Friday, May 1, 2015

सत्तर बेहत्तर (माझा सत्तरीत प्रवेश)

सत्तर बेहत्तर (माझा सत्तरीत प्रवेश )
वरील हेडींग( म्हणजे mathala )वाचून तुम्हाला सहज कळेल की मी आता सत्तरीच्या नाटकात प्रवेश केला आहे.काल दिनांक ३० एप्रिल २०१५ ( फुल एप्रिल पण एप्रिल फूल नव्हे)हा माझा वाढदिवस (आचार्य अत्रे म्हणत आता कसला वाढदिवस आता काढ दिवस )कालच ६९ वे वरीस सरून आजपासून ७०वे वरीस लागले कारण .पु.ल. नी एका लेखात म्हटले आहे कुठले तरी वय आधी सरल्याखेरीज नवीन वय माणसाला लागत नाही.त्याप्रमाणे ६९ सरले आणि ७० लागले इतकेच. हा काही विशेष फार मोठा पराक्रम मी केलाय असे मला वाटत नाही.किंवा आपल्याला सत्तर वय लागावे म्हणून मी काहीही विशेष प्रयत्न केले नाहीत.ही सर्व ईश्वराची दया असे मी मानतो.वाढदिवसाचा आनंद कोणाला होत नाही? सर्वांनाच होतो.मीसुद्धा ह्याला अपवाद नाही हे आधीच सांगून पुढचे लिहायला लागतो.
कालचा दिवस हा सुद्धा इतर दिवसाप्रमाणे २४ तासांचाच होता.माझ्या वाढदिवसामुळे अर्धा पाऊण तासानेही त्यात वाढ झाली नव्हती.पण सक्काळी सक्काळी ६ लाच मी आणि फोन अर्धवट झोपेत असताना फोनची घंटा नेहमीच्या सुरात गायला लागली.हेल्लो हेल्लो करीत डोळे चोळत फोन घेतला .माझ्या मित्राचा विजापूरहून अभिनंदनाचा पहिला फोन आला.फोन ठेवल्यावर लगेच इकडे भ्रमण ध्वनीचा मधूरध्वनी कोकलू लागला. दिवसभर दोन्ही फोनची म्हणजे BSNL आणि IDEA ह्यांची जुगलबंदी सुरु होती.त्या बिचा-यांचा काहीच दोष नव्हता.वाढदिवस पडला आमचा.मित्र मंडळी तरी सोडतायत का?HAPPY BIRTHDAY...MANY MANY RETURNS वगैरे सुरु झालच होतं. चहाचे घुटके घेत घेत दै. महाराष्ट्र टाइम्स वाचू लागलो तोच "आजचे वाढदिवस"सदरात "सुहास बोकील आचार्य अत्रे साहित्य संग्राहक " हे वाचून आणि पाहून मन भरून आले. हा सन्मान आचार्य अत्रे ह्यांच्या कार्याचा होता मी निमित्तमात्र आहे. महाराष्ट्राच्या .ह्या प्रचंड माणसाची स्मृती सदैव जागृत रहावी म्हणून माझा अल्पसा प्रयत्न असतो.१३ ऑगस्टला ह्या महापुरुषाच्या वाढदिवसाला अनेकांना माझी आठवण होते.एकवेळ माझ्या वाढदिवसाला माझी आठवण येत नसेल".अत्रे "नावाची जी पालखी महाराष्ट्रात निघाली त्याचे भोई होण्याचे भाग्य मला मिळाले हीच माझी कमाई आहे असे वाटते. असो.
आमचे प्रभात भ्रमण मंडळ सभासदांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करते.काल माझा नंबर होता.गप्पाटप्पा,फोटो,पुष्पगुच्छ आणि शेवटी दमदमीत/दणदणीत नाश्ता असा तासभराचा कार्यक्रम असतो.सर्वमित्रांना" गुरुदत्त "ह्या खाद्य मंदिरासत्तर बेहत्तर (माझा सत्तरीत प्रवेश )
वरील हेडींग( म्हणजे mathala )वाचून तुम्हाला सहज कळेल की मी आता सत्तरीच्या नाटकात प्रवेश केला आहे.काल दिनांक ३० एप्रिल २०१५ ( फुल एप्रिल पण एप्रिल फूल नव्हे)हा माझा वाढदिवस (आचार्य अत्रे म्हणत आता कसला वाढदिवस आता काढ दिवस )कालच ६९ वे वरीस सरून आजपासून ७०वे वरीस लागले कारण .पु.ल. नी एका लेखात म्हटले आहे कुठले तरी वय आधी सरल्याखेरीज नवीन वय माणसाला लागत नाही.त्याप्रमाणे ६९ सरले आणि ७० लागले इतकेच. हा काही विशेष फार मोठा पराक्रम मी केलाय असे मला वाटत नाही.किंवा आपल्याला सत्तर वय लागावे म्हणून मी काहीही विशेष प्रयत्न केले नाहीत.ही सर्व ईश्वराची दया असे मी मानतो.वाढदिवसाचा आनंद कोणाला होत नाही? सर्वांनाच होतो.मीसुद्धा ह्याला अपवाद नाही हे आधीच सांगून पुढचे लिहायला लागतो.
कालचा दिवस हा सुद्धा इतर दिवसाप्रमाणे २४ तासांचाच होता.माझ्या वाढदिवसामुळे अर्धा पाऊण तासानेही त्यात वाढ झाली नव्हती.पण सक्काळी सक्काळी ६ लाच मी आणि फोन अर्धवट झोपेत असताना फोनची घंटा नेहमीच्या सुरात गायला लागली.हेल्लो हेल्लो करीत डोळे चोळत फोन घेतला .माझ्या मित्राचा विजापूरहून अभिनंदनाचा पहिला फोन आला.फोन ठेवल्यावर लगेच इकडे भ्रमण ध्वनीचा मधूरध्वनी कोकलू लागला. दिवसभर दोन्ही फोनची म्हणजे BSNL आणि IDEA ह्यांची जुगलबंदी सुरु होती.त्या बिचा-यांचा काहीच दोष नव्हता.वाढदिवस पडला आमचा.मित्र मंडळी तरी सोडतायत का?HAPPY BIRTHDAY...MANY MANY RETURNS वगैरे सुरु झालच होतं. चहाचे घुटके घेत घेत दै. महाराष्ट्र टाइम्स वाचू लागलो तोच "आजचे वाढदिवस"सदरात "सुहास बोकील आचार्य अत्रे साहित्य संग्राहक " हे वाचून आणि पाहून मन भरून आले. हा सन्मान आचार्य अत्रे ह्यांच्या कार्याचा होता मी निमित्तमात्र आहे. महाराष्ट्राच्या .ह्या प्रचंड माणसाची स्मृती सदैव जागृत रहावी म्हणून माझा अल्पसा प्रयत्न असतो.१३ ऑगस्टला ह्या महापुरुषाच्या वाढदिवसाला अनेकांना माझी आठवण होते.एकवेळ माझ्या वाढदिवसाला माझी आठवण येत नसेल".अत्रे "नावाची जी पालखी महाराष्ट्रात निघाली त्याचे भोई होण्याचे भाग्य मला मिळाले हीच माझी कमाई आहे असे वाटते. असो.
आमचे प्रभात भ्रमण मंडळ सभासदांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करते.काल माझा नंबर होता.गप्पाटप्पा,फोटो,पुष्पगुच्छ आणि शेवटी दमदमीत/दणदणीत नाश्ता असा तासभराचा कार्यक्रम असतो.सर्वमित्रांना" गुरुदत्त "ह्या खाद्य मंदिरात 'जो जे वांछील तो ते खावो 'असे परमीट मी दिले होते. झणझणीत मिसळपाव आणि थंडगार लस्सी असा मेनू होता.मजा आली एवढ
मात्र खरं. घरी आल्यावर फेसबुक आणि whats app वर शुभेच्छांचा ट्राफिक जम झाला होता.थोड्या वेळातच निवळला.नातेवाईक,शेजारी ,हितचिंतक,बँकेची आणि बाहेरची मित्र मंडळी असे अनेकजण सदिच्छा देत होते. दै.म.टा.मधील उल्लेख वाचून अनेकजणांनी आवर्जून संपर्क साधला आणि मला हरभ-याच्या झाडावर चढवले.पण मी क्षणातच जमिनीवर आलो.सायंकाळी आमच्या कट्ट्यावरही वाढदिवस खट्टामीठा स्वरुपात साजरा झाला.बुंदीचे लाडू आणि कचोरी खिलवली .सर्व खुश झाले.अमेरिकेतून माझ्या मुलांच्या" फौनिक" सदिच्छा मिळाल्या.
आता परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे ही मागणी आहे.त्या दृष्टीने प्रयत्न चालू असतातच.सकाळची प्रभात फेरी,झेपेल एवढा व्यायाम प्राणायाम पोहणे हे सुरु आहेच.तरीपण शरीरात काहीतरी ठुस ठुस सुरु असतेच.कालच एका अतिज्येष्ट सहका-याचा फोन आला होता.वयवर्षे ७९,मला म्हणाला तू अजून लहान आहेस.मला जरा बर वाटलं.आपण असेच "कोवळे
पेन्शनर "'सदैव रहावे हीच माझी इच्छा .इच्छा असेल तर मार्ग सापडतो असे म्हणतात हे खरं आहे का हो ? पाहू या .तुम्हा सर्वांच्या प्रबळ इच्छेवरच अवलंबून आहे असे वाटते.
शुभप्रभात ...दि.१ मे २०१५ ,,,,,,,,,,,,,,=================...................==============
त 'जो जे वांछील तो ते खावो 'असे परमीट मी दिले होते. झणझणीत मिसळपाव आणि थंडगार लस्सी असा मेनू होता.मजा आली एवढ
मात्र खरं. घरी आल्यावर फेसबुक आणि whats app वर शुभेच्छांचा ट्राफिक जम झाला होता.थोड्या वेळातच निवळला.नातेवाईक,शेजारी ,हितचिंतक,बँकेची आणि बाहेरची मित्र मंडळी असे अनेकजण सदिच्छा देत होते. दै.म.टा.मधील उल्लेख वाचून अनेकजणांनी आवर्जून संपर्क साधला आणि मला हरभ-याच्या झाडावर चढवले.पण मी क्षणातच जमिनीवर आलो.सायंकाळी आमच्या कट्ट्यावरही वाढदिवस खट्टामीठा स्वरुपात साजरा झाला.बुंदीचे लाडू आणि कचोरी खिलवली .सर्व खुश झाले.अमेरिकेतून माझ्या मुलांच्या" फौनिक" सदिच्छा मिळाल्या.
आता परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे ही मागणी आहे.त्या दृष्टीने प्रयत्न चालू असतातच.सकाळची प्रभात फेरी,झेपेल एवढा व्यायाम प्राणायाम पोहणे हे सुरु आहेच.तरीपण शरीरात काहीतरी ठुस ठुस सुरु असतेच.कालच एका अतिज्येष्ट सहका-याचा फोन आला होता.वयवर्षे ७९,मला म्हणाला तू अजून लहान आहेस.मला जरा बर वाटलं.आपण असेच "कोवळे
पेन्शनर "'सदैव रहावे हीच माझी इच्छा .इच्छा असेल तर मार्ग सापडतो असे म्हणतात हे खरं आहे का हो ? पाहू या .तुम्हा सर्वांच्या प्रबळ इच्छेवरच अवलंबून आहे असे वाटते.
शुभप्रभात ...दि.१ मे २०१५ ,,,,,,,,,,,,,,=================...................==============

No comments:

Post a Comment