध.बघता बघता त्यांना ह्या दुनियेचा निरोप घेऊन 3 वर्षे झाली.ज्या दिवशी दुपारी कार्यालयात हयातीचा दाखला दिला (Life certificate) त्याच दिवशी रात्री इतरांना त्यांच्या मृत्युच्या दाखल्याची (Death Certifacate) तजवीज करायची वेळ आली.ह्याहून दुसरे दुर्दैव ते कोणते ?असो. असा मित्र सहकारी मित्र लाभला हे पण माझे माझ्य भाग्यच म्हणायचे.त्यांच्या सहवासाच्या आठवणींनी मन अगदी उचंबळून येतंय.माझ्या BLOG मध्ये सविस्तर लिहिले आहेच.जमल्यास वाचावे.
"शिरुभाऊ,का हो एवढी जाण्याची घाई केलीत?"

शुभप्रभात दि.८ नोहम्बर २०१५ %%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
See More

No comments:

Post a Comment