अर्ध शतकाची वाटचाल माझ्या
स्टेट बँकेबरोबर (16 जुलै 1964 पासून आजपर्यंत )...

आज १६ जुलै २०१५ ! तुम्हीं म्हणाल मग त्यात काय विशेष ?बरोबर आहे तुमचं म्हणणं !आजचा दिवस हा नेहमीप्रमाणेच २४ तासांचाच आहे. दुनियेच्या दृष्टीने सर्वसाधारण असणारा आजचा दिवस हा माझ्या दृष्टीने मात्र संस्मरणीयच आहे. कारण ह्याच दिवशी ५० वर्षापूर्वी माझी नोकरीची सुरवात भारतीय स्टेट बँकेच्या इचलकरंजी शाखेतून झाली.महाराष्ट्राचे Manchester म्हणून ओळखले जाणारे हे गाव ! ना जिल्हा ना तालुका पण आपला खास आब राखून असणारे हे एक मोठे शहर आहे. पण हि "सूतभूमी" माझी कर्मभूमी झाली ती आजपासूनच.म्हणून मला आजच्या दिवसाचे एवढे महत्व आणि प्रेम वाटते आहे
1964 मध्ये सातारा येथे मी स्टेनोग्राफी शिकत होतो. राज्य वीज मंडळाच्या विभागीय कार्यालयातही मी काही दिवस खर्डेघाशी केली.एके दिवशी मला बँकेच्या इचलकरंजी शाखेत केवळ दोन महिन्यासाठी तात्पुरती नोकरी असल्याचे कळले आणि मी त्या दृष्टीने घोडदौड सुरु केली.मनात विचार केला की दोन महिने तर दोन महिने.तेवढाच काहीतरी चांगला अनुभव आपल्या पाठीशी असेल.नाहीतर केवळ म्याट्रिकच झालेल्या मुलाला ह्या जगात कोण विचारणार आणि कोण नोकरीचे आमंत्रण देणार ? काहीही अडचण किंवा समस्या आली तरी हाती आलेले हे सोडायचे नाही म्हणून आपल्या प्रेमळ मातापित्यांना सोडून श्रावणबाळ इचल् करंजीच्या एसटीत बसला. आईवडिलांना सोडून प्रथमच "इतक्या दूर देशी " जात असल्याने गाडीत डोळ्यातून वाहणा-या गंगा यमुना थांबता थांबत नव्हत्या.अखेरीस मीच माझी समजूत घातली आणि इचल् करंजीच्या एस.टी.स्थानकावर उतरलो.तेथून अगदी जवळच SBI ची इचलकरंजी शाखा होती.लगेच तसाच प्रथम बँकेत गेलो. नमस्कार चमत्कार,ओळख परेड असले कार्यालयीन सोपस्कार पार पडल्यावर मस्टर नामक एका हजेरी पुस्तकात माझे नाव झळकले एकदाचे ! याच साठी केला होता अट्टहास आता काही दिवस थंडावणार होता, दोन महिन्यांनी पुन्हा हाच खेळ नव्या स्वरुपात सुरु होणार होता.कारण माझी गणना तूर्त तरी एकाद्या खेळातल्या" कच्चे लिंबू "म्हणजे temporary अशी असे.
पहिल्याच दिवशी नेमणुकीचा खलिता ( appointment order ) मिळाली.अनेक कलमे असलेला हा कागद मी मोठ्या कौतुकाने वाचला.पगाराचे स्केल दिले होते. मूळ पगार रुपये 120 आणि तत्कालीन जीवघेणा महागाई भत्ता रुपये 40 असे एकूण रुपये 160 होते. अशा "गलेलठ्ठ " पगारावर मी रुजू झालो होतो. सर्वजण मिळून staff ह्या सदरात एक डझन डोकी होती. इचलकरंजी हे औद्यगिक शहर असल्याने अनेक बँका तेथे होत्या तरीपण सरकारी बँक म्हणून आमच्या बँकेत प्रचंड काम आणि गर्दी असे. मला हे सर्व नवीन होते. सुरवातीला काही दिवस मनातून बर्याच वेळा उगीचच भीती वाटायची.आपलं काही चुकलं तर काही खरं नाही असला विचार मनाला अस्वस्थ करायचा.पण सर्व सहकार्यांनी आणि वरिष्ठांनी चांगले वागविले,सहकार्य केले म्हणून तर भारतीय स्टेट बँक ह्या जगप्रसिद्ध संस्थेत एकूण ४२ वर्षे मोठ्या मानाने,आनंद आणि समाधानाने राहिलो आणि कोणताही ठपका न घेता निवृत्त झालो. पहिला पगार रुपये 80 (15 दिवसाचाच )मिळाला .एक रुपया नोटेचे ते बंडल मोजताना जो काही आनंद झाला त्याचे वर्णन शब्दाबाहेर आहे. स्वताच्या कष्टाची कमाई होती ती !
आज मला सर्व सहकार्यांची वरिष्ठांची प्रकर्षाने आठवण येत आहे. बरेचजण ह्या जगाचा निरोप घेवून गेले.सुरवातीच्या काही काळात मोजकीच मंडळी होती.त्यामुळे एकमेकाबद्दल प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा असायचा.आनंदाच्या प्रसंगी तर माझे बँकेतील मित्र यायचेच पण संकटाच्या वेळीही सर्वजण आवर्जून हजार असायचे हे विशेष.अनेक वेळा सहली आयोजित केल्या जायच्या.पन्हाळा सहल,सज्जनगड,अधूनमधून सांगली कोल्हापूर दौरा असायचा. बढती बदली अशा प्रसंगाने पार्टी होत असे. त्यावेळी अत्यंत कौटुंबिक वातावरण असे. तर कधी कधी नाटक सिनेमा पाहण्यास आम्ही एकत्र जात असू. मजा यायची खरी.पण नोकरी म्हटली की बदली आलीच.जुने मित्र बदलून जायचे आणि नवे सहकारी यायचे असा खेळ नेहमी चालायचा.पण येणारा दिवस आनंदात घालवायचा हेच ब्रीद वाक्य असे. अशा प्रकारे जुलै 1964 ते मे 1966 हा माझा इचलकरंजी येथील अन्नाचा शेअर संपला आणि मी माझ्या 'माहेरी' सातारा शाखेला 1 जून 1966 ला हजर झालो.तेथे 15 वर्षे तळ ठोकला होता. अशी ही 16 जुलै ची कहाणी समाप्त आता समाप्त झाली.
शुभ प्रभात : दि.१६ जुलै २०१५....============++++++++++============++++++++

माझी SBI च्या नोकरीची कहाणी
ReplyDelete