एक स्मरण : कै.यशवंतराव चव्हाण : प्रीतीसंगम
आज सकाळपासून दूरदर्शनवर भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पाहिले मुख्य मंत्री कै. यशवंतराव चव्हाण ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध वार्तापत्रे/खास कार्यक्रम मी
पहातोय.आपणही "चार शब्द "आठवणींच्या रूपाने लिहावेत असे वाटल्यानेच हा लेखन
प्रपंच मांडलाय.तसं म्हणाल तर माझा यशवंतरावांशी संबध येण्याचे काहीच कारण नाही.ते
कोठे आणि मी तर अगदीच सामान्य माणूस कोठे?तरीपण माझ्या लहानपणापासून 'हे' व्यक्तिमत्व मी पहात आल्याने काहीतरी लिहावे असे प्रकर्षाने वाटले म्हणूनच हे सर्व .........
माझ्या लहानपणी आम्ही कोरेगाव (सातारा) येथे राहत होतो.तेंव्हा तेथील कोरेगाव पीपल्स को.
ओप.बँकेचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. बहुतेक १९५३ किंवा १९५४ साल
असावे.ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तत्कालीन मुंबई राज्याचे एक मंत्री म्हणून श्री यशवंतराव
चव्हाण आणि बँक महर्षी श्री वरदे ह्यांना निमंत्रित केले होते.ह्या समारंभाला मी माझ्या वडिलांबरोबर मुद्दाम गेलो होतो.वास्तविक मला ह्या विषयी कसलीच माहिती नव्हती तरीपण समारंभ म्हणजे काय आणि तो असतो तरी कसा हे जाणून घेण्यासाठी गेलो.पण ह्याच
कारणामुळे मी प्रथमच यशवंतराव चव्हाण ह्यांना पाहिले हे विशेष.
१९५८ मध्ये माझे वडील एस.टी.मध्ये पेण / धरमतर येथे सेवेत असताना धरमतर आणि अलिबाग जोडणा-या एका मोठ्या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार
यशवंतराव चव्हाण ह्यांच्या हस्ते झाले.शासकीय पातळीवरील हा उद्घाटन सोहोळा भव्य झाला.खूप गर्दी होती.मी शाळकरी विद्यार्थी असल्याने कसलाही विचार न करता सरळ त्या गर्दीत घुसलो आणि थेट व्यासपीठाजवळ जाऊन बसलो.यशवंतरावांचे 'दर्शन ' झाले त्यांचे भाषण ऐकले (समजले की नाही हे माहित नाही) पांढरे कपडे,जाकीट,डोळ्याला उन्हामुळे
काला चष्मा (gogle) रुबाबात ते व्यासपीठावर बसले होते.मी हे सर्व निरखून बघत होतो.
कार्यक्रम संपताच व्यासपीठावर चढून थेट यशवंतरावांकडे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले.त्यांनीही तितक्याच उत्सुकतेने प्रतिसाद दिला.कोण काय म्हणेल किंवा कोणी आपल्याला ओरडेल ह्याचा मी अजिबात विचारच केला नाही.नंतर कितीतरी वेळ मी ह्या "हस्तांदोलन विश्वात "होतो कधी एकदा वडिलांना "ही" आनंदाची बातमी सांगतोय असे मला झाले होते.
आनंदाचा डोह्च होता तो.
१९६३ साली सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आमच्या शाळेच्या म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर भरले होते.उद्घाटन सोहोळ्याच्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री
चव्हाण व्यासपीठावर विराजमान होते.कुणाचे तरी भाषण चालू असतानाच जरा गडबड
हालचाल जाणवली .काय झालं ?काय झालं? म्हणत सर्वांच्याच भुवया उंचावल्या.यशवंतराव
लगबगीने व्यासपीठावरून खाली उतरून घाईगडबडीने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे जात होते.काय कारण असावे ? सर्वजण उत्सुकतेत आणि चिंतेत होते.दिल्लीहून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचा यशवंतराव चव्हाणांना महत्वाचा
फोन होता.(हा फोन म्हणे देशाच्या संरक्षण मंत्री पद स्वीकारण्याविषयी होता अशी चर्चा सुरु झाली ) ही पण एक आठवण जपली आहे.
१९८० मध्ये SBI च्या नोकरीत असताना LFC घेऊन सहकुटुंब दिल्ली आग्रा पहायला मी
जाण्याचे ठरविले. ही बातमी शेजा-यांपर्यंत पोहोचल्याने चर्चा ,सूचना सुरु झाल्या.यशवंतरावांचे एक नातेलग आमचे चांगले परिचित होते.ते म्हणाले "दिल्लीला गेलात तर आमच्या काकांकडे अवश्य जा. काका म्हणजे यशवंतराव चव्हाण हे मला कळल्यावर मी हादरलोच.आढेवेढे घेतले.
त्यांना मी म्हणालो" तुम्ही काहीतरी वस्तू/खाऊ काकांसाठी माझ्याबरोबर द्या.म्हणजे त्या निमित्ताने मला नि:संकोचपणे रेस कोर्से रोडला त्यांच्या बंगल्यावर जाता येईल "हि सूचना मान्य झाली.मग दिल्लीच्या मुक्कामात एके दिवशी दुपारी सहकुटुंब रेर्स कोर्स रोडवरील चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर सहकुटुंब गेलो .भेटीची वेळ दुपारी ४ ची होती,तो पर्यंत वेळ काढण्यासाठी आम्ही एका बंगल्यात गेलो. तेथे गर्दी खूप होती.काही क्षणातच एक तेजस्वी महिला लवाजम्यासह बंगल्याबाहेर आली.बाप रे! त्या साक्षात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि परदेशाच्या दौ-यावर रवाना होणार होत्या.आम्ही सार्वजण चकित, मंत्रमुग्ध झालो.पण लगेच चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर आलो. चव्हाण साहेबही थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या दौ-यावर निघाले असल्याचे समजले. तरीपण आमच्याशी आपुलकीने ते आणि वेणूताई बोलत होते. सातारी कंदी पेढे त्यांना दिले.सातारा कराड कोरेगावचा विषय झालाच.
माझ्या आजोळच्या घराच्या मागील बाजूसच फलटनला वेणूताई चव्हाण ह्यांचे माहेर घर असल्याने त्याही गप्पा झाल्या. उभयतांचा फार वेळ न घेता आम्ही लगेच 7
रेस कोर्स चा निरोप घेतला.
सातारच्या गांधी मैदानावर यशवंतरावांच्या अनेक सभा मी ऐकल्या.त्यांचे आत्मचरित्र "कृष्णाकाठ"हि वाचले. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने माझ्या काही आठवणी शब्दांकित केल्या ह्याचा आनंद आहे.महाराष्ट्राच्या ह्या साहित्यप्रेमी सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला
माझी विनम्र श्रद्धांजली .
शुभप्रभात दि.२५ नोहेंबर २०१५ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:
Post a Comment