Friday, July 3, 2015

लागे मनी हुरहूर ...अमेरिकेतील मराठी मंडळाचे अधिवेशन लॉस एंजेलिस २०१५

लागे मनी हुरहूर ......
.
अमेरिकेतील मराठी मंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन ...
लॉस एंजेलिस २०१५ (BMM 2015 LA)

आजपासून अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन लॉस एंजेलिस येथे नेहमीप्रमाणेच मोठ्या थाटामाटात सुरु होत आहे. खरतर ही post मी लॉस एंजेलिस येथूनच पाठविणार होतो पण .......पण ते माझ्या नशिबी नसल्याने कोथरूड पुणे येथूनच पाठवावी लागत आहे. जानेवारी २०१५ पासून सुरु झालेला माझ्या डोक्यातील हा विषय आता थंड झाला आहे.तरीपण माझ्या फेसबुक वरील मित्रांना ह्या संबंधी थोडे तरी सांगायलाच हवे असे वाटते.
२०१३ / २०१४ मध्ये मी अमेरिकेत असतानाच यंदाचे हे अधिवेशन लॉस एंजेलिस येथे भरणार असल्याचे मला समजले. तेंव्हा जमले तर "आचार्य अत्रे साहित्य दर्शन "हे वान्ग्मयीन प्रदर्शन आपण येथील अत्रे प्रेमी मराठी जनतेसाठी करावे निदान त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न तरी करावा असा मी निश्चय केला.प्रयत्न करण्यासाठी परवानगी किंवा पैसा लागत नाही हे एक बरे असते म्हणून जानेवारी २०१५ पासूनच नेटवरील खर्डेघाशी सुरु केली.मंडळाच्या संकेत स्थळावर जाऊन संबंधीत पदाधिकार्यांशी फोन,e मेल द्वारे संपर्क साधला.अनेक माहितीपत्रके,वृत्तपत्रीय कात्रणे ,काही निवडक फोटो मंडळाकडे on line पाठविले.हे सर्व वाचून आणि पाहून मला मंडळाने हे impressive collection भरविण्यास आनंदाने मान्यता दिली.इतकेच नव्हेतर काही सवलतीहि दिल्या होत्या.आर्थिक पाठबळासाठी मी सरकार दरबारी सविस्तर अर्जही केला होता.पण तेथे राहण्याची माझी सोय होवू न शकल्याने मी गेलो नाही.आणि ह्याच वेळी माझ्या एका गुडघ्याने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केल्याने मी तंग झालो.घरातही सरळ वळणाने चालता येत नव्हते.तेंव्हा समग्र आत्रेय खजिना कसा नेणार? करायला गेलो एक आणि झालं भलतंच तर आपली अवस्था कशी होईल ह्या विचाराने मला ग्रासले.दोनतीन दिवस हाच विचार सारखा सारखा करून मी शेवटी मोठ्या नाराजीने आणि दुख्खाने मंडळाला माझी असमर्थता कळविली.सर्व पदाधिकार्यांनी मला चांगले सहकार्य केले होते अनेक परिचित मंडळीना सुद्धा मी e मेलद्वारे संपर्क साधला होता..त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. पण मनाला मात्र हुरहूर लागून राहिली आहे.ह्या निमित्ताने अत्रेप्रेमी मराठी माणसाना एक दुर्मिळ प्रदर्शन पाहण्यास मिळणार होते ते आता मिळणार नाही म्हणून.ह्या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहेत. महाराष्ट्राच्या ह्या बलदंड आणि बलाढ्य साहित्यिकाचे दर्शन मुख्यमंत्र्यानाही घडवायचे असे मी योजिले होते खरे पण .......जाऊ द्द्या
१९९९ मध्ये सन होजे (USA) येथे मी पहिल्यांदा हे प्रदर्शन केले होते.त्यावेळी अनेक मराठी जनता अत्रे दर्शन झाल्याने खुश झाली होती.पण तेंव्हा मला व्हिसा नाकारल्याने तंग केले आणि आता गुडघ्याने.शेवटी नशिबात काय असते ते कुणाला चुकत नाही असे म्हणतात हेच खरे. असो. झाले ते झाले.पण मनाला लागलेली बोचणी,हुरहूर काही दिवस तरी बेचैन करणार हे नक्की.
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या ह्या वैभवशाली अधिवेशनास माझ्या हार्दिक शुभेच्छा.जय हिंद जय महाराष्ट्र
शुभप्रभात ....दि.३ जुलै २०१५ $$$$$$$$$$$$$$$$$#########$$$$$$$$$$$$$$

No comments:

Post a Comment