Wednesday, August 12, 2015

महाराष्ट्राचा महापुरुष आचार्य अत्रे यांची ११७ वी जयंती

महाराष्ट्राचा महापुरुष आचार्य अत्रे ह्यांची ११७ वी जयंती .......
आज १३ ऑगस्ट २०१५ ,नेहमीप्रमाणेच आजचा दिवस आहे. म्हणजे २४ तासांचाच.पण आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे आज महाराष्ट्राचा महापुरुष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ह्यांची ११७ वी जयंती आहे. त्यांना ह्या दुनियेतून जाऊन ४५ वर्षाहून अधिक काळ गेला आहे,तरीपण ह्या बलदंड पत्रकाराला,महान साहित्यिकाला महाराष्ट्र विसरला नाही नव्हे विसरू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे अत्र्यांनी केलेली महाराष्ट्राची सेवा. त्यांचे अ...ष्ट पैलू व्यक्तिमत्व काय वर्णावे? त्यांनी ज्या ज्या क्षेत्राला हात लावला त्या त्या क्षेत्रात त्याचे उत्तुंग शिखर गाठले. मग ते साहित्य क्षेत्र असो,नाट्यक्षेत्र असो,पत्रकारिता असो किंवा चित्रपट क्षेत्र असो.प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचे एक वेगळे नाणे निर्माण केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी गाजली ती केवळ अत्र्यांच्याच वाणीने,लेखणीने आणि करणीने.अत्रे नसते तर मुंबई महाराष्ट्राला मिळणे अत्यंत अवघड होते. संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशामध्ये जे पाणी आहे ते कऱ्हेचेच आहे. त्यांच्या प्रचंड कर्तृत्वामुळेच मराठी जनता अजूनही अत्र्यांना विसरलेली नाही इतकेच नव्हे तर "आज अत्रे हवे होते " असे पदोपदी मराठी माणसाला वाटते.ह्यातच त्यांचे मोठेपण, त्यांचे कर्तृत्व .दिसून येते हे मात्र खरे.म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज अत्रे जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते.हे पाहिले म्हणजे असे म्हणावेसे वाटते "बा महाराष्ट्रा,आचार्य अत्रेना कधीच विसरू नकोस."
महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास ....................आचार्य अत्रे
महाराष्ट्राचा खरा शिल्पकार ................................आचार्य अत्रे
महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमानी ...........................आचार्य अत्रे
महाराष्ट्राचे सर्वात उंच कळसुबाई शिखर ...............आचार्य अत्रे
हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्व ...........................आचार्य अत्रे
आकाश व्यापी प्रचंड कर्तृत्व ................................आचार्य अत्रे
लोकमान्य टिळकांसारखा लोहपुरूष .....................आचार्य अत्रे
महात्मा फुले यांचा वारसदार ................................आचार्य अत्रे
डॉक्टर आंबेडकरांच्या समतावादाचा पुरस्कर्ता .........आचार्य अत्रे
संत तुकारामाचा आधुनिक आविष्कार .....................आचार्य अत्रे
(आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान,पुणे सौजन्य )
शुभप्रभात : १३ ऑगस्ट २०१५ @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

1 comment:

  1. आचार्य अत्रे झिंदाबाद

    ReplyDelete