अत्रे उवाच ....,'.दार उघड, बया , दार उघड !
महाराष्ट्रभूषण.....श्री बाबासाहेब पुरंदरे
...

आचार्य अत्रे ह्यांनी आपल्या " दैनिक मराठा "मध्ये वरील अग्रलेख लिहून श्री बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या " राजा शिवछत्रपती " ह्या ग्रंथाचे खास आत्रेय शैलीत गुणगान केले आहे.कालच श्री बाबासाहेबांना" महाराष्ट्र भूषण " हा महाराष्ट्र शासनाचा सर्व्वोच्च पुरस्कार मिळाला.ह्या निमित्ताने मला अत्रे साहेबांची प्रकर्षाने आठवण झाली.आज आ.अत्रे असते तर त्यांनी बाबासाहेबांचे नेहमीप्रमाणे "प्रचंड " कौतुक शिवतीर्थावर मोठ्या दिमाखाने केले असते.वरील आत्रेय अग्रलेखाचा काही भाग वाचकांपुढे मुद्दाम ठेवत आहे. रसिक वाचकाला नक्कीच आवडेल असा आहे.
"ह्या महान "शिवचरित्रा"ची ही तिसरी आवृत्ती पाच पाचशे पानांच्या दोन प्रचंड खंडात अत्यंत आकर्षक आणि स्फूर्तीदायक स्वरुपात अक्षय्य तृतीयेला प्रकाशित झालेली आहे. शिवचरित्राचे हे दोन खंड सा-या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके ते सुंदर आणि बहारदार झाले आहेत.हे शिवचरित्र गद्य आहे का काव्य आहे,इतिहास आहे का नाट्य आहे याचा प्रत्येक शब्दाश्ब्दागनिक वाचकांना भ्रम पडतो.ते वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे का इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे ह्याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो.
शिव् चरित्रापेक्षा महाराष्ट्राला अधिक पवित्र, अधिक मादक किंवा अधिक उत्तुंग असे काही नाही.
हिमालयाची उंची,गंगेची विशालता आणि काश्मीरचे सौंदर्य शिव चरित्रावरून ओवाळून टाकावे एवढी त्याची योग्यताआहे. हे अमर शिव चरित्र कालिदासाच्या कल्पनेने भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिव् नाट्य शेक्सपिअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा एक महान नाटककार ह्या महाराष्ट्रात आज जन्माला आलेला आहे.त्याचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.ह्यापुढे मराठी भाषेत शिवचरित्र कोणी सांगू नये.आणि शिवचरित्र कोणी लिहू नये.एवढी कथनाच्या आणि लेखनाच्या पराक्रमाची परिसीमा ह्या महाकवीने करून ठेवलेली आहे.
हे शिवचरित्र लिहिताना नवनवोन्मेषशालिनी,चातुर्य-कला-कामिनी, अभिनववाग्विलासिनी,
वीणावादिनी,विश्वमोहिनी अशी जी महाराष्ट्र शारदा तीच जणू काही त्यांच्या सर्वांगात संचारली आहे असे वाटते.हे शिवजन्माचे आख्यान मांडताना चंडमुंड-भंडासुरखंडीनी जगदंबा ,उदंडदंड -महिशासुरमर्दिनी दुर्गा,आणि महाराष्ट्र धर्मरक्षीका तुळजाभवानी ह्याच जणू आपल्या आशीर्वादाचे हात त्यांच्या डोक्यावर धरून उभ्या आहेत असा भास होतो.हे शिवचरित्र गाताना त्यांच्या वाणीतून वैनगंगा,पैनगंगा, बाणगंगा,गोदा,कृष्णा,वर्धा,पूर्णा आणि इंद्रायणी ह्या महाराष्ट्राच्या गंगा त्यांच्या
जिव्हेतून दुध सागराप्रमाणे फेसाळत बाहेत पडत आहेत की काय असा साक्षात्कार होतो.
शिवरायाच्या अथांग पराक्रमाचा इतिहास मराठी लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचला पाहिजे,माजघरात शिरला पाहिजे,पाळण्यापर्यंत गेला पाहिजे, हृदयापर्यंत धडकला पाहिजे इतकेच नव्हे तर आमच्या बहिणी,भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे.सारांश,महाराष्ट्रातल्या तरुणांना नवीन इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा या शिवचरित्रातून मिळाली पाहिजे."
शुभप्रभात दि.२० ऑगस्ट २०१५ ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
See More"ह्या महान "शिवचरित्रा"ची ही तिसरी आवृत्ती पाच पाचशे पानांच्या दोन प्रचंड खंडात अत्यंत आकर्षक आणि स्फूर्तीदायक स्वरुपात अक्षय्य तृतीयेला प्रकाशित झालेली आहे. शिवचरित्राचे हे दोन खंड सा-या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके ते सुंदर आणि बहारदार झाले आहेत.हे शिवचरित्र गद्य आहे का काव्य आहे,इतिहास आहे का नाट्य आहे याचा प्रत्येक शब्दाश्ब्दागनिक वाचकांना भ्रम पडतो.ते वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे का इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे ह्याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो.
शिव् चरित्रापेक्षा महाराष्ट्राला अधिक पवित्र, अधिक मादक किंवा अधिक उत्तुंग असे काही नाही.
हिमालयाची उंची,गंगेची विशालता आणि काश्मीरचे सौंदर्य शिव चरित्रावरून ओवाळून टाकावे एवढी त्याची योग्यताआहे. हे अमर शिव चरित्र कालिदासाच्या कल्पनेने भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिव् नाट्य शेक्सपिअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा एक महान नाटककार ह्या महाराष्ट्रात आज जन्माला आलेला आहे.त्याचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.ह्यापुढे मराठी भाषेत शिवचरित्र कोणी सांगू नये.आणि शिवचरित्र कोणी लिहू नये.एवढी कथनाच्या आणि लेखनाच्या पराक्रमाची परिसीमा ह्या महाकवीने करून ठेवलेली आहे.
हे शिवचरित्र लिहिताना नवनवोन्मेषशालिनी,चातुर्य-कला-कामिनी, अभिनववाग्विलासिनी,
वीणावादिनी,विश्वमोहिनी अशी जी महाराष्ट्र शारदा तीच जणू काही त्यांच्या सर्वांगात संचारली आहे असे वाटते.हे शिवजन्माचे आख्यान मांडताना चंडमुंड-भंडासुरखंडीनी जगदंबा ,उदंडदंड -महिशासुरमर्दिनी दुर्गा,आणि महाराष्ट्र धर्मरक्षीका तुळजाभवानी ह्याच जणू आपल्या आशीर्वादाचे हात त्यांच्या डोक्यावर धरून उभ्या आहेत असा भास होतो.हे शिवचरित्र गाताना त्यांच्या वाणीतून वैनगंगा,पैनगंगा, बाणगंगा,गोदा,कृष्णा,वर्धा,पूर्णा आणि इंद्रायणी ह्या महाराष्ट्राच्या गंगा त्यांच्या
जिव्हेतून दुध सागराप्रमाणे फेसाळत बाहेत पडत आहेत की काय असा साक्षात्कार होतो.
शिवरायाच्या अथांग पराक्रमाचा इतिहास मराठी लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचला पाहिजे,माजघरात शिरला पाहिजे,पाळण्यापर्यंत गेला पाहिजे, हृदयापर्यंत धडकला पाहिजे इतकेच नव्हे तर आमच्या बहिणी,भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे.सारांश,महाराष्ट्रातल्या तरुणांना नवीन इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा या शिवचरित्रातून मिळाली पाहिजे."
शुभप्रभात दि.२० ऑगस्ट २०१५ ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment