जागतिक महिला दिनानिमित्त "ती " ची आठवण
गीतकार साहिर लुधियानवीचे स्मरण.......
दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या धुमधडाक्यात सर्वत्र साजरा झाला आणि ह्या निमित्ताने पुण्यातील मयूर कॉलनीतील एका प्रशस्थ सभागृहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा एक सुंदर कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमाचे नाव "साहिरच्या चित्रपट गीतातील "ती" असे होते आणि सादरकर्ते होते "आनंद/अनिल ".सदर कार्यक्रम हा केवळ ज्येष्ठ रसिकांसाठीच होता की काय असेच वाटत होते.कारण साहीर लुधियानवी, हसरत जयपुरी,शकील बदायुनी,शैलेंद्र ह्या
थोर गीतकारांची नावेसुद्धा आजकालच्या पिढीला माहित असावीत असे वाटत नाही.असलीच
तर फार थोड्या लोकांनाच. ह्या निमित्ताने ५०/६० वर्षापूर्वीच्या सांगीतिक आठवणी अनेक
आजीआजोबांच्या मनात आणि अंत:करणात जाग्या झाल्या असतील. त्या काळात वरील
गीतकार,कवी रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत होते आणि मोहिनी घालत होते.हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने नेहमीच्या रिवाजानुसार आवाक्याबाहेर गेला इतकी प्रचंड गर्दी
होती. त्यामुळे सुशिक्षितांची बाचाबाचीहि अनेकांना विनामूल्य अनुभवायला मिळाली. असो.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच आयोजकांनी गीतकार साहिर लुधियानवीच्या आठवणी जागृत केल्या.
त्यांचे उर्दू भाषेवरील प्रभुत्व, शब्दावरील पकड,खास शैलीत विषद केले.. जागतिक महिला दिनानिमित "स्त्री " ह्या विषयवारील साहिरजींचे काव्यात्मक योगदान सर्वांना कळाले.मुलगी,
पत्नी, भगिनी आणि आई ह्यांच्या तोंडी असलेली अनेक गीते ह्या गीतकाराने रचली आहेत.
सर्वच चांगली असली तरी वेळेअभावी सर्वच सादर करता आली नाहीत.पण जी काही गीते सादर केली गेली ती अफलातूनच होती.अनेकजण आनंदाने जुन्या दिवसात रममाण होऊन
गुणगुणत होते.ठेका धरत होते.अशी लोकप्रिय गाणी अलीकडे आकाशवाणी आणि प्रकाशवाणी वर ऐकायलाच मिळत नाहीत.म्हणून ह्या कार्यक्रमाचे अप्रूप वाटत होते. अनेक संगीत प्रेमी जनतेच्या भाऊगर्दीत मी पण आवर्जून हजेरी लावली होती. माझे हिंदी किंवा उर्दू भाषेचे ज्ञान तसे यथातथाच आहे पण संगीतातील कान थोडाफार असल्याने मीपण मंत्रमुग्ध झालो होतो.माझ्याप्रमाणेच ५० /६० च्या दशकातील हिट आणि सुपर हिट गाणी ऐकून अनेकजण घायाळ झाले आहेत.इतकी ताकत गीतकार,गायक आणि संगीतकार ह्या त्रिमूर्तीमध्ये होती.आता फक्त सुखद आठवणी घोळविणे एवढेच काम राहिले आहे.मला आवडलेली काही गीते( केवळ चालीवरूनच शब्द रचना नाही )
कार्यक्रमाच्या अगदी सुरवातीला अभिनेत्री मालासिन्हाने गायलेले "बहुरानी "ह्या चित्रपटातील
"....सोजाओ सोजा सोजा ओ" १९५७ साली स्वर्गीय गुरुदत्तचा "प्यासा" चित्रपट फारच लोकप्रिय झाला होता. त्यात त्याने गायलेले नशेतील "....कहा है..कहा है...कहा है.." हे गीत,
कृष्णधवल "प्यासा" तील गुरुदत्त आणि गीतादत्त ह्यांचा शृंगार सवाल जवाब असलेले "हम आपकी आखोमे ..." युगुलगीत, अशोककुमार मालासिंहा आणि सुनीलदत्त ह्यांचा प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट "गुमराह "मधील बच्चेकंपनीसह गायलेले " एक थी लडकी","देवदास "मधील वैजयन्तिमालाने गायलेले असेच एक सुंदर चालीचे गीत,"जिसने कबुल करले"आणि तिनेच गायलेले "साधना "
मधील "औरतने जनम दिया मरदोन्को" "बाबर "चित्रपटातील एक गीत,१९५८ साली अशोक
कुमार आणि नूतन ह्यांच्या "लाईट हाउस" मध्ये नूतन हिने शास्त्रीय संगीताच्या आधारावर गायलेले एक सुंदर गीत, " ये मत पुछो कल क्या होगा/जो भी होगा वो अच्छा होगा " हे एक
लोकप्रिय गीत,आणि शेवटी "हम दोनो "मधील लतादिदिनी गायलेले एक लोकप्रिय भजन/गीत
"अल्ला तेरो नाम ...ईश्वर तेरो नाम ...सबको सन्मती दे भगवान "ह्याबरोबरच कार्यक्रमाची
सांगता झाली.जनतेने टाळ्यांचा कडकडाट केला. आणि हळू हळू सर्वांची पाऊले जिना उतरू लागली.
१९२१ साली जन्मलेल्या साहिर लुधियानवी ह्या "Peoples Poet" म्हणून ओळखला जाणार्या
गीतकाराचे १९८० मध्ये निधन झाले. अशा प्रकारे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्या महान गीतकाराची स्मृती बलराज सहानी -साहिर लुधियानवी फौन्डेशनने जागृत ठेवली.
शुभप्रभात दिनांक १२ मार्च २०१६

संगीत मैफल फारच छान झाली
ReplyDelete